|
स्त्री. एका जाग्यावरुन उडून दुसर्या जागीं वेगानें पडणें , जाणें ; झेंप ; उडणें ; उड्डाण ( क्रि० घालणें ; मारणें ; टाकणें ). ( ल . ) संकल्प ; इच्छेची मर्यादा . त्या घोड्याचे हजार रुपये घ्यावे अशी त्याची उडी आहे . ( ल . ) आटोका ; आवांका ; पल्ला ; कार्यक्षमता ; आकांक्षा ; उमेद . ( राजा . ) दुसर्याचा बैल कामाकरितां आणल्याबद्दल धान्याच्या किंवा पैशाच्या रुपानें द्यावयाचें मूल्य ; भाड्यानें जनावरें आणून शेती करणें . [ सं . उत + डी प्रा . उड्डी ] उड्या पडणें - झटून , तुटून पडणें ( मला पाहिजे , मी करतों म्हणून ); गर्दी होणें ; जोराची चढाओढ लागणें ; चुरस लागणें ( एखाद्या गोष्टीबद्दल ). उंच वस्त तात्काळ विके । जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती । - दा १२ . ७ . २५ . त्या रोजगाराविषयीं उड्या पडतात . उड्या मारणें - गर्व वाहणें ; ऐट करणें ; फुशारकी मारणें ; बढाई मारणें ; उद्दामपणें वागणें . उनाडक्या करणें . चैन करणें . विवक्षित मर्यादा ओलांडून , उल्लंघून जाणें . गाळणें ( मुद्याचा भाग , नाटकांतील भाग , ग्रंथांतील विशिष्ट भाग ). ( बळावर , जिवावर ) उड्या मारणें - दुसर्याच्या आश्रयावर , आधारावर अवलंबून मोठमोठ्या गोष्टी करणें ; गर्व वाहणें ; मोठमोठ्या कार्यास हात घालणें . आजपर्यंत आम्ही तुमचे बळावर उड्या मारीत होतों , परंतु तुम्ही हातचें सोडलेंत .
|