Dictionaries | References

उजु

   
Script: Devanagari
See also:  उजुं , उजुक , उजू , उजूं , उजूबुजू

उजु     

क्रि.वि.  ( कुण . ) अजून ; पुन्हां ; आणखी ; माकत्यान . उजान पहा . रामा येतो म्हणाला पण उजुक आला नाहीं . [ हिं . अजो ; म . अजून ]
वि.  
सरळ ; वांकडें नव्हे असें ; समसूत्रानुवर्ती ( रेषा , मार्ग इ . ). तो उजु हातिएरुं । धरो नेणें ॥ - शिशु ८९५ .
नीट ; योग्य ; अनुकूल ; सीधा ( स्वभावाचा ). किंवा जैसें तें चातक । मेघां उजु करितां घोक । - स्वादि १ . २ . ८२ .
सरळ ; चांगलें ; सन्मार्गवर्ति . ऋषीश्वरासिं पडलें सांकडें । कीं उजू करितां जाहलें वांकडें । - कथा ६ . ५ . ६९ . स्वैरिणीचें पाऊल उजू म्हणून चुकूनहि पडायचेंच नाहीं . - नि ७८९ .
बरोबर ; प्रमाणशीर ; सरळ येणारें ; योग्य ; यथान्याय . उजु हिशेबाचे जे पैसे ते आम्ही देऊं . - कोरकि २८० .
छक्केपंजे , ध्वन्यर्थ , वक्रोक्ति वगैरे नसलेलें ; सहज ; सोपें ; सुबोध ; सहज समजण्यासारखें ( भाषण , वाक्य , कविता इ० ).
प्रामाणिक ; न्याय ; नि : पक्षपाती . [ सं . ऋजु ; प्रा . उज्जु ; जिप्सी उजो ]
०करणें   बडवून कामाला योग्य करणें ; पेटविणें ( बैल . ) - शअ . समोर ; कडे . तंवं तो धारासिंपे तिरवटें । डोळेआं उजूं ॥ - शिशु ७११ . मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजु ॥ - ज्ञा ६ . २२८ . उभा राहिला जानकी उजू । - कृमुरा १० . १२ . वीर पाहाती आकाश उजु । तों येतां देखिला तेज : पुंजु । जो ब्रह्माचा आत्मजु । नामें विख्यात नारद ॥ - जै ५१ . १५ . - क्रिवि .
सरळपणें ; बरोबर ; नीट रीतीनें .
योग्य बाजूस , दिशेस , मार्गास . रथियाउजू पार्थ वीर । भिमें लक्षिले गजभार ॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP