|
न. आभाळ ; आपल्या डोक्यावर दिसणारी घुमटाकार पोकळी . हिचा रंग निळसर असतो . आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस - दा १३ . ७ . १ . वातावरण ; अंतराळ . पोकळी - एभा १९ . १९३ . एक संख्या ( शून्य ). पंचमहाभूतांपैकीं शेवटचें . यांत इंधक ( ईथर ) भरला असून तो ध्वनिवाहक आहे . ( वेदांत ) निर्गुण स्वरुप . ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा ॥ - ज्ञा १२ . ७४ . कांहीं समाशब्द - घटाकाश ; मठाकाश ; महदाकाश ; चिदाकाश इ० [ सं . ] हा शब्द पाताळ शब्दाबरोबर येतो . असे कांहीं वाक्यप्रचार . ०पाताळ - गर्वानें फुगून गेलेल्या माणसाबद्दल योजतत . एक - गर्वानें फुगून गेलेल्या माणसाबद्दल योजतत . ०पाताळ होणें - अति जोराचा पाऊस पडणें ( मोठ्या पावसांत जमीन - अस्मान एक झालेलें दिसतें म्हणून . ) एक होणें - अति जोराचा पाऊस पडणें ( मोठ्या पावसांत जमीन - अस्मान एक झालेलें दिसतें म्हणून . ) ०पाताळ करणें - हलकल्लोळ करणें ; आरडा ओरड करणें ; धिंगाणा घालणें ( रागानें , हट्टानें ). एक करणें - हलकल्लोळ करणें ; आरडा ओरड करणें ; धिंगाणा घालणें ( रागानें , हट्टानें ). ०पाताळाचा - दोन वस्तूंमधील महदंतर दाखविणें . आत्मा आणि बुध्दि हीं जर तूं एक समजत असलास , तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहींसा केलास असें म्हटलें पाहिजे . - ला घेरा घालणें , देणें - अचाट कृत्यें करणें ; मोठमोठे पराक्रम करणें ; दिग्विजय करणें ; अशक्य गोष्टीस हात घालणें ; महत्त्वाकांक्षी होणें . भेद - दोन वस्तूंमधील महदंतर दाखविणें . आत्मा आणि बुध्दि हीं जर तूं एक समजत असलास , तर आकाश पाताळाचा भेदच तूं नाहींसा केलास असें म्हटलें पाहिजे . - ला घेरा घालणें , देणें - अचाट कृत्यें करणें ; मोठमोठे पराक्रम करणें ; दिग्विजय करणें ; अशक्य गोष्टीस हात घालणें ; महत्त्वाकांक्षी होणें . ०शाची करणें - आकाशाला घेरा घालणें . आकाशाची करवेल चौघडी । महामेरुची बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी मनाच्या ओढी अनिवार ॥ - ची दोरी तुटणें - आकाशाची कुर्हाड पडणें . तों एकाएकींच आकाशाची दोरी तुटते तैशी गोळी येऊन ... उजवे बर्गडींत लागली . - भाब ८१ . - शीं राहाणें - वरच्या मजल्यावर , आढ्याखालीं राहाणें . - ला गवसणीं घालणें - अशक्य गोष्ट करावयास धजणें ; आकाशाला घेरा घालणें . - ची कुर्हाड , धाड पडणें - दैवी आपत्ति येणें ; निसर्गाच्या आपत्ती येणें ; अत्यंत मोठी हानि होणें . उ० पति मरणें ; एकुलता एक पुत्र मरण पावणें . चिटणीस , तुमच्यावर आज आकाशाची कुर्हाड कोसळली आहे . - स्वप ४४६ . म्ह० आकाशाची कुर्हाड कोल्ह्याच्या दांतांवर . - ची साल काढणें - निष्फळ प्रयत्न करणें . तेणें साली काढावी आकाशाची । - अमृ ६ . ४७ . - तून उतरणें , पडणें किंवा अस्मान फाडून येणें - अघटित घटना दाखविणें . म्ह० आकाशांतून पडलों आणि भूईवर सावरलों . - नि ५९४ . - ला शिड्या लावणें - शक्तीबाहेर काम करणें . चौघडी करणें - आकाशाला घेरा घालणें . आकाशाची करवेल चौघडी । महामेरुची बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी मनाच्या ओढी अनिवार ॥ - ची दोरी तुटणें - आकाशाची कुर्हाड पडणें . तों एकाएकींच आकाशाची दोरी तुटते तैशी गोळी येऊन ... उजवे बर्गडींत लागली . - भाब ८१ . - शीं राहाणें - वरच्या मजल्यावर , आढ्याखालीं राहाणें . - ला गवसणीं घालणें - अशक्य गोष्ट करावयास धजणें ; आकाशाला घेरा घालणें . - ची कुर्हाड , धाड पडणें - दैवी आपत्ति येणें ; निसर्गाच्या आपत्ती येणें ; अत्यंत मोठी हानि होणें . उ० पति मरणें ; एकुलता एक पुत्र मरण पावणें . चिटणीस , तुमच्यावर आज आकाशाची कुर्हाड कोसळली आहे . - स्वप ४४६ . म्ह० आकाशाची कुर्हाड कोल्ह्याच्या दांतांवर . - ची साल काढणें - निष्फळ प्रयत्न करणें . तेणें साली काढावी आकाशाची । - अमृ ६ . ४७ . - तून उतरणें , पडणें किंवा अस्मान फाडून येणें - अघटित घटना दाखविणें . म्ह० आकाशांतून पडलों आणि भूईवर सावरलों . - नि ५९४ . - ला शिड्या लावणें - शक्तीबाहेर काम करणें . ०फाटणें सर्व बाजूंनीं एकदम संकटें येणें . आकाश फाटलें त्याला लावावें ठिगळ कुठोनी । - संग्रामगीतें . हेंच दुसर्या शब्दांत उदाहरण . शास ठिगळ लावणें निरर्थक प्रयत्न . हरि - भय - दीर्ण नभ करिल धड लावुनि कृष्णसार थिगळाला । - मोभीष्म ६ . ४४ . ०कक्षा स्त्री. दृश्य क्षितिज . ०कुसुम न. खपुष्प ; असंभाव्य किंवा अवास्तविक गोष्ट ( सशाच्या शिंगाप्रमाणें ). ०गंगा नदी - स्त्री . आकाशांतील नदी ; तारांचा एक विशिष्ट समुदाय ; अति सूक्ष्म अशा तार्यांचे आकाशांत दिसणारे दोन पट्टे . हे दक्षिणोत्तर गेलेले दिसतात . पहिला पट्टा अगस्ति तार्याच्या पूर्वेस मघांच्या रेखांशांजवळून निघून व्याधाच्या पूर्वेकडून आर्द्रांच्या पश्चिमेस वळतो व तेथून तो ध्रुवाच्या पश्चिमेपर्यंत पसरलेला आहे . दुसरा पट्टा श्रवण नक्षत्राजवळून ध्रुवाच्या पूर्वेकडे गेलेला आहे . पहिल्यापेक्षां दुसरा पट्टा लहान आहे . दुर्बिणीनें दिसणारे यांतील तारे सुमारें दोन कोटी आहेत . ०गमनविद्या सिध्दि - स्त्री . यौगिक सिध्दीपैकीं एक ; आकाशांत संचार करण्याची माहिती ; अर्वाचीन विमानविद्या . ०दिवा दीप - पु . आश्विन शुध्द पौर्णिमेपासून कार्तिक शुध्द पौर्णिमेपर्यंत ( पितरांना प्रकाश दिसण्याकरितां ) भिंगाचा किंवा कागदाचा दिवा ( कंदील ) करुन एखाद्या उंच काठीस किंवा झाडास टांगून लावतात तो . खुणेसाठीं एखाद्या उंचजागीं लावलेला दिवा . ०नगर ढगांच्या विचित्र आकृतींवरुन वाटणारें ढगांतील किंवा आकाशांतील काल्पनिक शहर ; ( विप्र . ) गंधर्वनगर ; गंधर्वसृष्टि . ०पट पु. ज्यामध्यें अक्षांश , रेखांश , विषुववृत्त , क्रांतिवृत्त , अयनवृत्त , नक्षत्रें , राशी , तारे , यांच्या आकृती दिलेल्या असतात असा नकाशा . यावरुन सूर्य , चंद्र , ग्रह , उपग्रह , यांचे मार्ग ठरवितां येतात . [ सं . ] ०पथ मार्ग - पु . अंतराळ ; आकाशांतून जाणारा रस्ता ; यौगिक सिध्दींपैकी एक सिध्दि . दे आकाश पंथें झोंकून । दशदिशा गेले पाषाण । आकाश मार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ॥ - दा . हवेंतील रस्ता , वाट . ०पाणी न. ( ल . ) ताडी , माडी , इ० मादक पेय ; ताड , माड हीं झाडें फार उंच असतात व त्यापासून ताडी , माडी काढतात ती त्यांच्या शेंड्याजवळच्या भागापासून काढतात यावरुन . [ सं . ] ०भाषण न. स्वर्गीय देवतांशीं संभाषण ; ( नाटकांत वगैरे ) आकाशाकडे पाहून , देवांना हांक मारुन , त्यांचें उत्तर आपण ऐकलेसें दाखवून जें भाषण नाटकांतील व्यक्ति करिते तें . उ० हे स्वर्गस्थ देवतांनो ! ( नाटकांत ) रंगभूमीवर नसलेल्या दुसर्या एखाद्या पात्राचे शब्द आपण ऐकत आहों असें रंगभूमीवरील पात्र हावभाव करुन सुचवितें व त्यास उत्तर देतें ते शब्द . [ सं . ] ०मंडप पु. आकाशाचें छत ; आकाश हाच मांडव . आकाशमंडप आसडत । नक्षत्रें रिचविती अपार पै ॥ ०मंडल न. खगोल . ०मापक पु. ( शाप . ) वातावरणोष्णतास्थित्यंतर मापक यंत्र ; किरण - विसर्जनदर्शक यंत्र . ( इं . ) ईथ्रिओस्कोप . ०मुनि पु. उंट ( हा वाक्यप्रचार उंटाची मान उंच असल्यामुळें पडला . ) ०मूलि स्त्री. एक झाडाचा वर्ग ( कुंभिका , पुन्नाग , यांचें मूळ जमिनींत नसून अधांतरीं असतें ). जलसंबंधीं वनस्पति . ०यान वहन - न . विमान . ०वल्ली वेल - स्त्री . बांडगुळ ; वृक्षरुहा ; वृक्षावर वाढणारी वेल . शेर वगैरे झाडांवर वाढणारी व बारीक बारीक पिवळे तंतू असणारी वेली ; सोनवेल ; अमरवेल ; अंतरवेल . याच प्रकारच्या दुसर्या एका वेलीस फुलें येतात . ०वाणी स्त्री. आकाशापासून निघणारा शब्द ; अशरीरिणी वाणी ; देववाणी . तुझें हें गाणें म्हणजे आकाशवाणीच मी समजतों . - स्वयंवर . कोणाकडून एखादी गोष्ट समजली हें जेव्हां सांगावयाचें नसतें तेव्हां म्हणतात . जसें - चिलिट गुणगुणलें . ०वास पु. वृक्षादिकांवर राहाणें ; उंच राहणें .
|