|
पुस्ती , डोंगरांत वाढणारें एक झाड . यांचें पान एक अंगुळ रुंद व पांच सहा अंगुळें लांब असून फुल पांढरे असतें , कच्चे फळ निळें व पिकलेलें लाल रंगाचें असतें ; झाडाला कांटे पुष्कळ असतात . कृमी , शूल , विषार ( साप , उंदीर इ० ) यावर औषधि आहे . ( सं . अकोट , प्रा . अंकोल्ल ) - न त्याचें फळ . याचा रस वांती , विष , पशाचपीडा , अतिसार इ० चा नाश करतो . याचें तेल मंत्र - विद्येंतहि उपयोगी पडतें .
|