मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
कलंकी अवतार

प्रसंग अठरावा - कलंकी अवतार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


यवन म्‍हणती कानाधजाल काफर । मर्‍हाटे म्‍हणती कलंकी अवतार । तो करील अवघा एकाकार । ईश्र्वर म्‍हणवील आपणास ॥२६९॥
होईल अठरापगड यातींचा राजा । म्‍हणे माते भजा वोजा । त्‍यानें अनेक भूषणें वाद्यें वाजती वोजा । परमार्थाचे नांव घेऊं नेदी ॥२७०॥
तो सव्वा ताड दीर्घ महा थोर । तो महाकाळ डावा नाहीं नेत्र । समस्‍त दापील सुरनवीर । सहस्र वरुषें ॥२७१॥
तो अवतार जालिया साक्ष परियेसा । रुमी काबीज करील दाही दिशा । मग त्‍यातें ईश्र्वर करील वळसा । सांगेन परियेसा श्रोतेराज ॥२७२॥
शनवाराचा दिवस अवधारा । सायंकाळी सुटेल उत्तरमुखें वारा । तेणें इंद्र चंद्र नव लक्ष तारा । पर्वत प्रलय पावती ॥२७३॥
जैसा पिंजू बैसला पिंजारा । उडती रूं लोकरीच्या तारा । तैसा पर्वतांचा होईल विदारा । तीस दिवस पैं ॥२७४॥
वारा सुटेल एक मासभर । तेणें मही स्‍थळीं होईल जर्जर । निशिदिन न कळे धुमधुमकार । महाप्रळयाचें अंतीं ॥२७५॥
इश्राफिल फिरस्‍त्‍यालागुन । वायु सम करा म्‍हणती जगजीवन । मग कुलुप करोनि पवनालागुन । इश्राफिल स्‍थिर राहील ॥२७६॥
मग आब जमाचे पाणी । एक मास ईश्र्वर करील द्रवणी । तेणें उत्‍पत्ति पावेल जीव जनीं । जितुकें गतले तितुके ॥२७७॥
मग पर्जन्य राहिल्‍याउपरी । शीघ्र तांब्‍याची होईल धरत्री । रवि सन्मुख होईल नेज्‍या बरोबरी । मनुष्‍याचें टाळूस नेत्र होती ॥२७८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP