मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
कर्कोटक कथा

प्रसंग अठरावा - कर्कोटक कथा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


परियेसा काशी यमुना सरस्‍वती । लक्ष्मी जशा सुंदर मूर्ती । चारहि मूर्ती दरबार झाडिती । त्‍या कुर्कोटकाचा ॥१०९॥
चौघी लागल्‍या कुर्कोटकाच्या चरणीं । लक्ष्मी निघाली स्‍वयंपाकालागुनी । यमुना काशी वाहाती पाणी । परियेसा श्रोतेजन ॥११०॥
कुर्कोट बैसला लक्ष उन्मनींभीतरी । तंव सरस्‍वति चरण क्षालन करी । चंचळ चित्तें कापडी करिती भरोवरी ।म्‍हणती ह्या पां सोंकल्‍या यासी ॥१११॥
तेल तापलें कढईभीतरीं । तैसें कापड्याचें मन चळवळ करी । म्‍हणती कवणांच्या तापलें कढईभीतरीं । तैसें कापड्यांचें मन चळवळ करी । म्‍हणती कवणांच्या सुंदरी । सोंकल्‍या यासी ॥११२॥
ऐसा कापडी भाविती अनाचार । म्‍हणती पाप घडल्‍या यास करूं मार । मग पुसों सुंदरीस तुमचे कवण भ्रतार । सांगा आम्‍हांसी ॥११३॥
सुंदरीस कळलें निंदक संपूर्ण । मग कुर्कोटासा घातलें भोजन । विडा दिधला चूळ भरऊन । उरलें उच्छिष्‍ट तांबूल शीघ्र स्‍वीकारलें ॥११४॥
कुर्कोटासी साष्‍टांग नमस्‍कारूनि । मग तेथूनि चालल्‍या चौघीजणी । वेढा घालून कोंडल्‍या कापड्यांनीं । पुसती तुम्‍ही कवण सांगा ॥११५॥
मग बोलों लागली वाराणसी । चांडाळ हो नका शिवूं आम्‍हांसी । तुम्‍ही दुषिलें आमुच्या स्‍वामीसीं । म्‍हणोनि शुभ्र जालेती ॥११६॥
कापडीं घातलें लोटांगण । म्‍हणती आलों तुम्‍हां शरण । कुष्‍ट जायसा सांगा प्रयत्‍न । न कळतां निंदा घडली ॥११७॥
जरी जाणोनियां करी जे निंदा । तरी तें पाप न फिटे कदा । आम्‍हांस उपाव सांगावा सुधा । तुमचीच महिमा वाढेल ॥११८॥
आम्‍ही शुभ्र गेलिया देशास । मग कोणी न मानिती तुम्‍हांस । मग त्‍या उपाय सांगती त्‍यांस । ते परियेसा श्रोते हो ॥११९॥
मग चौघींनी आपली नांवें सांगितली । म्‍हणती सकळ चांडाळें आम्‍हातें उद्धरलीं । आमची पातकें दहन जालीं । साधूचें सेवेनें ॥१२०॥
काशी बोले कापडियां प्रती । स्‍वामी निज घेऊनियां उठती । बाहेर येऊनियां वाटवणी करिती । ते तुम्‍ही शरीरास चर्चावें ॥१२१॥
ऐसें बोलूनियां सुफळ वचनीं । आपुल्‍या स्‍थानासी गेल्‍या चौघजणी । बाहेर येऊनियां कुर्कोटें केलें वाटवणी । मागुता गुंफेंत गेला ॥१२२॥
कापड्यांनीं मृत्तिका वाटवणी । चर्चिले शरीरालागुनी । महा सुंदर जाले पहिल्‍याहुनी । रविप्रभा फांकतसे ॥१२३॥
कापड्यांनीं निंदून वंदिलें कुर्कोटा । साष्‍टांगे नमस्‍कारिला साधु गोमटा । कुर्कोट म्‍हणे जावें काशीच्या तटा । आंघोळी करा पां ॥१२४॥
परतोनि कापडी आले काशीतिरा । क्षेत्रवासी म्‍हणती नवल जालें परमेश्र्वरा । मग कुर्कोटार्पैं भरूं लागली यात्रा । ब्रह्मानंदें अवधारा ॥१२५॥
मग तेथून कुर्कोट गुप्त जाला । मागुता पोहा काशीस आला । म्‍हणोनि साधु पाहिजे वंदिला । शेख मंहमद म्‍हणे ॥१२६॥
निंदा घडोनि कापडियां जाले उद्धरण । तैसेंच व्हावें भाविकांलागुन । शेख महंमद बोलियले खुण । काशीखंडीची ॥१२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP