मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
त्रिकुट ते श्रीहाट कूच

प्रसंग अठरावा - त्रिकुट ते श्रीहाट कूच

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मन आरबी तेजी थोरवट थोर । सत्‍वर चढला त्रिकुट शिखर । तेथें अनुहातें दणत्‍कार । गजर वाद्यांचा ॥२५॥
मग तेथें स्‍थिरावला नाद भेद । सकळहि खंडला अनुवाद । सच्चिदानंदी ब्रह्मानंद । सर्व सामावला ॥२६॥
ओळखा त्रिकुट शिखरीं वक्षरीं । आचार लिंग जागृतीच्या घरीं । प्रसिद्ध हे टीका अवधारी । योगेश्र्वरा ॥२७॥
इडा आणिक पिंगळा सुशुम्‍ना । पुढां तेजी ढकलला सत्‍य जाणा । सावध उजेड उन्मनि मैदाना । उभा केला ॥२८॥
मग तेथून श्रीहाट गुरु लिंग । आप तत्त्व मध्यमेचा सांग । बुबुळेंविण देखिला नाना रंग । स्‍वानुभवाचा ॥२९॥
मग तेथें रवि शशि स्‍थिरावले । पहातां हे लोचन मावळले । शब्‍द निःशब्‍द होऊनि गेले । अनुर्वाच्ये ॥३०॥
गोल्‍हांटी तेज शिवलिंग पूजा । सामवेद शंकर ऐका वोजा । ह्याहि खुणा सांगतो सहजा । परउपकारालागीं ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP