मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
मन ताब्‍यांत नाहीं तर दगा निश्र्चित

प्रसंग अठरावा - मन ताब्‍यांत नाहीं तर दगा निश्र्चित

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पेणा जाऊनियां दुःखें बरळे । पोटीं अनेक अनेक चाळे । एकासाठीं झकले बावळे । बैसल्‍या भावें हरि नाठविती ॥११॥
शुच भावभक्तीसीं बरा । देखोनि श्रहरि येती घरा । हें सांगेन अवधारा । साक्षात्‍कार जयासी ॥१२॥
चोखामेळा रोहिदास चांभार । शिंपी नामा मोमिन कबीर । पिंगळा गणिका वाल्‍हा तस्‍कर । कोळी होता ॥१३॥
जोंवरी मन आलें नाहीं हातीं । तोंवरी कांहीं करूं नये वित्‍पत्ति । मन हें दया देईल अंतीं । केले कष्‍ट दवडील वायां ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP