मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
नाममहिमा

प्रसंग अठरावा - नाममहिमा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


इतुकें ऐकतां उत्तर । नारदें विणा सजिला साचार । मांडिला हरिकथेचा गजर । भाव धरूनियां ॥७९॥
हरि म्‍हणे नारदा ऐके वचन । जेथें माझ्या नामाचा घोष संपूर्ण । तेथें मी तिष्‍ठत उभा जाण । कर जोडूनियां ॥८०॥
यागदानाच्या करितां कोडी । तुका न ये नामघोषाची परवडी । प्रेमेंकून म्‍हणितलें पाहिजे आवडी । भाव धरूनियां ॥८१॥
साधे तुळापूर तीर्थ व्रत । अनेक उग्र तपाची करितां मात । परी नामघोषाविण स्‍वहित । होयसा उपाव नाहीं ॥८२॥
मेरुसारख्या जोडिती तपाच्या कीर्ति । तरीच सद्‌गुरुकृपा होय पुरती । हृदयीं उमटोन पूर्णता पुरती । वैखरी नामघोषीं ॥८३॥
इतुकें ऐकोनियां श्रीवचन । मग शेख महंमद प्रेम उन्मन । म्‍हणे नलगे वैकुंठ भुवन । मज भक्ति द्यावी ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP