मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
नामस्‍मरणानुसंधान

प्रसंग अठरावा - नामस्‍मरणानुसंधान

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


येथें श्रीयोगधारणें पवना । समाप्त केलें शूरत्‍वपणा । पुढें हरिनामस्‍मरणा । अनुसंधान केलें ॥६६॥
हक्क लाइलाहा इल्‍लाल्‍ला । हजरत महंमद रसुलल्‍ला । या दोन्हीं चरणांत पाहिजे ओळखिला । ईश्र्वर विश्र्वरूपें ॥६७॥
लाइला याची टीका अवधारा । नामरूपावेगळा ईश्र्वर स्‍मरा । तेणें शीघ्र भवनदीचा फेरा । चुकेल बापा ॥६८॥
मुसलमान कहे जिकिर बुखानद । मर्‍हाठे म्‍हणती कथेचा आनंद । परी दोन्हीं भाषेंचा भेद । ईश्र्वर अल्‍ला जाणे ॥६९॥
ईश्र्वर म्‍हणजे विश्र्वंभर । दगडाचा नोव्हे ओळखा जाहीर । ज्‍यापासूनि असंख्य अवतार । रामकृष्‍णादि जन्मले ॥७०॥
अल्‍ला म्‍हणजे अलिफ ते न्यारा । वाहनहि निशिदिनीं अवधारा । एकला एक जीवका प्यारा । गुफर रहिम ॥७१॥
जिहीं हरिकथेस केले उपचार । तिहीं जाणा पूजिला ईश्र्वर । ऐका पां श्रीमुखींचें उत्तर । श्रोते हो तुम्‍ही ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP