मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
ईश्र्वर निवाडा

प्रसंग अठरावा - ईश्र्वर निवाडा

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


रवितेजें जाळावया धरत्रि । आरंदळतील कंटक अविचारी । छाया होईल प्रेम भक्तांवरी । पूर्व पुण्य केल्‍याची ॥२७९॥
जे घालिती अन्नोदकांची छत्रे । आणि उघडियातें देती वस्त्रें । ते छाया पावतील वेगवगत्रें । तये अवसरी ॥२८०॥
हजरत काजी जोतिलिंग । तेथे अंतरिक्ष थावरला आहे संग । तेथें परमात्‍मा बैसेल स्‍वस्‍थ अभंग । काजी होऊनियां अवधारा ॥२८१॥
परमात्‍मा बोलेल यमाप्रती । म्‍हणेल माझे जेठी आणा शीघ्र गती । ही खुण न कळे यमाप्रती । कुस्‍तीवाल्‍यांस पुढें करितील ॥२८२॥
मग परमात्‍मा बोले वचनीं । माझे जेठी निकट निर्वाणी । ते मज पुढें आणावें उमगुनी । आतां शीघ्रचि पैं ॥२८३॥
पताका ध्वजा सद्‌गुरूचे झेंडे थवे । ठायीं ठायीं प्रेमें डुल्‍लती बरवे । मुखांतुनी श्रीराम जयराम द्रवे । यम लोटांगणी जाती ॥२८४॥
यम म्‍हणतील वल्‍ली संतांप्रती । तुम्‍हांस अविनाश काजी बोभाती । तेव्हां सद्‌गुरु साधु सामोरे येती । ईश्र्वर आदरें उभा ठाकेल ॥२८५॥
मग परमात्‍मा बोलेल सगुण वचन । म्‍यां तुम्‍हांस भिस्‍त केलें वैकुंठभुवन । तेथें तुम्‍ही रहावें नाहीं मरण । युगानयुगी ॥२८६॥
मग सद्‌गुरु मागे पुढें पाहाती । गुज कळोन बोले अविनाश मूर्ति । जे तुमचे शिष्‍य भक्त असती । त्‍यांतेंहि न्यावें ॥२८७॥
ज्‍यानें मन वाहिलें सद्‌गुरूसी । ते दावणगीर होती सगुणराशी । भिस्‍त पावती ब्रह्मानंदेशी । विश्र्वजना आधीं ॥२८८॥
देखत द्राक्ष तूंत अनार मेवा । उत्‍पत्ति प्रलय नाहीं जीवा । पोळतील सर्व विषयांचा मावा । योनि शिश्र्न नाहीं ॥२८९॥
मनुष्‍याच्या कपाळा येईल घाम । तेणें खादला मेवा जिरेल जाण तमाम । नाहीं अवस्‍था अनेक श्रम । ईश्र्वरभजनाविण ॥२९०॥
सुपुत्राचा समाचार सांगितला असा । विश्र्वजनास पुस होईल ते परियेसा । परमात्‍मा यातना करील कैंसा । तें सांगों आरंभिलें ॥२९१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP