मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित|द्वारकाविजय| चतुर्थसर्ग द्वारकाविजय प्रथमसर्ग द्वितीयसर्ग तृतीयसर्ग चतुर्थसर्ग पंचमसर्ग द्वारकाविजय - चतुर्थसर्ग कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : dwarka vijayvaman panditद्वारका विजयवामन पंडित चतुर्थसर्ग Translation - भाषांतर यानंतरे स्व - चरिताऽमृत नारदासी दावी तया स्मर जना सुख - नीरदासी वंदूनि त्या हरिचिया पद - सारसातें वर्णीन भागवत - दिव्य - कथा रसातें ॥१॥ सुनामामाहेरासीं विविध - विभवें पाठवितसे स्व - माहेरीं ज्या ज्या यदुविर तयां आठवितसे मुळें धाडी त्यांला तदितरगृही इंदुवदना सुना आल्या देखे ऋषिवर रमाकांत - सदना ॥२॥ सदनी पाहतसे मुनि दूसर्या प्रभुस तों स्वसुता निज - सासर्या सजळ - लोचन पाठवि तो हरी प्रकृति मोहक जो स्मरणें हरी ॥३॥ मुली कोठें आल्या श्वश्रुर - सदनींहूनि सदना मुल्हार्या सांगातें कुमुदनयना इंदुवदना दिलीं क्षेमें त्यांतें सजळ - जळजाऽक्षें हरि हरी अविद्यामोहातें स्मरण करितां जो हरि हरि ॥४॥ करी लेकराच्या महाउत्सवासी जगत्तात जो द्वारका - दुर्ग - वासी मुलांची मुलिंची स्वयें लोकरीती करी कौतुकें लोक जैसे करीती ॥५॥उठोनि एके सदनीं प्रभाते हरी करी स्नान मुनी प्रभा तें देखें पुढें कौतुक काय पाहे लीला हरीची त्दृदयीं जपा हे ॥६॥ घटीं जेविं माती जगीं वासुदेव स्वयें तोचि तें ज्ञान दे देवदेव असी चिज्जडीं संधि संध्या वदावी असा तो स्व - संध्या अनुष्ठान दावी ॥७॥जगद्वम्हसंधींत संध्या करीती न कां कर्म संध्या तया लोकरीती स्वयें जो जग द्वम्ह संध्या हरी तो करी कर्म जो कर्मबंधा हरी तो ॥८॥ करावें कदा कर्म हें सीकवीतो कथेची वदे रीति ऐसी कवी तो जपे त्यांपुढें वेदमाता हरी तो स्वबोधेंचि जो भेद - माता हरी तो ॥९॥जया देवांची हो निगम जननी गर्भपरमा त्रिलोकीं सूर्याही हुनि वर दिसे तेज चरमा प्रकाशीं प्रेरी ही सकळ - जन - बुद्धी - अधिप तो स्वये गायत्रीतें निजमय जगद्व्यात जपतो ॥१०॥ दर्भ घालुनि मुकुंद करीं तो पंचयज्ञहि बसोन करितो हा जना सुपथ माधव दावी सज्जनीं गति असीच वदावी ॥११॥ धेनु भूमि तिल रौप्य सुवर्णे अंबरें अतिविचित्र सुवर्णे ब्राम्हणांसि हरि पूजुनि दानें देतसे इतर पुण्य - निदानें ॥१२॥ कोणेके सदनीं शशांक - वदनी पंकेरुहामोदिनी घ्या अन्नें इति वादिति अनुदिनीं जे ब्राम्हणाल्हादिनी विप्र - प्रेम मनीं गजेंद्रगमनी वाढी गृहस्वामिनी क्लेशातें न मनीं जनार्ति शमनी अन्नें दिवायामिनी ॥१३॥ भोजनाऽनुगुण विप्र - दक्षिणा देउनी नमुनियां प्रदक्षिणा श्रीहरी करुनि शेष जेवितो सदृहस्त करि अन्य जेविं तो ॥१४॥ कोठें विचार निगमागम शास्त्ररीती शास्त्रज्ञ आणिक बहु श्रुतही करीती धर्माऽर्थ - काम निवडी हरि वेगळाले निर्दोष ज्यामधिल दोष अहो गळाले ॥१५॥ वदे तया श्रीहरि तो सुजाणा कीं धर्म कृष्णार्पणधर्म जाणा मिळे स्वधर्मे धन अर्थ साचा द्यावा सुपात्रीं नकरुनि साचा ॥१६॥ जो स्वस्त्रियांसीं ऋतुहेतुकाम तो काम सांगे प्रभु पूर्णकाम जडांत आत्मा पट - तंतुरुपें सदा स्फुरे मुक्ति अशा स्वरुपें ॥१७॥ स्वप्रवृत्तिच अनादि पुराणी गाति जे द्वि - नव - संख्य - पुराणीं त्याचिया करि हरि श्रवणातें जो पवित्र करितो श्रवणातें ॥१८॥ पापें जनाचीं श्रवणें गळालीं असीं पुराणें प्रभु वेगळालीं जगद्गुरु आइकतो हरी तो नामेंचि जो पापकुळे हरी तो ॥१९॥ बोलती परमहंस - जनादी वेद पंचम जुनाट अनादी कोणिये सदनिं तो इतिहास कोणिये घरिं करी अति हास ॥२०॥ हास्य - दायक - विनोद - रसाचा दाखवी हरिहि आदर साचा प्रीति - पंकज जगीं उकलो कीं आयके हरिहि कौतुक लोकीं ॥२१॥ भेदवादमत कौतुकरीती एक गात उपहास करीती एक वर्णिति विचित्र - कळीतें हांसतां त्दृदय जे उकलीते ॥२२॥ मी अनीश मज ईश्वर दावा तोचि भेद परतोनि वदावा तूं अनीशचि न ईश्वर पाहें हाचि गुत्द्य उपदेश कृपा हे ॥२३॥ जसें पावणें विष्णुसर्वोत्तमातें तसें पावणें जाण अंधत्तमातें घडे भोग दोहीं स्थळीं लिंगदेहा न देवेश दोघां पुन्हा अंग दे हा ॥२४॥वैकुंठ - अंधत्तम - लोक - वासी न लिंग न स्थूळ जयीं जिवासी तेव्हां निराकार पणें असावें कीं रुपठायींतरि जी स्फुरावें ॥२५॥ म्हणें गुरु रुप असें जिवासी रुपें तया तो उभयत्रवासी चराचराकार जगीं जसा रे चिद्रूपही जीव तसेचि सारे ॥२६॥ वर्णाविणें रुपठसा पडेना वर्णत्व चिद्वसुस सांपडेना श्रुत्यर्थ कांहींतरि वर्ण दावी हे कल्पना त्या पुरुषें वदावी ॥२७॥ लोहितादि - रजआदि गुणातें वेद वर्णिति न जीवगणातें वर्णरुप असतें जरि साच श्रौत शब्द असताच तसाच ॥२८॥ फळे मूढ विश्वास अंधत्तमांत स्वरुपेंच वैकुंठलोकांत मात जया मुक्तितें कावळे - श्वान - जाती असें बोलतां लोक हांसोनि जाती ॥२९॥असें वेदशास्त्रांत कोठेंचि नाहीं नवाटे अजी गोडसी कल्पनाही जयां मुक्ति वैकुंठलोकीं अहो ते मनुष्यत्व टाकूनियां श्वान होते ॥३०॥मुक्त होतिल तथापि कावळे जीभ त्यांसि न जसी पिका बळेकीर्तनीं करिल कावकाव ते वैखरी निजगुणें उगावते ॥३१॥श्वानरुपहि न मुक्ति जी भली भुकणारचि तथापि जी भली जेधवां करिल कीर्तनास ते मुक्तिची सहज कीर्ति नासते ॥३२॥ जया देह मुक्तीमध्यें गाढवाचा तयाची उठे जेधवां गाढ वाचा बहू फार आनंद मुक्ती जनां दे स्वयें ज्योत तो श्रीमहाराज नांदे हें मत श्रुतिविरुद्ध अहाहा मोक्ष काय वदतील महा हा भेद जो विदित तोचि कळावा यांत काय उपदेश फळावा ॥३४॥ तुम्हीं बोलतां अर्थ जे जे श्रुतीचे मला वाटती सर्वही अश्रुतीचे दिसे बंदिशाळेंत ते वेदवाचा रडे आठऊनि प्रभू यादवांचा ॥३५॥ विनोद हा दाखवितां अजाला जोकां गुरुराज - विनोद झाला शिष्यास तो होउनि तप्त दायी कीं रे नव्हे मुक्ति तुतें कदापी ॥३६॥ शिष्यत्व जो राय - विनोद दावी म्हणे असी मुक्तिहि जी वदावी ते मुक्ति त्याच्याच असो अदृष्टीं दिसो न त्याचें मुखही स्वदृष्टीं ॥३७॥ तो तन्मयस्थ जन राय - विनोद - सारें ते बोलती वदसि शब्द असा कसा रे बापा झणी धरिसि अन्य - मतानुमाना जे जीव ते धरिति याचि मतानुमाना ॥३८॥ तो म्हणे निगम - संमत जे जे पक्ष त्यास तुम्हीं मानुनि जे जे बोलतां श्रुतिविरुद्धचि वाणी वाटते मज अमंगळवाणी ॥३९॥ बौद्धावतारीं हरि लोकलीळा करी तंई दे बळ या कळीला जे द्वापरीं धर्म सहाय होते झाले प्रधानांग कळीस हो ते ॥४०॥ कळी धार्तराष्ट्र स्व - पापें मराया हरी आणि भीमादि जे धर्मराया सहाय स्वयें तेचि या हो कळीला हरी बुद्धरुपें करी लोक लीळा ॥४१॥ नव्हे बुद्धरुपें हरी सेव्य लोकीं जसें पाप हें बौद्ध लोकाऽवलोकीं मतें यारिती दुष्टकाळांत नाना करिती अतत्वार्थवादी तनाना ॥४२॥ जसें स्वामिनें वेद मिथ्या म्हणावे तसे सेवकीं अर्थ मिथ्या गणावे वधी स्वामि तो मुख्य - लंकापतीतें करी मारुती जाळुनी ताप तीतें ॥४३॥ प्रधानांग त्या मारुती - भीमसेना करुनी कळीची महाभीम सेना जसी मर्दिली दाविली लोकलीळा करी पुष्टत द्वैपरीत्यें कळीला ॥४४॥ स्वयें अप्रमाणत्व आणूनि वेदीं निषेधूनियां धर्म दैत्या निवेदी करी श्रीहरी जेधवां पक्ष ज्याचा करी भीमही दास पादांबुजाचा ॥४५॥ जई घेतला धर्म कृष्णे कडे हो स्वयें भीम झाला तई त्याकडे हो कळीकारणें वेदनिंदा वदावी प्रधानांगता भीमही त्यांत दावी ॥४६॥ द्रोणपुत्र अजि शंकर होतो शंकरार्य कळिभीतरि होतो तो उभा निगमवृक्ष करीतो भीम मागुति मुळ्या उकरीतो ॥४७॥ द्वापरीं कळिकडे शिव होतो या कळींत विपरीत अहो तो वेदपाळक म्हणोनि म्हणावा भीम बुद्ध परि बौद्ध गणावा ॥४८॥ जसा बंधु होऊनि दुर्योधनाचा करी यत्न तन्मृक्त्यच्या साधनाचा तसा वेददायाद होऊनि दुर्योधनासी कळीमाजि सद्धर्म - सद्धोध नासी अहो सारख्या कृष्ण - भीम - प्रवृत्ती तंई क्षात्र आतां करी विप्रवृत्ती ॥५०॥ दीसतें मत बरें कळिमाजी आपल्या स्व - मत लोक - समाजी काजवे झळकती तमराती वेदसूर्यचि तुम्हांस अराती ॥५१॥हे प्रवृत्तिच अनादि पुराणी वर्णिती कुमति रीति पुराणीं कीं असेंच कळिमाजि घडावें तेधवां श्रुतिपथें विघडावें ॥५२॥ म्हणुनि सत्यवती सुत बोलतो तुम्हिंहि जाणत सालचि बोल तो निगमवृक्ष फळे दशमींच या वदतसे कळि - पातक - संचया ॥५३॥ म्हणे व्यास मेघांत पर्जन्य - काळीं तमें रात्रि जे जों घनी होय काळीं जई झांकती चंद्र - श्रुकादि होते प्रभा काजव्याची तंई फार होते ॥५४॥ पाप - मेघ - पडळीं कळिकाळीं मोहरात्रि अतिदारुण काळी झांकतां निगम - बोधक रीती स्वप्रकाश कुमतेंचि करीती ॥५५॥ पाखंड खद्योतचि दुष्टकाळीं प्रकाशती दुर्मति - रात्रिकाळीं वाखाणिती भेदचि लोकरीती सेवा हरीची कपटें करीती ॥५६॥ आवडे परम शंभु जंगमा चंदन प्रिय जसा भुजंगमा सेव्य विष्णुहि तुम्हांत तसा हो विष्णु - निंद्यकुमतांत असा हो ॥५७॥ बोल जो त्रिविध जीव बोलतो निंदितो स्फुट हरीस बोल तो मुक्तिदायक तंई नव्हे हरी सर्व - जीव - भव जो न संहरी ॥५८॥ जो मुक्तियोग्यचि तयासचि मोक्ष झाला मुक्ति प्रटत्व मग काय अधोक्षजाला त्या योग्यतेसहि नदे म्हणतां हरी तो संसारवंध तरि काय हरी हरीतो ॥५९॥ जो स्वयें धनिक त्यासिच वाणी दे कणीक इतरां करि वाणी दे कणीकहि न दे कनका हीं सेविल्या घण - मणी - कनकांही ॥६०॥ नदे अयोग्या हरि जेविं वाणी हे बोलताहे तुमचीच वाणी तच्छक्ति तेव्हां अतिदीनवाणी कीं मुक्ति तद्योगपणास वाणी ॥६१॥ जो योग्य त्या शक्त असोन देना कृपाळु कोणीच तया वदेना न शक्त तेव्हां असमर्थ झाला कां निंदिता हो गरुड ध्वजाला ॥६२॥ अशक्त कीं निर्दय त्यास बोला किंवा मनासींच धरा अबोला जें बोलणें यावरतें असारें एवं पहा हें मतदुष्ट सारें ॥६३॥ नामेंच तुष्ट हरि होउनि बोधरीती दे मोक्षसंमत नव्हे कुमतें धरीती ध्यानेंकरुनिहि न मुक्तिपथास दावी धिःकार त्यास जिहिं गोष्टि असी वदावी ॥६४॥ अयोग्या नव्हे ध्यान कां हो म्हणावे भयें ध्यान कंसादिकाचें गणावें भयें ध्यान अत्यंत झालेंचि ज्याला तुम्हीं मानितां मुक्ति जीवा दुज्याला ॥६५॥ सर्वा जरी मोक्ष न देव देतो दे योग्यतामार्ग जना वदे तो मागीतलें कल्पतरु जना दे साम्यें असा हो सुरराज नादे ॥६६॥ एवं तुम्हीं निंदुइतसां हरी तो कीं सर्वबंधा न हरी हरी तो देऊनि अंधंतमही कृपा हा करी असा ही म्हणतोच पाहा ॥६७॥ म्हणें तयांला सुख तेंचि वाटे तेव्हां वृथा चालति मुक्तिवाटे न मागती जन्म न दुःख पाहे अंधंतन्मीं मुक्तिसमा कृपा हे ॥६८॥ वाईट अंधंतम कां म्हणावें कां मुक्तियोग्या बरवें गुणावें वैराग्यकष्टाविण हीन मातें झालीं विरागें पुरुषोत्तमातें ॥६९॥ सुखें तई दुःखतमांत नाहीं न गर्भवासादिक यातनाहीं संसारिकांहूनि बरें म्हणावे कां दैत्य सर्वाधम ते गणावे ॥७०॥अभक्तां सुभक्तां तई तुल्प माना वृथा बोलतां भक्त - पक्षाऽभिमाना असे साम्य मोक्षास अंधंतमाचें असें सिद्ध कर्तृत्व सर्वोत्तमाचें ॥७१॥ असी कल्पना ही प्रमाणाऽनुसारी दिसेना वृथा गोष्टि वाईट सारी नव्हे मानितां निर्दयत्वाभिमाना वृथा वाहतां या स्वशास्त्राऽभिमाना ॥७२॥ मतें हीं कळीचीं महापापसंगें भविष्यें पुढें तीं विनोद - प्रसंगें विनोदीजनीं वर्णितां गायकांनीं करी हास्य घे जो जगत्काय कांनी ॥७३॥ वेदार्थ - दूषक - नव - श्रुति - कल्पकांची इत्यादि दाविति अहो मति रीति कांची कीं भेद लौकिकचि जो निगमीं असेना वेदश्रुती करि नव्या कळि - दुष्ट सेना ॥७४॥ जे द्वासुपर्णा श्रुति दोन पक्षी बोले तया मानिति भेद पक्षीं परस्परें भेद तयां वदेना तो वेद भेदात्मक भाव देना ॥७५॥ असे द्वाविमौ श्लोक गीतेंत दोन्ही वदे भेद त्याला न ऐसें वदोनी जसे द्वसुपर्णी तसे एथ जाणा कसा बोलवे भेद कृष्णा सुजाणा ॥७६॥ श्रुत्यर्थ ऐसाच महापुराणीं प्रवृत्ति हे नित्य असी पुराणी कीं हे उपाधीस्तव वेगळाले भेद स्वरुपीं अवघे गळाले ॥७७॥ भेदीं प्रमाण तरि एक तुम्हां दिसेना मोडीतसां सकळ अद्वय - भेदसेना ऐसें पुसे विरळत्या सुमहामतीतें सत्यं भिदा म्हणुनि दावितसे श्रुती तें ॥७८॥ जगीं पाठ ज्यां कां श्रुती विप्रसिद्धा तया वेगळ्या या श्रुती अप्रसिद्धा कुतर्के कुयुक्ती अशा लाख वीतां प्रमाणें तसीं कल्पिते दाखवीतां ॥७९॥ यतीलागिंही ज्या मतीं हेम - लाहो मत - छापना वाटते हे मला हो घडे ज्या मिषें लाभ रे साधनाचा नये लोभ रे कृत्रिमा साधनाचा ॥८०॥ नदे जो मतस्थाविणें बिंदु - तोया तुम्हां होतसे हो मनीं वेद्य तो या कळींत प्रतिष्ठा दिल्ही या मतातें असी बुद्धिरुप स्वयें कामता तें ॥८१॥ हिडंबा वधू द्वापरीं भीमसेना तिची पुत्र - पौत्रादि जे भीम सेना तुम्हीं भीमशिष्य स्वयें तेचि सारे जळाचा जनां बिंदु देतां कसा रे ॥८२॥ दयाहीनता वृत्ति हे राक्षसाची तुम्हांमाजि रे दीसती स्पष्ट साची मतस्थाविणें जे नपाजा जळाला स्वभाव स्वयें राक्षसाचा जळाला ॥८३॥ बुद्धें तुम्हां मोहन कामतातें केलें न हें जाणत या मतातें द्रव्यप्रतिष्ठार्थ धरुनि सारे विचार नेणा तुम्हि हा असा रे ॥८४॥ कंटाळलों मी तुमच्या मतातें देखोनि सर्वत्र असंमतातें पाहेन मी माधव सर्वभूतीं अद्वैत विद्या हरिची विभ ती ॥८५॥ विनोद वेदश्रुति - दुर्मतांचे करुनि इत्यादि असंमतांचे खेळोनि हे राक्षस विप्रवृत्ती निवेदिली हो कळिची प्रवृत्ती ॥८६॥ वेदामधें व्याकरणानुसार भेदार्थ वाखाणिति जे असार ते वर्णिले वैष्णव बोध रीती न वाद जे वेदमतीं धरीती ॥८७॥ असे जगीं वैष्णव नाम यांला महात्मता जेविं महात्मयाला गीतेसि तेही धरिती प्रमाण नेणोनियां व्याकरण - प्रमाण ॥८८॥ महात्मा असा शब्द गीतेंत नाना तया वाचितां ते करीती तनाना प्रमाणा जयालागिं ओव्या मराठ्या धरीती करीं काठिया ऊपराट्या ॥८९॥ अधःशाख काठी तिचें ऊर्ध्व मूळ प्रमाणास गीता जया ऊर्ध्वमूळ असा वर्णीतां धर्मही जंगमाचा करी हास्य तेव्हां स्थिराजंगमाचा ॥९०॥ अन्यही कुमत कुत्सक रीती वेष दाउनि पुढें उतरीती तो मनांत हरि हांसत राहे दुर्मती त्यजुनि सर्व - तरा हे ॥१९१॥ लीला - विनोद करितां मुनि त्या अजाला देखे असा विजय यांत चतुर्थ जाला लीलाविनोद विजयी प्रभु नाम याचें ठेवी दरिद्र हरणार सुदामयाचें ॥९२॥ N/A References : N/A Last Updated : June 29, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP