नाम सुधा - अध्याय २ - चरण ३

’नाम सुधा’ काव्यात वामनपंडितांनी नामाचे माहात्म्य अतिसुंदर भावपूर्णतेने वर्णन केले आहे.


अजितनाममहत्व अशापरी कथियलें बरवें हरिकिंकरीं

उभयदूत अतःपर वर्त्तनी कथिल तें शुभ भृमिपतीप्रती ॥१॥

शुक्र म्हणे हरिकिंकर येरिती परम वैष्णवधर्म तयांप्रती

करुनि निर्णय ते यमपाशही द्विजनिबंधक तोडियले तिहीं ॥२॥

दूतीं यमाच्या मग काय केलें अजामिळाचें मग काय झालें

अध्यायपर्यत मुनींद्रवाणी बोलेल हें सर्व महा - पुराणीं ॥३॥

यानंतरें कुपित ते यमदूत जेथें

गेले त्वरें करुनियां यमधर्म जेथें

वृत्तांत हा वदति संयमनीपतीला

जोकांजगीं त्वदेनुशासनभंग झाला ॥४॥

आतां द्विजें क्षणहि वैष्णव - संगतीनें

केलें पहा स्वहित जें वृषलीपतीनें

सांगेल तें शुक मुनींद्र महीषतीला

तें आइका द्विज सुमंगल केविं झाला ॥५॥

नृपा विप्र निष्पाप निष्पाश झाला भयें सोडिलें सर्वथा त्या द्विजाला

करी वंदनें दूत पादांबुजाला धरी मस्तकीं आदरें त्या रजाला ॥६॥

विप्रास आयुष्य असोनि देवें यमासही मोहुनि वासदेवें

तो दूत हस्तें द्विज आणवीला स्वकिंकराहातुनि सोडवीला ॥७॥

स्वकिंकरांच्या वदनें तयाला श्रीवल्लभें हा उपदेश केला

यानंतरें वांचतसे द्विजाती ऐशामधें ते हरिदूत जाती ॥८॥

आयुष्य दोष म्हणऊनि पुन्हा शरीरीं

विप्र प्रवेश करि सूक्ष्म - शरीर - धारी

त्या देखतांचि हरिकिंकर गुप्त झाले

अस्ताचळाप्रति दिवाकर चारिगेले ॥९॥

त्यानंतरें वृत्ति अजामिळाची कथा महत्संगतिच्या फळाची

श्लोक - त्रयें प्रस्तुत त्या द्विजाला हें सांगतों कीं अनुताप झाला ॥१०॥

अनंतदूतांसि छतांतदूतीं निवेदिली वैदिक - धर्मरीती

अन्याय ते सर्व अजामिळाचे निवेदिले दंडहित्या फळाचे ॥११॥

कृतांत दूतांसि अनंतदूर्ती निरुपिले वैष्णव - धर्म संती

सद्भक्ति त्यांच्या वचनें द्विजाला ऐकोनि पापें अनुताप झाला ॥१२॥

म्हणतसे मम कर्म पहा पहा नृपलिपासुनि वार दहा दहा

उपजलों उदरांत अहा अहा पतित मी पतितांत महा महा ॥१३॥

ब्राम्हण्य म्या बुडविलें वृषलीपतीनें

आयुष्य हें दवडिलें अति दुर्मतीनें

ऐसें स्मरोनि निज सर्व कुकर्म पापें

दुःखी अजामिळ बहू स्वकृताः नुतापें

श्लोकत्रयेंकरुनि आणिक ही स्वकर्मे

तो आठवील घडलीं जितुकीं अकर्मे

जों पूर्व - कर्म - अनुताप मनास नाहीं

तो सत्सर्थी रुचि मना उपजे न कांहीं ॥१५॥

जें दीपतुल्य कुळ काजळ त्यांत झालीं

धिक्कार हा मजचि जो कुपथी रिघालों

स्त्री धाकुटी बहु भली तिस टाकिलें ग्या

जे मद्यपी धरिली ते वृषली अगम्या ॥१६॥

परम वृद्धपिता जननी बरी मजविणें गति ज्यांस न दूसरी

बहु तपोनिधि - आणि तपस्विनी त्यजियली अकृतज्ञपणें वनीं ॥१७॥

आतां मला नरक होतिल मोठ मोठे

धर्मघ्न जेथ पचनी अतिदुष्ट खोटे

ऐसा अजामिळ मनीं बहुतप्त झाला

एथूनि वर्णितिल जें घडलें द्विजाला ॥१८॥

नरक - हरण - चिंता प्राप्त होतां द्विजाला

स्मृतिगन हरि - दास - प्रोक्त वृत्तांत झाला

द्विजमग हरिनामीं आत्मकल्याण मानी

म्हणुनि कथिल आतां पंचपद्येंकरुनी ॥१९॥

श्लोकद्वयें आठउनी तयाला संवाद अन्योग्य जयांत झाला

श्लोकत्रयें ब्राम्हण त्या करुनी कल्याण माझें म्हणऊनि मानी ॥२०॥

म्हणे हें प्रत्यक्षें नयनिं दिसलें स्वप्न अथवा

तिघे कोठें गेले धरुनि मज जे वोढिनि जिवा

अहा गेले कोठें पुरुष चवघेही जिहिं मला

बळें त्यांपासूनी हरुनि नयनाऽनंद दिधला ॥२१॥

मी तों अगण्य पतितांतहि अग्रगण्य

प्रख्यात मद्यपि नथापिहि काय पुण्य

कीं देखिलें नयनि त्या विबुधोत्तमानें

तेणें प्रसन्न मन नाशितसे नमातें ॥२२॥

नाहींतरी मज अमंगळपापियाचे

ये केविं या मरणिं माधवनाम वाचे

मी दुष्ट नष्ट अतिपातकि काम खोटें

नारायणा म्हणुनि मंगळ नाम कोठें ॥२३॥

ऐसें असोनिहि सुखीं हरिनाम आलें

नेणों मह्यसुकृत कोटुनि हें उदेलें

मी नों स्वयें पतित निर्लज विप्रहंना

होणार काय मज हें न जयासि चिंता ॥२४॥

द्विज असें शुभसूचक मानुनी स्वहित केवळ चिंतिल एथुनी

कथिल तो सुमनोरथ निश्चयें शुक मुनीश्वर पद्यचतुष्टयें ॥२५॥

द्विज अतः पर यत्न म्हणे करुं पवन इंद्रियचित्तहि आवरुं

मन बुडे न नमांत पुन्हा जसें करित साधन - वृंद म्हणे तसें ॥२६॥

छेदूं बंध अनादिही प्रथम जो झाला अविद्याबळें

जीच्या आवरणें सुरवासि सरतां दुर्वासनेचीं कुळें

विक्षेंपें बहु कामना उपजतां कर्मे करी वोंगळें

त्यांची भोगिलिया विणें न चुकती जी कर्ममूळें फळें ॥२७॥

सांख्यें आत्मअनात्मता निवडतां शब्दें अविद्या हरुं

योग - ज्ञान - हुताशनांत अवघ्या वृत्तींसिही सहरुं

तेव्हां संचित नाशतां उपजती कर्मे अकर्मेपणीं

प्रारब्धासहि भोगिनांच सरऊं ऐक्येंउरुं निर्गुणीं ॥२८॥

जों प्रारब्ध असेल नोंवरि भजों सर्वात्मभावेंहरी

पाहों तो स्थिर जंगमीं बहुघटीं मातीच जैसी खरी

जे मध्यस्थ अमित्र मित्र अवघे तदूप पाहों रचयें

सर्वाचा प्रिय सोयरा निजसखा आत्मा असा निश्र्वयें ॥२९॥

ऐसे निश्र्वय गुंफितां वृषलिचे फांसे गळां प्रीतिचे

देखे आठवती विशेषहिसुरक्त्रीडादिकीं जे तिचे

या पापेंचि कृतांत - पाश पडले होते पहा हो मला

ऐसें आठवितां विरक्ति उठतां तात्त्काळ झाला भला ॥३०॥

ऐसे हे विषयांत दोष नसतां कां टाकिती हो भले

मिष्टान्नीं विष येरिती विषय ते त्या ब्राम्हणा वाटले

बोले प्रस्तुत आर्यकार्य करणें की हे जगन्मोहिनी

माया स्त्रीसम ईस टाकुनि निघों निःसंग संगीं वनीं ॥३१॥

करुनि मर्कट नाचविलें मला कट कटा अनिलंपट मी तिला

प्रियनमा अधमा मज वाटली वय समस्त घडी जसि लोटली ॥३२॥

हा देह मी म्हणुनि मानुनि दुष्ट - कर्मे

आयुष्य म्य सरविलें अवघें अधर्मे

प्रत्यक्षही जड असत्य जिता शवाला

नाहीं प्रतीति इतुकें न कळे जिवाला ॥३३॥

आतां म्हणे द्विज अहंममता शरीरीं

टाकीन जे चिर तृषा रवि - रश्मि - नीरीं

उलुंघनें कठिण यद्यपि विष्णुमाथा

तन्नाम - कीर्त्तन - उपाय असे नराया ॥३४॥

करिन कीर्तन मी दिन - यामिनी स्फुरति काम - गृहें सुत - कामिनी

जस जसें सुख होइल कीर्तनीं नस तसामग निर्लज नर्तनीं ॥३५॥

अशा कीर्तनी नर्तनी चित्तशुद्धी त्वरें होउनी होतसे ध्यान - शुद्धी

हरीच्या पदीं स्थैर्य चित्तास जेव्हां स्फुरे विष्णु आत्मा स्वतःसिद्ध तेव्हां

उपजले सुमनोरथ जे जसे द्विज समस्तहि आचरला तसे

त्यजिल सर्वहि तो मन नेमुनी म्हणुनि एथुनियां बदतो मुनी ॥३७॥

क्षर्णेक - सत्संगतिच्या फळानें केलें तसें सर्व अजामिळानें

उदासता ते रुचली द्विजाला सांडूनि दासी हरिदास झाला ॥३८॥

गंगा द्वारासि गेला मनिंहुनि पहिला संग तो टाकियेला

गातां वाचे हरीला मन - मळ हरिला श्रीहरी मोहरीला

ध्यानी तन्निष्ठ झाला हदयिं उमजला विष्णु आत्मा द्विजाला

ध्यानां श्रीमाधवाला भवदेव शमला नामनादें निवाला ॥३९॥

द्विजाची शुकाचार्य वैकुंठयात्रा वदूं पाहतो पंडुच्या पुत्रपोत्रा

असे मूळिंचे पांच हे श्लोक आतां करीतील टीका मुखें सौख्य गातां

क्वचित् गंगातीरीं हरिगृहिं हरिद्वारनगरीं

निजा चिंता योजी द्विजवर चिदाकाश - कुहरीं

दृढ प्रत्याहारें नियमुनि मनीं इंद्रियगणा

चिदाकारें चित्तें - करुनि भजतां विप्र अगुणा ॥४१॥

चिदाकारा - चित्ता - हुनिहि निज आत्मा पलिकडे

असें योगी पाहे तरिच मनि हे उन्मनि पडे

चिदाकारें आहे मन म्हणुनि राहेल तितुका

निरोधी त्या वृत्ती उपजतिल हा योग इतुका ॥४२॥

न जेथें चिच्छक्ती सहजचि असे निर्गुणपणीं

अखंडाऽनंदाचा अनुभव असे ऐक्यसगुणीं

असे देवाजीवा सहज अगुणीं ऐक्यचि परी

असा आत्मा पाहे तरिच कळला त्यासिच हरी ॥४३॥

पृ० छंद - अशा अनुभवीं दिल्ही बुडि अजामिळाच्या मनें

समाधि सरतां मनीं किमपि इच्छिलें चिंतनें

अशांत हरिदास ते नयनिं चौघही देखिले

द्विजें वळखिले मनीं सतत जे सुखें रेखिले ॥४४॥

करी जों नमस्कार चौघां जणाला जसे चौघ तेपांचबा विप्र झाला

पडे अंग पूर्वीच गंगाप्रवाहीं भुजा चारि देखे नव्या दिव्यदेहीं ॥४५॥

करिं गदांबुज अंबुद - सांवळा कटितटीं तडिदंवर मेरवळा

सतन षोडशवार्षिक कोंवळा हरि करी हरिनाम अजामिळा ॥४६॥

जलज शंख रथांग गदा करी कनकरत्नविमान तयावरी

द्विज अजामिळ तो हरि किंकरीं मिरविला हरि - पार्षदशेखरीं ॥४७॥

असा विप्र वैकुंठलोकासि नेला फिरेनापुन्हा जो असा तेथ गेला

म्हणूनि स्वयें श्रीपती स्वामी जेथें ऋषी बोलतो पावला विप्र तेथें ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP