पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद् दारवीमपि ।
स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥१३॥
पहा पां षष्टिहायन भद्रजाती । त्यांपुढें मनुष्य तें किंती ।
ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें ॥२२॥
जो दृष्टीं नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी ।
त्यांचेनि बोलें उठी बैसी । माथां अंकुशीं मारिजे ॥२३॥
एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी ।
तिंही देखोनि योषितांसी । लागवेगेंसी पळावें ॥२४॥
नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी ।
स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठीं पळावें ॥२५॥
पळतां पळतां पायांतळी । आल्या काष्ठाची पुतळी ।
तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥२६॥
अनिरुद्धें स्वप्नीं देखिली उखा । तों धरूनि नेला चित्ररेखा ।
बाणासुरें बांधिला देखा । कृष्णा सखा जयाचा ॥२७॥
त्यासी सोडवणेलागीं हरी । धांवतां आडवा आला कामारी ।
युद्ध जालें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण ॥२८॥
एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता ।
तो सहसा न सुटेची शोचितां । इतरांची कथा कायसी ॥२९॥
पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता ।
मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता त्या कैचा ॥१३०॥
'पुरुष' आपणया म्हणविती । सेखीं स्त्रियांचे पाय धरिती ।
त्यांसी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसंगतीं अधःपात ॥३१॥