मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय आठवा|

एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्‍भावैरजितेन्द्रियः ।

प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥

दैवी गुणमयी जे माया । तिचें सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।

तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥

हावभावविलासगुणीं । व्यंकट कटाक्षांच्या बाणीं ।

पुरुषधैर्य कवच भेदोनि । हृदयभवनीं संचरती ॥७१॥

दारुण कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।

योषिताबंदीं पाडिले नाहीं । भोगकारागृहीं घातले ॥७२॥

स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।

तोंडीं घालितां मधुर विख । परिपाकीं देख प्राणांतू ॥७३॥

दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।

बळें आलिगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥

पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती ।

तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पंतगन्यायें ॥७५॥

तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य उपजे स्त्रीसुखा ।

तत्संसर्गें मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥

दीप-रूपाचेनि कोडें । पतंग जळोनि स्नेहीं बुडे ।

तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे । पतन रोकडें अंधतमीं ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP