गुरूची आरती - ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


ब्रह्मानंद सुखाचा तूं कंद बापा ।

भावातीता हरसी दासत्रयतापा ॥

अगाध महिमा तुझा कोण करी मापा ॥

मंगळधामा रामा सद्‌गुरु निष्पापा ॥ १ ॥

जय देव जय देव जय आलक्ष्य लक्ष्या ।

जय गुरुराज दयाघन शिश्वांतर साक्षा ॥ धृ. ॥

होउनि सकृप मूढां तूं हातीं धरिसी ।

अधनग भस्म करोनि त्यांतें उद्धरिसी ॥

स्पर्शुनिं मस्तकीपाणी त्यां ब्रह्म करिसी ।

आत्मस्वरुपा दाविसीं होउनियां आग्सी ॥ २ ॥

अग्नी काष्ठां देता अपुलें रुप जसें ।

आपण करितां प्रेमें शिष्यांलागि तसे ॥

शिष्यांचें तव स्मरणें भवभय नासतसे ।

सदैव ब्रह्मस्वरुपीं होउनि राहतसे ॥ ३ ॥

ऎसा तूं गुरुराया विश्वाचा दाता ।

सकृत होउनि कळवी मजला वेदांता ॥

महाराजा अजुनी तारि अंत किती पाहतां ।

दास म्हणे मी बुडतों काढि धरुनि हाता ॥ जय. ॥ ४ ॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP