मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत स्वयंवर|
बघ शिके लता मी नगरची कला ...

संगीत स्वयंवर - बघ शिके लता मी नगरची कला ...

श्री रूक्मिणीस्वयंवराच्या सर्वश्रुत कथानकातील, श्रीकृष्ण व रूक्मिणी यांच्या चरित्रातील उदात्त तत्वे श्री. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी नाटकाद्वारे प्रेक्षकांपुढे मांडली.


बघ शिके लता मी नगरची कला ।

अशा या वनी शांत दिसे हे नगर,

फिरे हा महावात म्हणे मी नृपवर; सबल नृपति विटप गमति,

वदति 'करचि लग्न' मला ॥ध्रु०॥

वनश्रीकरी पुष्पमाला विराजे; नवी माळ ही लग्नवेळेसि साजे;

महा वायु तो तीव्र वेगेचि आला; नसे बंधु हा लग्न मोडोनि गेला ।

वरावे कुणाला न ठावे मनाला, धरी ह्या कराला वसंता सुकाला ॥१॥

(चाल - 'मेरो दिलको चुराके.')

नाचाचे पद

N/A

References : N/A
Last Updated : January 04, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP