मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग|
भोळ्या भाविकांसी सांपडले ...

संत वंका - भोळ्या भाविकांसी सांपडले ...

संत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.


भोळ्या भाविकांसी सांपडले वर्म । सुलभ हें नाम विठोबाचें ॥१॥

भवाचा उतार हरिनाम सांगडी । जाऊं पैलथडी हेळामात्रें ॥२॥

आनंद सोहळा हरिकथा माउली । भाविकां वोळली प्रेमपान्हा ॥३॥

वंका म्हणे माझ हाचि निर्धार । येणे संसार देशधडी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP