मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह १|
आमुचे सुखदु :ख कोण दुजा व...

संत सोयराबाई - आमुचे सुखदु :ख कोण दुजा व...

संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो.


आमुचे सुखदुःख कोण दुजा वारी । तुम्हीच श्रीहरी मायबाप ॥१॥

तुमच्या उच्छिष्टाची धरोनियां आस । बैसले रात्रंदिवस धरणेकरी ॥२॥

परी तुम्हां न ये आमुची करूणा । केधवा येईल मना तुमचिया ॥३॥

काम क्रोध लोभ मदमत्सर वैरी । हे झडकरी वारी मायबापा ॥४॥

म्हणोनी धरिलें तुमचे पदरा । म्हणतसे सोयरा चोखियाची ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP