सत्यदत्त व्रत कथा - अध्याय चवथा

योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.


श्रीदत्त ॥ सूत उवाच ॥ नतावनात्तसुभगव्रतोऽयं परमेश्वरः ॥
तत्प्रभावं मुनिश्रेष्‍ठाः पुनः शृणुत सादरम् ॥१॥
गोदावासी द्विजः कश्चिद्धरिशर्मा तदात्मजः ॥
द्विदशाब्दो यस्य जन्या गुल्मोऽष्टाब्दः क्षयोऽभवत् ॥२॥
त्र्यब्दो जलोदरे जीर्णज्वर एकाब्द आयनः ॥
अतिसारः सकासश्च चातुर्मास्यो भगन्दरः ॥३॥
त्रिदोषेणापि संक्रान्तं प्रेक्ष्य मृत्यून्मुखं पतिम् ।
तद्भार्या षोडशाब्दाऽगाच्छरणं विष्णुदत्तमित् ॥४॥
सौभाग्यं देहि मे ब्रह्मन् भर्ता मे रोगपीडितः ॥
अत्युकटाः प्रतीकारा दैवाज्जाता निरर्थकाः ॥५॥
श्रीदत्त ॥ श्रीसूत असे म्हणाले की, "शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्रीदत्तात्रेय आहे. याकरिता हे मुनिश्रेष्‍ठ हो ! पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा. ॥१॥
श्रीगोदातटी राहणारा श्रीहरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, आठ वर्षाचा क्षय, तीन वर्षांचा जलोदर, एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते. तसेच चार महिन्यांपासून भगंदरही झाला होता. ॥२-३॥
शेवटी त्रिदोषाने व्याप्त झालेल्या त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून, अत्यंत दुःखी झालेली त्याची सोळा वर्षांची स्त्री, परम श्रीदत्तभक्त श्रीविष्णुदत्तांना शरण गेली ॥४॥
व असे त्यांना म्हणाली की, "हे ब्रह्मन् ! मला सौभाग्य द्या. माझे पती रोगपीडित झाले आहेत आणि त्यांना केलेले अतिशय
चांगले औषधोपचारही दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत." ॥५॥
इत्यर्थितो दयालुः स साध्व्या तद्रृहमेत्य तम् ॥
दृष्‍टवा कर्मविपाकं च पत्न्या व्रतमकारयत्॥६॥
क्रमेणाशु लयं प्राप तत्तद्रोगः प्रतिव्रतम् ॥
द्विजोऽथ तं ह्रदि स्पृष्‍टवा जजापोपनिषन्मुनम् ॥७॥
नीरुग्लेभे द्विजस्तेन भूतिमायुः प्रजा यशः ॥
दिव्यां गतिं दत्तभक्तिमिहामुत्र च सद‌गतिम् ॥८॥
एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं पापप्रणाशनम् ॥
तुष्टिदं पुष्टिदं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥
श्रीदत्तानुग्रहेणैव कथितं च समासतः ॥९॥
वेदधर्मा उवाच ॥ एवं सूतमुखात्‌श्रुत्वा नैमिषेया महर्षयः ॥
श्रद्धया सत्यदत्तस्य व्रतं चक्रुः सुसंहताः ॥१०॥
त्या साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता, दयाळू श्रीविष्णुदत्त तिच्या घरी गेले. नंतर तिच्या पतीला पाहून व कर्मविपाक शास्त्राचे अवलोकन करुन त्या साध्वी स्त्रीकडून श्रीसत्यादत्तव्रत करविते झाले. ॥६॥
त्यामुळे क्रमाने प्रत्येक व्रतांपासून ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर श्रीविष्णुदत्तांनी त्या ब्राह्मणाच्या ह्रदयाला स्पर्श करुन उपनिषन्मंत्राचा जप केला. ॥७॥
त्यामुळे तो ब्राह्मण, रोगमुक्त होऊन, इहलोकी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती व श्रीदत्तभक्ती यांचा लाभ करुन घेऊन शेवटी परलोकी उत्तम गतीस प्राप्त झाला. ॥८॥
याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत, मनुष्यांना पापनाशक, तुष्‍टी देणारे, पुष्‍टी देणारे, भुक्ती व मुक्ती देणारे असे आहे. श्रीदत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे." ॥९॥
श्रीवेदधर्मा असे म्हणाले की, "हे दीपका ! असे श्रीसूतांच्या मुखातून श्रवण करुन, नैमिष्यारण्यातील महर्षी, एकाग्रचित्त होत्साते श्रद्धेने श्रीसत्यदत्ताचे व्रत करते झाले. ॥१०॥
सत्रधर्मेण ते वत्स कांक्षंतो दर्शनं विभोः ॥
दध्युरेकाग्रमनसो दत्तदेवपदाम्बुजम् ॥११॥
अथ वायुः सुख स्पर्शः पुण्यगन्धवहो ववौ ॥
तमनु ज्योतिषां राशिराविर्भूतः स्वमामया ॥१२॥
तेजोमण्डलमध्यस्थमुद्यन्तमिव भास्करम् ॥
श्रीसत्यदत्तं द्रष्‍टुं तमशक्ताश्चर्मचक्षुषा ॥१३॥
निमील्याक्षीणि ते विप्राश्चिन्तयन्तो हरिं हृदि ॥
प्रार्थयामासुरव्यग्राः कथं नो दर्शनं भवेत् ॥१४॥
इति चिन्तयतां तेषां वागासीन्मेघनिस्वना ॥
उन्मीलयत नेत्राणीत्यनन्तेनेरिता द्विजाः ॥१५॥
हे वत्सा दीपका ! यज्ञदीक्षा घेतलेले ते महर्षी, प्रभू श्रीदत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे, एकाग्रचित्ताने श्रीदत्तदेवांच्या पदांबुजाचे ध्यान करते झाले. ॥११॥
नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्रीदत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले. ॥१२॥
उदय पावणार्‍या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडलाच्या मध्ये असणार्‍या श्रीसत्यदत्ताला, चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत. ॥१३॥
नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होत्साते, ह्रदयामध्ये श्रीहरीची प्रार्थना करिते झाले. ॥१४॥
आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल, याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असताना, मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ती अशी की, "हे ऋषीहो ! नेत्र उघडा." अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत्स्वरुप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करते झाले. ॥१५॥
ततो ददृशिरे सर्वे शुद्धचित्ताश्च तुष्‍टुवुः ॥
ऋषय ऊचुः ॥ नूनं भवानृषिर्नैव न वर्णाश्रमलिङगभाक् ॥
निर्मितं भवतैवेदं विश्वं स्वांशांशतोऽखिलम्॥१६॥
न जानन्ति भवन्मायामोहिता दिव्यमुत्तमम् ॥
भवद्धामात एवैते श्रमन्त्यसुरभावगाः ॥१७॥
कर्ता भर्तासि हर्ता त्वं प्रत्यक्षं तत्त्वमस्यपि ॥
भो सर्वं खल्विदं ब्रह्म त्वमस्यात्मासि केवलम् ॥१८॥
त्वदुदेति रमत्येतद्विश्वं त्वय्येव लीयते ॥
अष्‍टमूर्तिभिराभिस्त्वमाभासीव जगन्मयः ॥१९॥
निगूढतत्त्व ते ज्ञातं यत्किञ्चिल्लोकदुर्ग्रहम्॥
चेष्‍टितं, ते प्रसादोऽयं प्राक्पुण्यैरनुभूयते ॥२०॥
ऋषी असे म्हणाले की, "खरोखर आपण ऋषी नाही. तसेच वर्णाश्रमचिह्न धारण करणारेही नाही; तर आपण त्रिगुणातीत परब्रह्मस्वरुप आहात. आपणच स्वांशांशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे. ॥१६॥
आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक, आपले दिव्य, उत्तम, सत्य असे तेजोमय रुप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात. ॥१७॥
तू या विश्वाची उत्पत्ती, पोषण व संहार करणारा आहेस. प्रत्यक्ष ब्रह्मतत्त्व तूच आहेस. हे परमात्मन् ! हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरुप आहे आणि तू सर्वात्मा आहेस. ॥१८॥
तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रममाण होते व तुझ्या स्वरुपात लीन होते. पृथ्वी, जल, तेज, वायू,. आकाश, सूर्य, चंद्र व अग्निहोत्री ब्राह्मण या आठ रुपांनी जगन्मय तूच भासत आहेस. ॥१९॥
तुझे अत्यंत गूढ असे स्वरुप, सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रुप आम्ही जाणू शकलो, हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे." ॥२०॥
वेदधर्मा उवाच । एवं स्तुतस्तदा तुष्टो विश्वं स्वस्मिन्नदर्शयत्॥
उवाच च मुनीन् देवो मेघगम्भीरया गिरा ॥२१॥
जानीतमागतं विप्राः प्रसादा भवत्स्विह ।
तपसा ब्रह्मचर्येण यमेन नियमेन च ॥२२॥
यज्ञादिना च बहुभिर्जन्मभिस्तोषितो ह्यहम् ॥
सत्यदत्तव्रतेनातो वरं वृणुत माचिरम् ॥२३॥
ऋषय ऊचुः ॥ ज्ञापयास्मान् महादेव स्वभक्तान् कुरु निवृतान्॥
येन त्वमस्यात्मसाक्षी किं ब्रूमोऽनुग्रहं कुरु ॥२४॥
श्रीसत्यदत्त उवाच ॥ यद्यूयं श्रद्धया स्तोत्रं कृतवन्तश्च मे प्रियम्॥
योगसिद्धिकरं नृणां भुक्तिमुक्तिप्रदायकम् ॥२५॥
याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्‍ट झालेले परमात्मा श्रीदत्तात्रेय, त्या ऋषींना, सर्व विश्व आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी दाखविते झाले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना असे म्हणाले की, ॥२१॥
"हे ब्राह्मणहो ! तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे, ब्रह्मचर्य, यमनियम, यज्ञयाग इत्यादि साधनानुष्‍ठानामुळे, तसेच या तुम्ही केलेल्या सत्यदत्तव्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्‍ट झालो आहे. याकरिता तुम्ही लवकर इष्‍ट तो वर मागून घ्या." ॥२२-२३॥
त्यावेळी श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की, "हे महादेवा ! तूच आम्हास स्वस्वरुपाचे ज्ञान करुन देऊन, स्वभक्त व शांतचित्त कर; कारण तूच सर्वसाक्षी आहेस. आम्ही काय बोलावे ? आपणच आमचा मनोरथ जाणून, सर्वतोपरि योग्य असा अनुग्रह करा." ॥२४॥
श्रीसत्यदत्त असे म्हाणाले की, "जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योगसिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे असे आहे. ॥२५॥
देहान्ते मत्परानन्दस्वरुपं परमं पदम् ॥
मनोवाचामविषयं यास्यथात्रैव सुव्रताः ॥२६॥
सन्निपाताक्षिरुङ्‌मेहकुष्‍ठश्र्लेष्मक्षयज्वरान् ॥
वातपैत्तिकगुल्माद्यान् देशाद्युत्थान् हरेदिदम् ॥२७॥
पुत्र वन्ध्याऽभयं त्रस्तो निःस्वः स्वं रोग्यनामयम् ॥
मुमुक्षुः सद्गतिं यद्यद्यस्येष्‍टं स लभेद् व्रतात् ॥२८॥
वेदधर्मा उवाच ॥ इत्युत्क्त्वान्तर्दधे देवः सहसा
महसां निधिः ॥
स्वप्नदृष्‍ट इव स्वार्थो मुनयो विस्मयं ययुः ॥२९॥
एवं प्रभावं श्रीदत्तं शरणागतवत्सलम्॥
स्मर्तृगामिनमिशानं सम्पूज्य हरमाप्नुहि ॥३०॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्‍ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तोपाख्याने पञ्चमोऽध्यायः ॥५॥
श्रीदत्तात्रेयापर्णणमस्तु ॥श्रीदत्त॥
हे उत्तम अनुष्‍ठानशील ब्राह्मण हो ! तुम्ही या जन्मीच देहांती, मन व वाणीला गोचर न होणार्‍या माझ्या परमानंदस्वरुप श्रेष्‍ठपदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. ॥२६॥
तसेच हे सत्यदत्तव्रत, सन्निपात, नेत्ररोग, मेह, कुष्‍ठ, श्र्लेष्म, क्षय, ज्वर, वातविकार, पित्तविकार, गुल्मरोग, देशात स्वचक्र, परचक्र, इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. ॥२७॥
या व्रताने, वंध्या स्त्रीस पुत्र होईल. संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल. रोग्याला आरोग्य प्राप्ती होईल. मुमुक्षू पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्‍ट असेल ते त्याला या श्रीसत्यदत्तव्रताच्या योगाने प्राप्त होईल." ॥२८॥
श्रीवेदधर्मामुनी असे म्हणाले की,"दीपका ! याप्रमाणे बोलून, स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्यराशीप्रमाणे तेजोराशी देवाधिदेव श्रीदत्तराज एकदम अंतर्धान पावले, हे अवलोकन करुन श्रीशौनकादि ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. ॥२९॥
वत्सा श्रीदीपका ! असा ज्या श्रीप्रभूचा प्रभाव आहे अशा शरणागतांविषयी दयाळू, स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणार्‍या सर्वेश्वर श्रीदत्तात्रेयांचे पूजन, श्रद्धाभक्तीने करुन तूही परमानंदाला प्राप्त हो." ॥३०॥
॥इति श्रीदत्तोपाख्यान पंचमोध्यायः॥श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु॥श्रीदत्त॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP