मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत फंदी|फटका| उपदेशपर फटका २ फटका उपदेशपर फटका १ उपदेशपर फटका २ उपदेशपर फटका ३ उपदेशपर फटका ४ उपदेशपर फटका ५ उपदेशपर फटका ६ फटका - उपदेशपर फटका २ अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला. Tags : anant phandiphatakaअनंत फंदीफटका उपदेशपर फटका २ Translation - भाषांतर येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥ दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥ असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥ क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥ परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥ सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥ आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥ N/A References : N/A Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP