मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
फसवणूक

फसवणूक

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


उगिच कशाला पाहशि लावुनि आस ? ध्रु०

जुई बहरली, कळी उमलली, परि न मिळे तुज वास. १

भरली कैरी सरस सुनेरी ये न तुझ्या हातांस. २

रे, लुसलुसलें पांखरुं फसलें दुसर्‍याच्या जाळ्यास. ३

देवच रुसला, सौदा फसला, गळे ओठिंचा घास. ४

अभागि पांथा, चुकशी पंथा, लाग अतां मार्गास. ५

केविलवाणें तोंड दिवाणें माझ्या रुते जिवास. ६

जा जा ! दुसरी पहा मंजरी, सजव तुझ्या ह्रदयास. ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - पिलू

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २० ऑक्टोबर १९३४


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP