निजतेज बीज नाठवे हा देह । हरपला मोह संदेहेसी ॥ १ ॥
काय करूं कैसें कोठे गेला हरि । देहीं देहमापारीं हरि जाला ॥ २ ॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं । चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥ ३ ॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक । देखिलें सम्यक् समरसें ॥ ४ ॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा । समाधि सोहळा विष्णुरूप ॥ ५ ॥
ज्ञानगाये हरिनामामृत । निवृत्ति त्वरित घरभरी ॥ ६ ॥