आपुलेनि हातें कवळु समर्पी । ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
सोपान सावंता निवृत्ति निधान । यासि जनार्दन कवळ देतु ॥ २ ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरीं । सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥ ३ ॥
देऊनि हस्तक पुशी पीतांबरें । पुसतसे आदरें काय आवडे ॥ ४ ॥
राहीरखुमाबाई कासवीतुसार । अमृत सार सर्वाघटी ॥ ५ ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता । हरि कवळु देतां तृप्त जाले ॥ ६ ॥