मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
अयोध्या पुरपट्टन शरयूचे त...

रामचंद्राचीं आरती - अयोध्या पुरपट्टन शरयूचे त...

रामचंद्राचीं आरती


अयोध्या पुरपट्टन शरयूचे तीरी ।
अवतरले श्रीराम कौसल्येउदरीं ॥
स्वानंदे निर्भर होती नरनारी ।
घेऊनि येती दशरथ मंदिरीं ॥ १ ॥
जय देव जय देव जयजी श्रीरामा ।
आरती ओंवाळूं तुज पूर्णकामा ॥ धृ. ॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनींहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभित झाले या क्षीती ॥
अप्सरा गंधर्व गायने करिती ।
त्रिभुवनीं आल्हादे मंगलें गाती ॥ जय. ॥ २ ॥
कर्णी कुंडल माथा मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळसुकपोली नेत्रद्वय जलते ।
षट्‌पदरुणझुणशब्दे नभमंडळ गाजे ॥ जय. ॥ ३ ॥
रामचंद्रा पाहतां वेधलि पैं वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळूं विसरली पातीं ॥
सुरनर किन्निर जयजयकारें गर्जती ।
कृष्णदासा अंतरि श्रीराममूर्ती ॥ जय देव. ॥ ४ ॥

N/A

N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP