रामचंद्राचीं आरती - आरती रामचंद्रजींचीं । सुज...
रामचंद्राचीं आरती
आरती रामचंद्रजींचीं । सुजानकि राघवेंद्रजीची ॥ धृ. ॥
ध्वजांकुश शंख पद्मचरणा ।
कांति ती लाजविती अरुणा ॥
नखमणिभाति मग्नशरणा । फलद उषशमा जन्ममरणा ॥ चाल ॥
तोडर गुल्फ गजरशाली ।
ग्रथित दशवदन, प्रभुति धृती कदन, विजित सुरसदन, भ्रमसुर कीर्ति वंदनाची ।
निरांजनी कीर्ति वंदनाची ॥ आरती. ॥ १ ॥
तडित्प्रभ पीतवसन जघनी ।
जडित कटि रत्नसुत्र वसनी ॥
जनकजा अंकित शिवजघनीं ।
शिरद्रमि मृगांकवदनी ॥चाल ॥
सुसर हे मुक्तहार कंठी ।
सरळ करि धनुष येष धरि मनुष,
सत्वरी कलुषहरण उटि तनुसि चंदनाची ॥
उटि तनुसि मलयचंदनाची ॥ आरती. ॥ २ ॥
त्रिवली राजित रुइसुम गळां ।
नाभिह्र्द लाजविती इंगळा ॥
उत्तरी यज्ञोपवित गळां ।
वक्षस्थलिं भृदगपदांग सकला ॥ चाल ॥
एकावली दिव्य खङगकोशी ।
विष्टिशत विशांग, शिरपर पिशांग, पक्षजी विशांग, घटितमणी कंकणां गदाती ॥
दिप्तीवर कंकणांगदाची ॥ आरती. ॥ ३ ॥
आनन पुर्णेदु वमन मलिनें ।
कृपार्द्रांकरण नयन मलिनें ।
स्मिताधर रदनरवेवलिनें पाहतां धृतृजन्म मलिनें॥ चाल ॥
मृगमदातिलक उंचभाळी ।
धनुषकोटी; रभिरव कोटी, रगरवकोटी, रविद्युतितरळ कुंडलाची ॥
गुंतली स्फूर्ति कुंडलाची ॥ आरती. ४ ॥
सदसि पुष्पकासना वरती ।
शिरद्रूमि छत्र लसद मूर्ती ॥
सुशोभित सहोदरा वरती ।
भक्तजन पूर्ण करिती आर्ती ॥ चाल ॥
तुंबर गान किन्नरादी ।
अप्सरा छनन, नयन कृत अनन, तनन स्वर घनन, गर्जे ध्वनी बंदि जल्पनाची ॥
मधुर ध्वनी बंदि जल्पनाची ॥ आरती. ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : August 30, 2012
TOP