रामचंद्राचीं आरती - सर्वही वस्तु त्वद्रुप मज ...
रामचंद्राचीं आरती
सर्वही वस्तु त्वद्रुप मज भासिति रामा ।
स्थिरचर सर्वहि विश्वा तूं मंगलधामा ॥
वर्णन करितां तव गुण झाली बहू सीमा ।
कथिता मौनावलों तुज मेघश्यामा ॥ १ ॥
जय देव जय देव जय चिन्मय रामा ।
आरती ओवाळूं तुज पुरुषोत्तमा ॥ धृ. ॥
अरुप निर्गुण निर्भय सच्चित्तव रुप ।
प्रेमानंदे पाहतां भासे चिद्रूप ॥
अनन्यभावे भजतां होती तद्रूप मी त्वध्यान करीतां झालो सुखरुप ॥ २ ॥
N/A
N/A
Last Updated : August 30, 2012
TOP