रामचंद्राचीं आरती - नयना देखत जन हे विलयातें ...
रामचंद्राचीं आरती
नयना देखत जन हे विलयातें जातें ॥
तशीच गति या देहानिश्चित हें कळतें ॥
न कळे मन हें कैसे विषयी रत होतें ॥
कांहो न भजा रघुवरराघवरायाते ॥ १ ॥
जय देव जय देव जय सुंदरवेषा ॥
संसृतिपारावारी तारी हरि तोषा ॥ धृ. ॥
अवतारादिक झाले तेही परि गेले ।
ब्रह्मोद्रांदिक जातिल ऎशी श्रूति बोले ॥
न भजसि रामा जाण ऎशी ये लीळें ॥
भजतां बाधि न चिंता रघुवर पदकमळें ॥ जय. ॥ २ ॥
टाकुनियां भवधंदा निज भज रे मंदा ॥
द्वंदा आणिसि कां तूं भजसि न गोविंदा ॥
त्याची सेवा करिता न पावसि भवखेदा ।
श्रुतिही वदती निश्चित ऎशा अनुवादा ॥ जय. ॥ ३ ॥
दिनमणि वंशाभरणा भवसागर तरणा श्रमलों बहुतां जन्मी करि आतां करुणा ॥
पावन करी या चित्ता लावीं दृढभजना ॥
गमनागमनें चुकवी दावीं निजचरणा ॥ जय. ॥ ४ ॥
श्रीरामा जयरामा जय जय सुखधामा ॥
आत्मारामा पावें आम्हां नृपसोमा ॥
देई निजपदलोभा मुनिमनविश्रामा ॥
उत्कट तव गुण गातो नारायण नामा ॥ जय. ॥ ५ ॥
N/A
N/A
Last Updated : August 30, 2012
TOP