मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय सातवा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय सातवा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय सातवा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥पंचभूतमय देही जाण । असती दश इंद्रिये पूर्ण ।येचि विषयी कथन । करुनी दावू श्रोतया ॥१॥तरी प्रथम त्वचा नेत्र । रसना घ्राण तैसे श्रोत्र ।तयांसीच ज्ञानेंद्रिये सर्वत्र । म्हणती ज्ञाते जाणपा ॥२॥आकाशतत्वापासूनि । श्रोत्राची उभारणी ।तयास कर्ण ऐसे जनी । म्हणती ज्ञाते जाणपा ॥३॥सत्य वायूचेनि गुणे । स्पर्शेद्रिंय उद्भवणे ।शरीरा वेष्ठुनी राहणे । त्वचा तेचि जाणपा ॥४॥तेज शुद्धगुणी जाण । प्रगटे नेत्रेंद्रिय तेथून ।तयासीच चक्षू प्रमाण । म्हणती जाण योंगी ते ॥५॥उदक ते सत्वगुणाधिक । झाली रसना अमोलिक।रुची तये जिव्हे नि:शंक । कळो येई उत्थाने ॥६॥क्षितिसत्वे झाले घ्राण । वस्तुगंध कळे पूर्ण ।सुगंध-दुर्गंधाचे जाणपण । ते ते नाकी होतसे ॥७॥यांसी म्हणती ज्ञानेंद्रिये । विषयांसह जाणसी स्वये ।म्हणोनि ते तू नव्हे । निश्चयेसी जाणपा ॥८॥आता ऐक कर्मेंद्रिये । कैसे झालेति द्वितीय |कोण कोणे स्थानी सक्रिय । राहती ते जाणपा ॥९॥वाचाहस्तपादादिक । पायू आणि उपस्थ देख ।ऐसे कर्मेद्रियपंचक । जाहले ते जाणपा ॥१०॥आकाश-रजांशापासूनी । झाली वाचेची प्रगटणी ।जये स्थानी जिव्हिणी । वास करी तये स्थानी ॥११॥वायु-रजांशाचेनि गुणे करे । करूनि कार्यं करणे।तेचि हस्तेंद्रिय पाहणे ।ज्ञातेजनी ॥१२॥तेज-रजांशेकरूनि । झाली गती उत्पन्न चरणी ।तया पादेंद्रिय म्हणोनि । म्हणती राया! ॥१३॥वायू उदक-रजांशे निर्मिला । गुदाइंद्रिय म्हणती त्याला ।विष्टाविसर्जन कार्याला । साधन हेचि जाहले ॥१४॥पृथ्वीरजांशे उपस्थ । विषयसेवन मूत्र -त्यागार्थ ।हे तो शिश्नइंद्रिय प्राप्त । ऐसे योगी बोलती ॥१५॥हीच पंचकर्मेद्रिंये जाण । झाली स्थूली ती निर्माण ।तू सर्वाचा जाणता म्हणोन । इंद्रिये न होसी सर्वथा ॥१६॥न लागे इंद्रियांची वार्ता । तव कोठे पंचप्राण-कथा? ।तयांचीही साक्षरता । दावितो तुज ॥१७॥प्राण, अपान, व्यान । समान अधिक उदान ।ऐसे जाण पंचप्राण । देही असती सर्वदा ॥१८॥पृथ्वी, आप, तेजादिकी । वायू, आकाश सम्यकी ।इयांच्या रजांशे की । जाहला तो प्राणसंच ॥१९ ॥वृत्ती अनेक तैसे गुण । भासती ते भिन्न भिन्न ।तयांचे पंचप्रकार जाण । जाहले या देहस्थिती ॥२०॥हृदयी तो राही स्वामी प्राण । गुदद्वारी तो अपान ।समरसी शरीरी व्यान । ऐसे स्थान तयाचे ॥२१॥उदान तो कंठी राही । समान नाभीस्नि पाही ।ऐसे पंचप्राण सर्वही । तयांसी तू जाणता ॥२२॥आता स्थूल-सूक्ष्म-कारण । चौथा देह महाकारण ।ययांचेही जाण ज्ञान । दावू उकलोन सर्वथा ॥२३॥ज्ञानेद्रिंय कर्मेद्रिंय । पंचप्राणादि सहाय ।मनबुद्धी हा समुदाय । सूक्ष्म देह शक्तिरूप ॥२४॥तयासी म्हणती लिंगशरीर । नक्कापासूनि मोक्षपथावर ।सुखदुःखादि भाग साचार । याच देही होतसे ॥२५॥ययासी तूचि जाणता पूर्ण । म्हणोनि देह नव्हेसि जाण ।सर्व पाहसी साक्षी होऊन । देह इंद्रिय प्रारब्धासी ॥२६॥बारे ! सोडूनि आपुले भान । घेसी लिंगाचा अभिमान ।म्हणोनि व्यष्टी नाम जाण । प्राप्त केले सर्वथा ॥२७॥तव शिष्ये आक्षेप केला । नेत्री अश्रुपूर दाटला।म्हणे मायी भूललो याला । मार्ग दावी माते वो!॥२८॥कैसा जाणेन आपूलेपण? समष्टिरूपी कैसा मिळेन ? ।लिंग-अभियान जाळोन। साक्षी होऊन राही कैसा ? ॥२९॥तव बोले सद्गुरुराज । तो तू नव्हेसि मायासाज ।ऐक सांगेन आत्मगुज । प्राप्त कैसे करावे? ॥३०॥कोणे पंथे जाऊन मिळशी? काय मार्ग तो तयासी? ।पुढिलिये निरूपणी पावसी । वाद मिटेल सर्व हो ॥३१॥इतिश्री आत्मप्रभाव ग्रंथ । वेदान्तसार संमत।तुकड्यादास-विरचित । सप्तमाध्याय गोड हो ॥३२॥सद्गुरुनाथ महाराज की जय ! N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP