मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय चौथा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय चौथा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय चौथा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥स्वामी! मी तो जाहलो धन्य। पावलो तुमचे कृपानिधान ।वैराग्य झालिया मनन । काय कैसे करावे? ॥१॥तव बोले श्रीगुरु साक्षी । जो का कामदिकांचा भक्षी ।निरिच्छ निर्मल हंसपक्षी । पदवी जया न लागे ॥२॥ऐक जीवाचे शरीर । तया तीन अवस्थांतर ।स्थूल-सुक्ष्म-कारण घर । तया जीवासी जाणिजे ॥१३॥स्थूलाआत सृक्ष्म घट । सूक्ष्माही आतकारणमठ ।जीव अभिमानियाचे पीठ । निश्चयेसी जाणावे ॥१४॥तया जीवास घटाभिमान । म्हणोनि तो देहाभिमानी पूर्ण ।विश्व-तैजस-प्राज्ञ । नामाभिधान तयासी ॥१५॥जीवासी घटीचा अभिमान । ईश्वर सांभाळी विश्वजन ।तयास हिरण्यागर्भादि भान । पाळावे लागे सर्वदा ॥१६॥चौथा देह महाकारण । जेथे न राहीच अज्ञान ।कूटस्थ ईश्वर मुक्त चैतन्य । दृश्यातीत ॥१७॥जीव तरी घटाभिमानी । म्हणोनि फिरतसे बहु योनी ।तया बुध्दी मलीनपणी । संगे फिरवी सर्वदा ॥१८॥बुध्दी ही तो जडचि जाण । जीवात्मा तो असंगी पूर्ण ।परी सुखदुःखाचे अवघटन । भोगावे लागे संमेलनी ॥१९॥तयाचे मुकावया भोगतेपण। चुकवावया दु:खादि दारुण ।म्हणोनि वैराग्य हे साधन । धरणे लागे तयासी ॥२०॥अवघी सृष्टी भासिक जाणे । नैसर्गिक पथे निर्वाहणे ।नातरी विनाश अभिमाने । भासरुप जीवाचा ॥२१॥तयाचे तोडावया भासरुप । पाजळावया आत्मप्रदीप ।वैराग्यादि साधने अमूप । करणे लागे सायासे ॥२२॥वैराग्य ते कासयासी । करावे होऊनि सायासी? ।हेचि बोलणे अनायासी । बोलू आता निश्चये ॥३॥जीव तो अविद्येत बुडाला । षड्विकारे गुंडाळला ।रजतमाने वेष्टिला । मागेपुढे ॥४॥तव शिष्य आक्षेपी भला। ईश्वरांश अज्ञानी का ठरला ? ।हे तो स्वामी ! मला । कृपा करुन सांगावे ॥५॥तव बोले सद्गुरु वचन । जे का भानूचे उजेडपण ।ते आरशात प्रतिबिंव जाण । तेजरुन दावीतसे ॥६॥तैसाचि येथीचा प्रकार । मायादर्पणी सुंदर ।चैतन्यसूर्य निर्विकार । उजेड दावी आपुला ॥७॥चिदात्मा तो विद्यारुप । धरी जीवाचे स्वरुप ।अविद्येत प्रतिबिंबी अमूप । म्हणोनिया ॥८॥चिदात्मा अविद्येत गुंगला । म्हणोनि विकारा पावला ।तयासी जीव ऐसे बोलिला । श्रृतिवाद । ९ ॥रजोतमादिक गुणेकरुन । अविद्या चंचलत्व पावे जाण।म्हणोन जीव द्वैत भान । अंगी बाणवून घेतसे ॥१०॥सोडिनिया शुध्दात्मभाव । करी अनंतरंगी लाघव ।म्हणोन अविद्यागुणे जीव । ऐसे नाव ठेविले ॥११॥तव शिष्य आनंदून । श्रीगुरुसी करी कथन ।स्वामी ! जीवाचे स्थानमान । कोणे ठायी वदावे ॥१२॥जीव शुध्दरूपा आला । शुध्द आत्मबिंबी मिळाला ।म्हणजे जन्ममरणादि गलबला । भोगावा न लागे ॥२३॥यासी पाहिजे वैराग्य साधन । प्रथम सत्वगुणी जीवन ।रजतमादि लोपून । शुध्दसत्व मिळावया ॥२४॥चित्तशुध्दी प्रगटली पूर्ण । मग शोधावे ज्ञान- अज्ञान ।साक्षीरूप काय ते जाणोन । तयारूपी मिळावे ॥२५॥आता पुढिलिये निरूपणी । ज्ञान-अज्ञान उभारणी ।कळवू विशद करूनी । जाणावया साधका ॥२६॥इतिश्री वेदान्तसार संमत । तुकड्यादास-विरचित ।आत्मप्रभाव ग्रंथ । चतुर्थोऽध्याय गोड हा ॥२७॥सद्गुरुनाथ महाराजकी जय ! N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP