मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय पाचवा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय पाचवा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय पाचवा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ।पाहोनि दासाचा प्रेम-पाझर । आनंदला कृपाकर ।ज्ञान-अज्ञान सारासार । अनुवाद कथियेला ॥१॥ ज्ञान हा तो सूर्य जाण । अज्ञान मृगजलासमान ।त्याचे तोडावया भान । घ्यावे ज्ञान साधके ॥२॥ज्ञान नव्हे काही कळा । ज्ञान नव्हे विद्या सकळ ।चातुर्ये कोशल्ये आगळा । येथे न चले कदापि ॥३॥ज्ञान नव्हे ग्रंथ पठन । ज्ञान नव्हे शहाणपण ।ज्ञान नव्हे लिप्तपण । शोधकांचे अपूर्व ॥४॥ज्ञान नव्हे शब्दपाठ । ज्ञान नव्हे कर्म अचाट ।ज्ञान नव्हे साधुत्व थाट । जमवी अंगी आपुलिया ॥५ ॥ज्ञान नोहे ध्यान धरणे । ज्ञान नोहे जप करणे ।ज्ञान म्हणजे मूळ स्मरणे । आपुलिया स्वरूपाचे ॥६॥मी तो कैसा असे कोण? होतो भिन्न की अभिन्न? ।हेचि शोधावे आपुलेपण । यासी ज्ञान म्हणावे ॥७॥दृश्य, दृष्टी की जाणता? । हेचि आकळावी वार्ता ।साधक, साधन किंवा कर्ता ? ओळखावे ज्ञानिये ॥८॥मी तो अशुध्द किंवा शुध्द? हाचि कळावया भेद ।करावा पूर्ण सुखसंवाद । ज्ञानियासी ॥९॥कळावया आत्मरुप । आधी पाजळावा वैराग्य दीप ।जाळोनिया मायिक धूप । वृत्यांचिया साक्षित्वे ॥१०॥दृश्य मी की द्रष्टा पूर्ण? हे ओळखणे हेचि ज्ञान ।जाणावे आपुले आपण । या नाव ज्ञान ॥११॥सांडोनिया प्रवृत्तिपंथ । धरावा निवृत्तीचा हस्त ।जव जावे अदृश्य गगनात । या नाव ज्ञान ॥१२॥असार ते सर्व सांडावे । सुखदुःखासं ओलांडावे ।सारतत्व ते चिंतावे । या नाव ज्ञान ॥१३॥सोडोनिया आपपर । पाहावा सत्याचा विचार ।निर्भय होऊनि घ्यावे सार । यासी ज्ञान म्हणावे ॥१४॥ज्ञाननेत्र नाही उज्ज्वल । तरि तो मायिकदृष्टी बोल ।ज्ञान अमंगळासी निर्मल । करी अंतरंगे पाहता ॥१५॥मी तो एक की दुसरा? पुसावे जाऊनि पैलघरा ।मग फिरताति त्या माघारा । परा-पश्यंति-मध्यमा ॥१६॥वैखरीची वाचा खुंटली । वृत्ती दुजेपणासी विटली।स्वरुपी जाऊनि दाटली । जये ज्ञाने ॥१७ ॥त्याविण भुलले शब्दज्ञाने । पळती ज्ञानी आडराने ।ठावे नाही मुक्त जिणे । सत्यवंता वाचूनिया ॥१८॥मानसी निर्मळता फुलली । शरीरी सत्यता दाटली ।अभाविकता लया गेली । जया ज्ञान ॥१९॥ते ज्ञान म्हणजे नित्यवस्तु कळणे। अपरोक्ष अनुभवे वळणे ।सांडोनिया भिन्न भाने । एक सर्वी सर्वचि ॥२० ॥येथे अधिकाराचेनि गुणे । घ्यावे वागणे तैसे जाणणे ।निव्वळ काही शब्द ज्ञाने । ज्ञान नोहे सर्वथा ॥२१ ॥म्हणशी ज्ञान झाले आता । नाही अनुभवाचा पत्ता ।तरी हे जाईल सर्व वृथा । वाचिक ज्ञान ॥२॥कितीही करील श्रवण । मननाचे विसरे अनुपान ।तरी ऐकले ते श्रवणज्ञान । कामी पडेना ॥२३॥न झालिया श्रवण वाया जिणे । श्रवणा मनने उभारणे ।न झालिया तै निजध्यास खुणे। साक्षात्कार कैसा होय? ॥२४॥अज्ञानभास ज्ञानभास । न लाभे भासाने प्रकाश ।अंगी होऊनि उदास । ज्ञानसार शोधावे ॥२५॥स्वये वागलिया वाचोन । कैसे आतुडे अनुभवजन्य ? ।परोक्ष तो शिकोन । अपरोक्ष अंतरंगी जाणावे ॥२६॥तव दासे नमस्कार घातला। काय करावे या कर्माला? ।एकाएकी आडवा आला । कर्मभोग स्वामिया! ॥२७॥मजी! सत्याचिये ज्ञाना । लोकी आत्मसात करवेना ।कर्मबंध न तुटे जाणा । गहन गहन कर्मगती ॥२८॥मी तो प्रारब्धाआधीन । कैसे आवरेल प्रारब्ध कठीण?।एके जन्मीच हे अनुभवून । कैसे काढू स्वामिया? ॥२९॥तव बोले सद्गुरु दयाळ। अज्ञानरूपे गड्या रे! ।प्रारब्ध म्हणोन घेतो कपाळ । अज्ञानरूपे गड्या रे! ॥३०॥या विषयाचे विवरण । होईल पुढिले निरूपणी जाण ।या शंकेचे निरसन । प्रेमे करिती सद्गुरु ॥३१॥इतिश्री वेदान्त सारसंमत । दास तुकड्या विरचित ।आत्मप्रभाव ग्रंथ । पंचमाध्याय कथियेला ॥३२॥सद्गुरुनाथ महाराजकी जय! N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP