मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|आत्मप्रभाव| अध्याय सहावा आत्मप्रभाव अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय सहावा जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते . Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत अध्याय सहावा Translation - भाषांतर ॥ श्रीगुरुदेवाय नमः ॥बा रे तू कर्म की कर्माचा कर्ता? लटकीच धरोनिया वार्ता ।घेती देहाभिमाने माथा । हाचि अभाव जाणावा ॥१॥कार्यकारण भूती ओळगे । अविद्या तो धावे मागे ।ते तु घेसी वाडगे । अंगी लावोन सर्वथा ॥२॥कारण जडबुद्धी उठवी । भूते करिती कार्ये बरवी ।आवरण घेऊनि तू गोसावी । म्हणसी माझे सर्व हे ॥३॥हा तो चिदाभासाचा खेळ । जैसे सूर्य योगे मृगजळ ।वाटते परी मिथ्या सकळ । तू तो ऐसा नव्हेसी ॥४॥कार्य-कारण-कर्तेपण । हे तो अविद्यात्मक जाण ।अससी अलिप्त तू पूर्ण । अपूर्ण नव्हे सर्वथा ॥५॥पूर्णरूपी अपूर्णाची मात । कैसी शोभेल समस्त? ।पूर्ण ते अपूर्ण न होत । ऐसा वाद श्रुतीचा ॥६॥कर्म-प्रारब्धाची गणना । नसे तव स्वरूपी जाणा ।मूळ स्फुरणाच्याही पार प्रमाणा । रूप तुझे जाणपा ॥ ७॥कर्मस्फूर्ति कोठोनि झाली? अंत:करणे उभारिली ।तयाच्याही पार राहिली । सीमा तुझ्या स्वरूपाची ॥८॥प्रथम पुरुष-प्रकृती जाण । तयापासूनि त्रिगुण ।तुज तयांचे जाणतेपण । दृश्य नव्हसी सर्वथा ॥९॥रतिरेताचिये पासूनि । अन्नमयाची उभारणी ।होण्याजाण्यावरी स्वमनी । अन्नमय असेना ॥२०॥म्हणोनिया अन्नमय । तू तो नव्हेसी सव्यय ।त्याते नित्य निरामय । म्हणो नये कदापि ॥२१॥आपादमस्तकी जो पवन । प्राणमय नाम जाण ।जडत्व याचे प्रमाण । नव्हे जड तू तैसा ॥२२॥विकारा भावे म्हणे मी करी । सकळ माझे ऐसे धरी ।तयास मनोमय निर्धारी । कोश म्हणती ज्ञाते ॥२३॥तया कोशाचेनि आधारे। कामक्रोधादि बळकट बारे ।ते क्रोधादि विष वारे । तू तो नव्हेसि जाणपा ॥२४॥बुद्धी जड चिदाभासी । एकात राही दुसऱ्या उदासी ।विज्ञानमय कोश तयासी । म्हणती ज्ञाते ॥२५॥बुद्धी तव प्रगटे आणि आटे । लीन होय अधिक उठे ।म्हणोनि सत्यत्वी गोमटे । चारी कोश नव्हेती ॥२६॥पाचवा तो आनंदमय । निद्रारूप निरामय ।पुण्यकर्मे सुखी होय । सरलिया उदासी ॥२७॥तयाचीही गणना करिसी । म्हणोनि तू तो नव्हेसी ।तया उबग प्रळयासी । लाग पडे सर्वथा ॥२८॥सर्व कोशाते तू जाणसी । म्हणोनि कोश तू नव्हेसी ।तू तो नव्हेचि गा विनाशी । अविनाशी सर्वदा ॥२९॥तव शिष्ये प्रश्न केला । स्वामी! ही इंद्रिये कळवा मला ।कर्मेंद्रिय-ज्ञानंद्रिय संग भला । रूपा माझे स्वामिया! ॥३०॥तुज न साजे दृश्यपण । तू तो अदृश्य द्रष्टा जाण ।जाणावया साक्षी पूर्ण । जाणपण भिन्न न लागे ॥१०॥अविद्याभास लटके भान । हे तों तुझेचि आवरण ।तया ढोंगी गटात जावोन । फससी केवी बापारे! ॥११॥अवस्था ज्या चार भूती । जागृती स्वप्न ती सुषृप्ती ।चौथी सुर्या असे जाणती । तुझिया रूपी आवरणे ॥१२॥प्रथम जागृती लटके भान । मायारूपी मृगजळ पूर्ण ।ते तो जाण अज्ञान । तू तो नित्य सर्वज्ञ ॥१३॥स्वप्नावस्था जव प्रगटे । जागृतीचे भान आटे ।तव तू साक्षित्वरूपे गोमटे । जाणसी स्वप्नखेळासी ॥१४॥लाधलिया सुषुप्ती पूर्ण । नवचे स्वप्नाचेही भान ।तई तू साक्षिरूपे जाण । अभावा पाहसी आत्मत्वे ॥१५॥सुषुप्ती गेलिया प्रगटे तुर्या । तिन्ही अवसथाते जाणे रया ।सुर्येचा तो द्वैती पय्या । तयाचाही तू साक्षी ॥१६॥पाहसी चारी अवस्थाला । तव तू अवस्था केसा झाला? ।दृश्य म्हणवोनि आपुल्याला । द्रष्टेपणा सोडिया ॥१७॥जरी म्हणशी पंचकोष । मजसवे राहती रात्रंदिस ।तरी तयांचाही भास । कळवू आदरे सर्वथा ॥१८॥अन्नमय प्राणमय । मनोमय, विज्ञानमय ।पाचवा तो आनंदमय । पंचकोश जाणपा ॥१९॥तव बोले करुणाकरू । पुढिलिये निरूपणी अवसरू ।कर्मेद्रिंय-ज्ञानेद्रिंय-निर्धारू । तू की तयासी जाणता? ॥३१॥इति श्री वेदान्तसारसंमत । दास तुकड्या विरचित।आत्मप्रभाव ग्रथं । सहावा अध्याय कथियेला ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : August 20, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP