मल्हारी मार्तंड विजय - अध्याय दहावा
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
॥ श्रीमार्तंड भैरवाय नम: ॥ सप्तकोटि गण घे घे म्हणोन ॥ दैत्यसेना वेष्टिली जाण ॥ सिंहनाद गर्जनेकडून ॥ आकाश समग्र कोंदिलें ॥१॥
गजास गज भिडती ॥ गंडस्थलें रक्तें बुडतीं ॥ बार्णावरी बाण सोडिती ॥ रुधिर पूर वाहतसे ॥२॥
शस्त्रास शस्त्र लागोन ॥ वन्हीज्वाळा उठती जाण ॥ दळाचे धुळीं कडोन ॥ आकाश समग्र झांकिले ॥३॥
असिलतें सीर छेदिती ॥ मुद्गल मुसळें ताडिती ॥ चक्रांकुष प्राण घेती ॥ रणीं कबंध नाचूं लागे ॥४॥
गजांची शीरें उडोन ॥ मेदिनीवरी पडती जाण ॥ तेणेंचि दळ होय चूर्ण ॥ रथ रथासि भिडती ॥५॥
एकाचे केश एकाचे हाती ॥ हृदयावरी लाथ मारिती ॥ मूर्च्छा येवोनि पडती ॥ सांवरोनि पुन्हां झुंजे ॥६॥
देवसैन्य जें मेलें ॥ तें उठोनि झुंजूं लागलें ॥ सुरवरें पुष्पवर्षाव केले ॥ जयजयकारें करोनि ॥७॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥८॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लसैन्ययुधवर्णनो नाम दशमोऽध्याय गोड हा ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023
TOP