मल्हारी मार्तंड विजय - अध्याय दुसरा
श्री माणिकप्रभु विरचित श्री मल्हारी मार्तंड विजय.
श्रीमार्तंडभैरवाय नम: ॥ मग धर्मपुत्र साती ॥ कुटुंब ठेवोनि अन्य पर्वतीं ॥ जाते झाले अमरावती ॥ सुधर्मं सभा देखिली ॥१॥
रत्नजडिंत सिंहासन ॥ वरि बैसला सहस्त्रनयन ॥ बृहस्पति आदि ऋषि जन ॥ सभे माजीं असती ॥२॥
अग्नि यम नैऋत्य ॥ वरुण वायू मूर्तिमंत ॥ चंद्र सूर्यादि दैवत ॥ उभे कर जोडोनी ॥३॥
नाग सिध्द चारण ॥ रंभानृत्य गंधर्वगायन ॥ कुबेर नवविधि हस्तें कडोन ॥ सेवा करी ॥४॥
चामर ढाळिती मृगनयनी ॥ धर्मपुत्र देखिले नयनीं ॥ तटस्थ होऊनी मनीं ॥ सन्मुख उभे राहिले ॥५॥
शक्र द्विजास पाहोन ॥६॥
मुख तुमचें लहान जाहलें ॥ कवणे तुम्हांसी गांजिलें ॥ आणि वृत्तांत काय जाहले ॥ ते सांगा मज ॥७॥
ऋषि म्हणतीं शक्रालागुन ॥ तुझे अभय, वरदे कडोन ॥ मणिचूल पर्वतीं अनुष्ठान ॥ सुखें कडोन करीत होतों ॥८॥
मृगयाचें निमित्य ॥ येवोनिया मल्लदैत्य ॥ नासिले आश्रम समस्त ॥ म्हणोनि तुज सांगो आलों ॥९॥
त्यांसि पारिपत्य करावें ॥ हाचि आमचा मनोभाव ॥ आम्ही स्वधर्म आचरावे ॥ म्हणोनिया श्रुत केलें ॥१०॥
शक्र म्हणे द्विजोत्तमा ॥ तो मल्ल नाटोपें आम्हां ॥ धूम्रपान करोनिया ब्रह्मा ॥ तोषविला त्यानें ॥११॥
तुम्हीं सर्वही मिळोन ॥ जो वैकुंठनाथ भगवान ॥ त्यासी जावें शरण ॥ त्याचे कडोन कार्य होय ॥१२॥
ऐकोनि ऋषि तोषले ॥ म्हणति शक्रा सत्य बोलिले ॥ शरण जाऊं अनन्यभावें ॥ साह्य होईल आम्हांसि तो ॥१३॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१४॥
श्री माणिकप्रभुकृतटीकायां शक्राभिगमनोनाम द्वितीयोऽध्याय गोड हा ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : December 11, 2023
TOP