श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प पाचवे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


॥ योग-भुमिका ॥

कर्म (कार्य) करणे, आणि त्याचा संन्यास हि ! हा योगायोग, तो त्यां ज्ञान प्राप्त झालेल्यांना ! खूप सनातन आणि नित्य नुतन, हि ! ह्याची ही शास्त्रीय विचारधारा, श्री व्यास महर्षि कशी मांडतात पहा. कर्म करीत रहाणे, परंतु त्या कर्माच्या फलाची अपेक्षाच काय, पण कर्माचे ब्रह्मार्पण । कृष्णाप्रित्यर्थ त्याचे समर्पण । म्हणजे कर्माची सुफलता व दु:खफलता विचारात सुध्दा न घेणे. अशी ही ज्ञानीयांची, कर्माची नी सन्यासची सांगड घालीत श्री भगवंत, ह्या अध्यायात अर्जुनास उपदेशीतात. ज्ञानी पुरुष दिव्यज्ञानाच्या ह्या अग्निने शुध्द होऊन बाह्यत: सदैव कर्मरत असतो, परंतु अंतरी कर्मफलाचा परीत्याग करुन संन्यास घेतो. ज्यायोगे त्यास शांति, विरक्ति, सहिष्णूता अध्यात्मिक दृष्टी प्राप्त होऊन, तो आत्मानंदी होतो, म्हणूनच भगवान म्हणतात-

सुखची जयाचे अंतरी,
अंतरंग ते ज्योतिर्भरी ।
ब्रह्मरुप तो आत्मदक्ष,
योगी तो, मिळवी रे मोक्ष । गो.गी.२४/५
आणि जो पुरुष, मला सर्वाचा महेश्वर समजून, मी यज्ञ, तप केल्याने तुष्ट होतो; असे जाणतो व माझ्याच भरवशाने, मला कैवारी, सखा समजतो त्यास चिरकाल मन:शांति मिळते. आपण हि या गोपालगीताद्वारे कर्मरत राहून कर्मसंन्यास, आपल्या चिरकाल मन:शांतीसाठी घेऊया, श्रीकृष्णार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP