श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प तिसरे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


॥ योग भुमिका ॥

आतां या अध्यायात, आपल्याला योगायोग लाभतो, तो सदैव कर्मरत राहणे' ह्या उपदेशाचा !  ह्या ऐहिक जगात प्रत्येक व्यक्ति कुठल्या नी कुठल्या कार्यात सदैव कर्मरत असतो. अगदी बसलेल्या स्थितीतहि त्याची बसण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, पाहण्याची क्रिया सतत चालू असतात, काही नाही तरी त्याचे मन सतत कार्यरत असते.

क्षण एकही कश्चित,
कर्म रहित न कोणी राहती ।
कर्मवशे कार्य रत,
सर्वा करवी, स्वभावे प्रकृती ॥

कोणीही कर्म रहित नाही... आणि तेच कर्म तीला ऐहिक जगाशी बंधनकारक होते. अथवा कर्मबंधनातून मुक्तहि करते. पण निष्काम कर्म केल्याने परमेश्वर प्रसन्न होऊन कर्म नियमातून मुक्ति मिळते. आत्मज्ञान वा ब्रह्म विषयक दिव्यज्ञान प्राप्त होते. सांख्यांची ज्ञान निष्ठा, कर्मयोग्याची (निष्काम) कर्म निष्ठा ह्याचे महत्व सांगत, दोघांची सांगड ह्या अध्यायात श्रीकृष्णांनी घातली आहे. कर्मयोगाचे वैशिष्टय सांगतांना, अर्जुनास नेमलेले कर्म तूं कर, करीत रहा. जीवनयात्रा सफल होण्याचे एकमेव कारण तेच. कर्म करणे म्हणजे यत्न करणे आणि यत्न म्हणजेच यत्न करणे. प्रजापति ब्रह्माने प्रजा उत्पन्न केली. ती सयज्ञ उत्पन्न केली म्हणून प्रत्येकाच्या जन्माबरोबरच त्याच्या कर्मयत्नाने जन्म घेतला आहे. हे (कर्म) यज्ञ मनोरथ पूर्ण करणारी प्रत्येकाला, लाभलेली कामधेनूच आहे. जनकादिंना कर्म केल्यानेच सर्वसिध्दि प्राप्त झाली, असे सांगत, स्वत: श्री भगवान त्रिलोकात कोठेही लाभ, अलाभ नसतांना सदैव कार्यरत असतात, हा आदर्श जनमासापुढे ठेवतात. अर्जुनास, सदैव ते आत्मनिष्ठ चित्ताने कर्म करण्यास व तीकर्म कृष्णाअर्पण करत, कर्म फलाची आशा न धरता, ममत्व बुध्दिला फाटा देऊन बिनदिक्कत युध्द करण्यास सांगतात. स्वधर्म कर्म करणेची उचीत आहे. असे सांगत रजो गुणातून निर्माण झालेले हे काम क्रोध माणसाला ह्या लोकी वैरी आहेत असे सांगत. आपल्या अंतरात्म्याला जाणून, त्याच्या संयमाने दुरात्याज कामरुपी शत्रुला ठार करण्यास सांगतात. त्या योगे मनुष्य `कर्मयोगी' बनतो. असा श्रीयोगेश्वराचा अर्जुनाद्वारे तुम्हा-आम्हा सर्वांना हा उपदेश !

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP