श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प दुसरे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


स्वजन प्रेमे व्याकुळ त्या अर्जुना,
साश्रुनयने, विलोकिता स्वजजां ।
पाहून त्यांशी, संजय वदला,
वृत्त वर्तमान, धृतराष्ट्राला ॥१॥ (संजय)

(वृत्त इंद्रवज्र)
ऐशापरी त्या करुणा विषण्णा,
अश्रुभरे त्या, नयना नाहि पूर्णा ।
त्या व्याकुळाला, मधुसूदना ते,
झाले हि त्या हे वचना वदते ॥२॥

कृष्ण बोलती, मग बोल असे ते,
अर्जुन शूरा रणधुरीणा ते । (श्री भगवान)

विषम बुध्दि कैसी उपजली,
ही तुज ह्या समयी, अर्जुना ।
स्वर्गा ने येई, आर्या न शोभली,
करी जी ती अकीर्तिवर्धना ॥३/२॥

वाटेने भ्याडपणांच्या
जाऊ नकोस रे पार्थ ।
योग्य नसे, तुज वीरा,
न दिसे, तुज ते सार्थ ॥४॥

झटकून दुबळेपणा,
हा हृदयाचा ।
उठी, परंतपा, करण्या
नाश शत्रुचा ॥५/३॥

वदता झाला अर्जुन मग तो,
मोह भ्रमाते, त्या श्रीकृष्णा तो । (अर्जुन):-

भीष्म, द्रोणावरी बाण,
कैसे, प्रतिकारे सोडू कृष्ण ।
युध्दी (जरी) उभे येथे,
कृष्णा, पुजनीयची आम्हा ते ॥६/४॥

गुरुजन जेष्ठा, वधण्या पेक्षा,
जगी श्रेयस्कर भोगणे शिक्षा ।
अर्थ लोभी गुरु लोकी वधिता,
भोग भोगणे ते, रक्त रंजिता ॥७/५॥

जिंकावे की आम्ही तयांते,
अथवा जिंकोत, आम्हा ते ।
जाणे नही ते मी यातले,
श्रेष्ठ काय ते, आम्हा भले ॥८/६॥

करुनी जयांची, हत्याती,
इच्छा न आम्हा जगण्याची ।
उभे ठाकले रे, तेची परी,
धृतराष्ट्र पुत्र ते, सामोरी ॥९/८॥

प्रकृती-कृपण, मी असा रे,
धर्माधर्माजाण मूढमती ।
श्रेयकर जें, पुसे काय ते,
बोल मजशी, तूं ते निश्चीती ॥१०/७॥

शिष्य तव मी, तुज शरण रे,
शरणागतासी, उपदेशसि ॥१०/७॥

(वृत्त इंद्रवज्रा)
नेतृत्व देवे, जरी प्राप्त व्योमा,
समृध्द, निष्कलंक, सार्वभौमा ।
उच्चाटना शोक, दिसे न काहीं,
गात्रे जयाने, मम शोशिली ही ॥११/८॥

संजय ऐकुन, अर्जुन बोला,
आश्चर्ये तो, कथी, धृतराष्ट्राला ।

ऐसा परंतप, तो गुडाकेशा,
बोलीला ऐसे, तथा हृषिकेशा ।
करी न युध्दा' म्हणे त्या गोविंदाला,
बोलून ऐसे, मग गप्प झाला ॥१२/१०॥

दला दोन्ही उदासा म्हणाले,
हसूनी हृषीकेश, हे भारता ते ॥१३/१०॥

करिसी शोक अशोक्याचा,
आधि वाचें, गोष्टी शहाण्या ।
मृत वाजीवीत, गोष्टींचा,
धरती शोक न (कधी) विद्वाना । १४/११

मी, तूं, आणि जानप्रमूख सारे,
पूर्वी नव्हतो ऐसे नाहीं ।
भविष्यांत सुध्दा, तैसेची बारे,
नसुं सर्वची, ऐसे नाहीं ॥१५/१२॥

बाल्य तारुण्य, वृध्दत्व जेवी,
अवस्था आम्हा मानव देही ।
लभता देह बदल तेवी,
धीरा तेथे, कदापि न मोहि ॥१६/१३॥

पार्थ, वास्तु मात्रा स्पर्श हा केवळ,
भासची सुखदु:खां, उष्ण शितळ ।
निर्मून, भारता तेहि जाती क्षया,
अनित्ची ते, साहि तूं, कौंतेया ॥१७/१४॥

पुरुष श्रेष्ठां, निश्चये, तयातें,
मात्रा स्पर्श, गांजती न जायाते ।
सुखादु:खी-सम रुष धीरा,
पात्र तोची, भोगण्या मोक्ष खरा ॥१८॥

`असत्य' प्रगटे न कधी ही,
सत्य ते हि लपून न राही ।
ह्या दोहांची हि, निर्णयी अंत,
पाहती द्र्ष्टे, तत्वज्ञ सन्त ॥१९॥

(वृत्त इद्रवज्रा)
जाणे हि त्याते, अविनाशी मूळ,
हे सर्व सारेचि जयाने व्यापीलं ।
नाशा हि हयाते, अविनाशि तत्वा,
नाही कुणीरे, करण्या समर्था ॥२०॥

म्हणे ना - विनाशी, अगम्य अपार,
धरी नित्य ते, नाशवंत शरीर ।
शरीरा धराची, विनाशी शरीरे,
म्हणूनीच, भारता, युध्दा करी रे ॥२१॥

(वृत्त इंद्रवज्रा)
तत्वास जे मारक जाणताती,
हे तत्व वा जे, मृत मानताती ।
दोघे परी ते, अनभिज्ञ ते रे,
नाही मरे हें, न (कुणा) हि मारे ॥२२॥

देव दयेने सहज लाभे,
सताड उघडे स्वर्ग द्वार ।
युध्द रुपी हे क्षत्रियां असे,
जे भाग्यवान, असती थोर ॥३५॥

स्वधर्मची ते, असे हे,
धर्मयुध्द ना करीसी ।
गमावून स्वधर्मा, कीर्ति,
पाप मात्र, मिळविशी ॥३६॥

सर्व लोक, मग बोलतील,
अपकीर्ति, ते अनंतकाळ ।
दुष्कीर्ति मग दु:खदायक,
सुज्ञा, मरणाहूनी अधिक ॥३७॥

महारथी हे तुज, रणभ्याड मानतील,
मानतात, जे तुज, ते ही कमी लेखतील ॥३८॥

निंदक, तव ते, तुझे अहीत चिंतक,
अवाच्च शब्द बहु बोलतील अनेक ।
निंदीता मग ते, वीरा, तव सामर्थ्याते,
याहून काय रे ? आणिक मनी दु:ख ते ॥३९॥

युध्दी जर कामी आला,
स्वर्ग उच्च ते, प्राप्त तुला ।
जरी का, युध्दीं जिंकला,
भोगसी सुख पृथ्वीतला ॥
म्हणूनी आतां, करुनी निश्चय,
उठी रे युध्दां, दृढ तूं कौंतेय ॥४०॥

सुखां, दु:खीं मानूनी समानता,
लाभालाभ हि एकची तत्वता ।
जय, पराजय ही एक जाण,
झुंजता हि मग तूं, पापहीन ॥४१॥

हे सांख्य, विश्लेशणे हि,
तुज दिले बा, मी ज्ञान ।
आता बुध्दि योगाचे हि,
तू हे, करी श्रवण ॥
बुद्धि ज्ञाने, मग, पार्थ,
कर्म-बन्धे, होशी मुक्त ॥४२॥

(वृत्त इंद्रवज्रा)
पूर्वकर्मा, नाश न येथं कार्या,
नाही पुढे ही, मग आडकाठया ।
स्वल्पाहि त्यां, आचरणेंच धर्म्या,
तारी भयातून हि, मोठ मोठया ॥४३॥

व्यवसाय मुरब्बी, योग्यास चित्ति,
असे बुध्दि एक, कुरुनंदना, ती ।
अलिप्ता तया ते व्यवसाय हीना,
मतिते ही शाखा, अनंत विभिन्ना ॥४४॥

वेद - वचनांत असती जे रत,
न समजता, परंतु वेद तथ्य ।
पार्था, शोभित वचना व्यतिरीक्त,
आणिक दुसरे, नसे ते म्हणत ॥४५॥

कामी विषयलंपट जे,
स्वर्गची ज्यांचे उच्चलक्ष ।
भोग, ऐश्वर्य, गतिचक्रे,
बहु क्रिया, विशेषे दक्ष ॥४६॥

ऐश्वर्य भोगे, असती जे मग्न,
चित्ती मग ते विवेकहीन ।
कर्मयोगी ते, ज्ञानी असूनही
कर्मबुध्दी अस्थिरची राही ॥४७॥

वेद विषय, त्रिगुणे साकार,
(सत्व, रज, तम, त्यांत केवळ)
ना धरी त्रिगुणांते, धनुर्धर
द्वंद्वातीते, कमवी आत्मबळ ॥४८॥

सात्विक संपन्न, राहून तू नित्यं,
सोडी सर्वचि हा, योग-क्षेम-स्वार्थ ।
जलमय क्षेत्रें जैसा, नसे `कुपी' अर्थ,
वेदी तैसाची, ब्राह्मणे पात्र ॥४९॥

अधिकार तुझा, कार्य करणें,
नच कार्यफले तो, तवकदा ।
करी न कर्म तू फलहेतूनें,
नसो संगहि, अकर्मत्वां कदा ॥५०॥

(वृत्त भुजंग प्रयात)
फलासंग कर्मा, त्यजूनीच सारे,
धनंजेय, कर्मा करी योग भारे ।
सदाभाव साम्या, यशापेश कार्ये
`समत्वास' त्यां बोलती योग तेरे ॥५१॥

बुध्दि-योगे, कर्म अनिष्ट ते,
ठेवी कर्मा दूर, धनंजय ।
तुच्छ ! `कर्म फलइच्छुक' ते,
बुध्दितेच, तू धरी आश्रय ॥५२॥

इथे मुक्तता, त्याबुध्दियोग्या, त्याबुध्दियोग्या,
सुकृता-दुष्कृताते उभया ।
अंगीकारी तूं, म्हणूनी योगा,
योग हाची, कर्मे कुशलता ॥५३/५०॥

म्हणूनी, चिंतक, बुध्दियुक्त ते,
त्यागून फले ती, कर्म-निपजीता ।
जन्मा मरणी होऊनी मुक्त ते ।
जाती सहज ते, दु:खहीन पदां ॥५४/५१॥

मोहरुप त्या दाट वनातून,
पार होई तवबुध्दि जेव्हां ।
श्रुत-श्रोतव्य गोष्टी मधून,
विमुक्त होशी, मग तू तेव्हां ॥५५/५२॥

श्रुतां-भारीत, तवबुध्दि सकल,
स्थिरावेल ती, निश्चल जेंव्हा ।
बुध्दि समाधिस्थ होता अचल,
मिळे तुज, बुध्दयोग तेंव्हा ॥५६/५३॥

चित्ताकर्षित श्रीकृष्ण वचना,
बुद्धि योग तो घेण्या जाणून ।
जिज्ञासू तो, करी मग प्रश्ना,
योगेश्वराते, पुसे अर्जुन ॥५७ (अर्जुन)

(वृत्त इंद्रवज्रा)
अध्यात्मलीना-मति, केशवा तो,
नित्या समाधि-स्थिर जो रहातो ।
कैसा वदे तो ? मतिस्थैर्य ज्याचें
राही कसे, लक्षण वागण्याचें ? ॥५८/५४॥

मग अर्जुनासी भगवान कृष्ण,
स्थितप्रज्ञाची सांगती, लक्षण । (श्री भगवान)

(वृत्त भुजंग प्रयात)
परीत्याग जेंव्हा, करीता हि त्यांचा
पृथूपुत्र, सर्वां मनी कामनांचा ।
स्वये तुष्ट तो, आपूल्या अंतरी ते,
स्थितप्रज्ञ तेंव्हा, तया बोलती ते ॥५९/५५॥

दु:खे विषण्णता, नये त्यां मना,
सुखलालसे ज्या, नसे कामना ।
भय, क्रोध ते चित्ती न असती,
मती स्थीरा त्या, मुनि संबोधती ॥६०/५६॥

सर्वत्राशी जो, स्नेहाभिलाषी,
पावे, ज्या ते शुभाशुभम् ।
जाई न, मोदा-प्रति, ना द्वेषी,
त्याची प्रज्ञा, प्रतिष्ठीतम् ॥६१/५७॥

अंकुंचिते सर्वांग जेवी,
कूर्म आपुले, निजि इच्छिया ।
प्रज्ञा स्थिरा, आवरे तेवी,
इंद्रिये, विषयीं, तो लीलया ॥६२/५८॥

विषयीं विस्मरण केवळ,
निराहारी मनुष्या सकळा ।
रसवर्जता, त्याते समूळ,
द्रष्टा तो अनुभवि सफळा ॥६३/५९॥

प्रयत्न करुन हि, कौंतेय,
विवेकी पुरुष-प्रयत्न फोल तें ।
प्रमत्त त्याची, सर्व इंद्रिय,
बलात् मन-उमदे हरती ते ॥६४/६०॥

या सकला हि, संयमूनी,
युक्त होशील मजप्रत ।
इंद्रीये जिंकीलीच ज्यांनी,
त्याची प्रज्ञा ती प्रतिष्ठित ॥६५/६१॥

आवड उपजे विषयी, ध्यातां मनुजे,
आवडीतून तयें, कामना विषयी रुजे ।
कामना विषयी मग, उपजती ज्या मनी,
मिळे जन्म क्रोधाहि मग त्या कामनातूनी ॥६६/६२॥

जन्मा घेई मग क्रोधातून,
(विवेक हीन रे, ती मति) ।
(हीन विवेके) संमोहातून,
भ्रष्टेची त्या मनुजा स्मृति ॥६७/६३॥

स्मृति भ्रष्टता, दे मग जन्मा,
`बुध्दि नाशची तो सगळा ।
बुद्धि नाश तो होता, मनुजा,
सर्वनाश तो `भावी' डोळां ॥६८/६४॥

राग, द्वेषां तो होऊनी मुक्त,
इंद्रीयें परी, विषयी रत ।
आत्मवश, त्या इंद्रीयाकर्ता
कृपा प्रसाद मिळे समर्था ॥६९/६३॥

प्रसादे हानी, सर्व दु:खांची,
हयाशी, स्वभावे उपजत ।
प्रसन्न चित्त,होता हि त्याची,
प्रज्ञा शीघ्र हि, स्थिरावत ॥७०/६४॥

नसे बुध्दि वा नाही, भावना,
`योगहीना' त्या पुरुषी, अर्जुना ।
अभावे त्या योग, शान्ति नसे,
अशांतास त्या रे, सुख ते कैसे ? ॥७१/६६॥

सवे इंद्रिया, धाव मनाची,
असे जयाची विषयी (जाण)
तेच हरवी, ती प्रज्ञा हयाची,
वाते नौका, जलीं अकारण ॥७२/६७॥

(वृत्त इंद्रवज्रा)
ती इंद्रीये निग्रहिता जयाची,
सर्वस्वी, त्यांच्या विषयातूनी रे ।
होई, महाबाहू, म्हणून त्यांची,
बुध्दि अती ती, स्थिरची तयारे ॥७३/६८॥

सकला भूतां, असे जी रात्र,
संयमी तो, त्यांत जागतसे ।
ज्यांत जागृत, ते भूतमात्र,
मुनीस, मात्र ती रात्र असे ॥७४/६७॥

सकला भूतां, असे जी रात्र,
संयमी तो, त्यांत जागतसे ।
ज्यांत जागृत, ते भूतमात्र,
मुनीस, मात्र ती रात्र असे ॥७४/६७॥

(भुजंगप्रयात वृत्त)
जले आतुडूंबा, सदा सागरा त्या,
प्रवाहा प्रवेशीति, जेवी स्थिरा त्यां ।
तशा ज्यांत सार्‍या प्रवेशीति वांच्छा,
स्थिरां, शान्ति त्यां, ना जया भोगइच्छा ॥७५॥

(भुजंगप्रयात वृत्त)
मनी कामना सर्व सांडून जो रे,
पुरुषा निरीच्छे हि संचार स्वैरे ।
ममत्वांत मुक्ता, अहंकार नाही,
प्रती जाय `शांती-पदां' तो सदा ही ॥७६/७१॥

हीच रे पार्थ, स्थिती ती ब्राह्मी
लाभता जी, मोहती न कोणी ।
राहता अंतकाली, हिच्यात,
ब्रह्मनिर्वाण, ती मुक्ति प्राप्त ॥७७/७२॥

`गोपाल गीते' अनुवादिले हे
`श्री मद्भगवद् गीत' यथार्थ सारे ।
भगवद्भावे पद्म हे `दुसरे'
गोपाळकृष्णा गोपाळे वाहिले ॥७८/७३॥

ऐसे हे श्रीमद्भगवद गीत उपनिषद ब्रह्मविद्येत
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादात
सांख्ययोग नामेश्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत
द्वितीय पुष्प
(श्लोक संख्या ७८)

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP