अंत्येष्टिसंस्कार - परिशिष्ट १
हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.
पंचकादि दाहविधी-अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवंगुणविशेषण विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं गोत्रस्य प्रेतस्य धनिष्ठापंचक मरणसूचित वंशारिष्टविनाशार्थं पंचकमरणविधीं करिष्ये (उदक सोडावे. दर्भांना पीठ लावून लोकरीच्या सुताने बांधून पाच प्रतिमा कराव्यात. गंध, अक्षता, फूल घालून त्याची पूजा करावी. पहिली कपाळावर, दुसरी डोळ्यांवर, तिसरी डाव्या कुशीवर, चवथी बेंबीवर, पाचवी पायांवर याप्रमाणे क्रमाने प्रतिमा ठेवाव्यात. त्यावर पुढील मंत्रांनी क्रमाने तुपाच्या आहुत्या द्याव्यात.)
प्रेतवाहाय स्वाहा प्रेतवाहायेदं नमम ।
(१) प्रेतसखाय स्वाहा प्रेतसखायेदं नमम ।
(२) प्रेतपाय स्वाहा प्रेतपायेदं नमम ।
(३) प्रेतभूमिपाय स्वाहा प्रेतभूमिपायेदं नमम ।
(४) प्रेतहर्त्रे स्वाहा प्रेतहर्त्रे इदं नमम ।
(५) प्रत्येक प्रतिमेवर उदक द्यावे. नंतर प्रत्येक प्रतिमेवर पुढील मंत्रांनीं दोन दोन तुपाच्या आहुत्या द्याव्यात.)
यमाय सोमं सुनुत यमाय जुहुता हवि: ॥
यमं ह यज्ञो गच्छत्यग्निदूतो अरंकृत: स्वाहा । यमायेदंनमम । त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं । उर्वारुकमि व बंधनान्मृत्यो र्मुक्षीय मामृतात्स्वाहा । त्र्यंबकायेदंनमम ।
(नंतर प्रेताचे मुखामध्ये सोने, हिरा, नीळ, पद्मराग व मोती ही पंचरत्ने घालावीत. नसतील तर नुसते सोने घालावे. तेही नसेल तर तूप घालावे.
त्रिपादनक्षत्र असेल तेव्हा-
अद्य पूर्वोच्चरितवर्तमान एवंगुण विशेषण विशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं गोत्रस्य प्रेतस्य त्रिपादनक्षत्रमरण-सूचितवंशारिष्टविनाशार्थं तद्विधिं करिष्ये (उदक सोडावे. पंचक विधीमध्ये सांगितल्याप्रमाणे तीन प्रतिमा कराव्यात. गंधाक्षत, फूल घालावे. पहिली कपाळावर, दुसरी डोळ्यांवर व तिसरी डाव्या कुशीवर याप्रमाणे ठेवाव्यात. पुढील सर्व पंचकविधीमध्ये सांगितल्याप्रमाणे करावे. नंतर पुढील मंत्राने एक तुपाची आहुती द्यावी.)
बहपांजातवेद: पितृभ्योयत्रैनान्वेत्थनिहितान्पराके । कुल्याउग्रता: क्षरंतु सत्यएताआशिष: संतुकामै:स्वाहा । अग्नयेजातवेदस इदंनमम ।
त्रिपुष्कर असेल त्यावेळी-
अद्य०फलप्राप्त्यर्थं गोत्रस्य प्रेतस्य त्रिपुष्करयोगे मरणसूचितवंशारिष्टविनाशार्थं कृच्छ्रत्रप्रायश्चित्तं यथा शक्तिद्रव्यदानद्वारा सूतकान्ते अहमाचरिष्ये (उदक सोडावे) तथा अमुकस्य त्रिपुष्करयोग-मरणसूचितवंशारिष्टविनाशार्थं त्रिपुष्करविधिं करिष्ये (उदक सोडावे. तीन प्रतिमा कराव्यात. गंध फूल घालावे. पहिली कपाळावर, दुसरी डोळ्यांवर, तिसरी डाव्या कुशीवर ठेवावी. पुढील सर्व त्रिपादनक्षत्रविधीप्रमाणे. द्विपुष्कर असेल तर संकल्पात ‘त्रि’च्या ठिकाणी ‘द्वि’ म्हणावे व प्रतिमा दोन कराव्यात. कपाळावर व डोळ्यांवर ठेवाव्यात. पुढील सर्व त्रिपादप्रमाणे.
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2022
TOP