अंत्येष्टिसंस्कार - नग्नप्रच्छादनश्राध्द
हिंदू धर्मामध्ये जन्मापासून अंतापर्यंत, सोळा संस्कार सांगितले आहेत; त्यांतील, हा शेवटचा संस्कार.
(आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे. अमंत्रक प्राणायाम करावा.) अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवंगुणविशेषणविशिष्टायांपुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.) गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्तिकाम: प्रथमदिनविहितं नग्नप्रच्छादनश्राध्दं अद्य दशमेहनि सद्य: करिष्ये (उदक सोडावे; एका पानावर उत्तरेकडे अग्र करुन एक दर्भ ठेवावा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गंध, तुलसीपत्र, तीळ व दर्भ घालून तिलोदक करावे.) गोत्र प्रेत नग्नप्रच्छादनश्राध्दे अयंते क्षण उपतिष्ठतां (चटावर दर्भ द्यावा.) गोत्र प्रेत नग्नप्रच्छादनश्राध्दे पाद्यमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) गोत्रस्य प्रेतस्य नग्नप्रच्छादनश्राध्दे आसनमुपतिष्ठतां (दर्भ व तीळ द्यावे. चटापुढे एक दक्षिणाग्र दर्भ ठेवावा. त्यावर एक उताणा द्रोण ठेवावा. त्यावर एक दक्षिणाग्र दर्भ ठेवावा. त्यात पाणी, गंध, तुलसीपत्र व तीळ घालून अर्घ्य तयार करावे.) गोत्र प्रेत नग्नप्रच्छानदनश्राध्दे इदमर्घ्यं तवोपतिष्ठतां (तयार केलेले अर्घ्य अंगठ्यावरुन चटावर द्यावे.) गोत्र प्रेत नग्नप्रच्छादनश्राध्दे आच्छादनमुपतिष्ठतां (दर्भ द्यावा.) गोत्राय प्रेताय नग्नप्रच्छादनश्राध्दे आमं यथाशक्ति सोपस्करं सघृतं सोदकुंभं सवस्त्रं यथाशक्ति दक्षिणोपेतं सदीपं सफलं उपतिष्ठंतां (आमान्नाजवळ तिलोदक द्यावे.)
(पिंडाकरता एक, दक्षिणाग्र दर्भ चटापुढे ठेवावा व त्यावर तिलोदक द्यावे.) शुंधंतां प्रेता: गोत्राय प्रेताय नग्नप्रच्छादनश्राध्दे अयं सक्तुपिंड उपतिष्ठतां (दर्भावर पिंड द्यावा.) तदुपरि तिलोदकमुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे. थोडे पीठ घेऊन, प्राणाचा निरोध करावा व ते पीठ हुंगून, पिंडाचे बाजूला ठेवावे.) अभ्यंजनमुपतिष्ठतां (काजळ लावावे.) अंजनमुपतिष्ठतां (तूप घालावे.) दशासूत्रंच उपतिष्ठतां (उत्तरीचे सूत पिंडावर घालावे.) गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका वगैरे घालावे.) उपस्थानार्थे तिला: उपतिष्ठंतां (तीळ घालावे.) गोत्राय प्रेताय नग्नप्रच्छादनश्राध्दे दक्षिणोपतिष्ठतां (दक्षिणा द्यावी.) अनादिनिधनो देव: शंखचक्रगदाधर: । अक्षय्य: पुंडरीकाक्ष: प्रेतमुक्तिप्रदो भव ॥
इदं पिंडदानं सकुशतिलोदकं प्रेताप्यायनमस्तु ॥
अस्तुप्रेताप्यायनं (सर्व तिलोदक, अंगठ्यावरुन अश्म्यावर द्यावे.) प्रेतपिंडाय अभिरम्यतां अभिरतास्म: ।
(दुसरी त्रिकोणी वेदी करावी. त्यावर गाईच्या शेणाचे पाणी शिंपडावे. वेदीवर हळद, गंध, तुलसीपत्र ठेवावे. त्यावर मध्ये एक व पूर्वेपासून चार दिशांना चार मातीचे कुंभ पाण्याने भरुन ठेवावेत. प्रत्येक कुंभाजवळ एक एक पताका लावावी. आचमन करुन एक दर्भाचे पवित्रक घालावे व अमंत्रक प्राणायाम करावा.) अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां पुण्यतिथौ मम आत्मन: श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्त्यर्थं (अपसव्य करावे.) गोत्रस्य प्रेतस्य प्रेतत्व निवृत्त्या उत्तमलोकप्राप्त्यर्थं मृता: दशमेहनि दशमदिनविधिं करिष्ये (उदक सोडावे. तिलोदक करावे.) गोत्राय प्रेताय क्षुत्पिपासानिवृत्यर्थं अयं पिंड: सोदकुंभ उपतिष्ठतां (मधल्या कुंभावर पिंड द्यावा.) प्रेतसखिभ्य: अयं पिंड: सोदकुंभ उपतिष्ठतां (पूर्वेकडील कुंभावर पिंड द्यावा.) वैवस्वताय यमाय अयं पिंड: सोदकुंभ उपतिष्ठतां (दक्षिण कुंभावर) वायसेभ्य: अयं पिंड: सोदकुंभ उपतिष्ठतां (पश्चिम कुंभावर) प्रेताधिपतये रुद्राय अयं पिंड: सोदकुंभ उपतिष्ठतां (उत्तम कुंभावर) पिंडोपरि तिलोदकमुपतिष्ठतां (प्रत्येक पिंडावर दिलेल्या क्रमाने तिलोदक द्यावे. पिठाच्या पादुका दहा पोलिका पाच व छत्रे पाच करावी व प्रत्येक पिंडाजवळ ठेवावी.) पादुकाद्वय पोलिका छत्रपताकादि प्रत्येकं तेभ्यस्तेभ्य: उपतिष्ठतां (पिंडावर तिलोदक द्यावे.) अभ्यंजनाञ्जने उपतिष्ठेतां (काजळ, तूप लावावे.)
गंध माल्य तुलसीदल भृंगिराजपत्रमुपतिष्ठतां (गंध, तुलसीपत्र, माका घालावा.) दास्यमान दक्षिणामुपतिष्ठतां (तिलोदक द्यावे.) चलनमुपतिष्ठतां (पश्चिमेकडील पिंड वगळून सर्वांना दर्भ लावावा. पश्चिमेकडील पिंडाला कावळा स्पर्श करीपर्यंत थांबावे. पिंड घेतल्यानंतर अश्म्याला तिळाचे तेल लावून पुढील मंत्राने पाण्यात सोडावा.) इहलोकंपरित्यज्यगतोसिपरमाड्तिम् ।
गतोसिदिव्यदेहेनकुशनेत्वाहंनियोजये ॥
पिंड पाण्यात सोडावे. कर्त्याने व इतर संबंधितांनी स्नान करुन तिलांजली द्यावी. कर्त्याने व इतर मुलांनी क्षौर करावा व स्नान करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 20, 2022
TOP