मेदोवहस्त्रोतस - मेदआवृत वात (आढयवात
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
चल: स्निग्धो मृदु: शीत: शोफोऽड्गेश्वरुचिस्तथा ॥६५॥
आढयवात इति ज्ञेय: स कृच्छ्रो मेदसाऽऽवृत: ।
च. चि. २८/६६ या. १४५३.
मेदानें आवृत झालेल्या वातामुळे चल, मृदु, स्निग्ध, शीत असा शोथ अंगावर उत्पन्न होतो. त्यांत अरुचि असते. याला ``आढयवात'' असेंही नांव चरकानें सांगितलें आहे. माधव निदानानें उरुस्तंभालाच ``आढयवात'' असें एक पर्यायवाचक नांव सांगितलें आहे. तरी येथील हा आढयवात उरुस्तंभापेक्षां निराळा आहे. उरुस्तंभामध्यें आमाची दुष्टी महत्त्वाची असून शोथ मांडयापुरता मर्यादित असतो. तसेंच तो शोथही स्थिर व कठिण असतो. येथील लक्षणें वेगळी आहेत.
चिकित्सा
लंघन, रुक्षण, गुग्गुळाचे कल्प, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा.
N/A
References : N/A
Last Updated : August 07, 2020
TOP