रसवहस्त्रोतस् - मदात्यय

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या

हृदि मद्यगुणाविष्टे हर्षस्तर्षो रति: सुखम् ।
विकाराश्च यथासत्वं चित्रा राजसतामस: ॥
जायन्ते मोहनिद्रान्ता मद्यस्यातिनिषेवणात् ।
स माद्यविभ्रमो नाम्ना मद इत्याभिधीयते ॥
च. चि. २४-३९, ४० पान १३५३

हेतू क्रुद्धेन भीतेन पिपासितेन शोकाभितप्तेन बुभुक्षितेन ॥
व्यायामभाराध्वपरिक्षतेन वेगावरोधाभिहतेन चापि ॥
अत्यम्लभक्ष्यावततोदरणे साजीर्णभुक्तेन तथाऽबलेन ॥
उष्णाभितप्तेन च सेव्यमानं करोति मद्यं विविधान् विकारान् ॥
सु. उ. ४७-१५, १६ पान ७४२, ७४३

भ्यालेला, रागावलेला, तहानलेला, शोकाकुल झालेला, भुकेलेला, व्यायाम, करणारा ओझी वहाणे (उर:क्षत) इत्यादीनी पिडलेला, वेगावरोध करणारा उष्णतेमुळें संतप्त झालेला, अतिशय अम्ल व विदाही असे पदार्थ खाल्लेला माणूस मद्यपान करील वा कोणीहि अति मद्यपान करील तर त्यास मद्यामुळें उत्पन्न होणारे अनेक व्याधी उत्पन्न होतील.

संप्राप्ति

मद्यं हृदयमाविश्य स्वगुणैरोजसो गुणान् ।
दशभिदर्श संक्षोभ्य चेतो नयति विक्रियाम् ॥
लघूष्णतीक्ष्णसूक्ष्माम्लव्यवाय्याशुगमेव च ।
रुक्षं विकाशि विशदं मद्यं दशगुणं स्मृतम् ॥
गुरु शीतं मृदु श्लक्ष्णं बहलं मधुरं स्थिरम् ।
प्रसन्नं पिच्छिलं स्निग्धमोजो दशगुणं स्मृतम् ॥
गुरुत्वं लाघवाच्छैत्यमौष्ण्यादम्लस्वभावत: ।
माधुर्यं मार्दवं तैक्ष्ण्य़ात्प्रसादं चाशुभावनात् ॥
रौक्ष्यात्स्नेहं व्ययायित्वास्थिरत्वं श्लक्ष्णतामपि ।
विकासिभावात्पैच्छिल्यं वैशद्यात्सान्द्रतां तथा ॥
सौक्ष्म्यान्मद्यं निहन्त्येवमोजस: स्वगुणैर्गुणान् ।
सत्त्वं तदाश्रयं चाशु संक्षोभ्य जनयेन्मदम् ॥
रसवातादिमार्गाणां सत्वबुद्धीन्द्रियात्मनाम् ।
प्रधानस्यौजसश्चैव हृदयं स्थानमुच्यते ॥
अतिपीतेन मद्येन विहतेनौजसा च तत् ।
हृदयं याति विकृतिं तत्रस्था ये च धातव: ॥
च. चि. २४-२९ ते ३६ पान १३५०, ५१

तीक्ष्णोष्णेनातिमात्रेण पीतेनाम्लविदाहिना ।
मद्येनान्नरसोत्क्लेदो विदग्ध: क्षारतां गत: ॥
अन्तर्दाहं ज्वरं तृष्णां प्रमोहं विभ्रमं मदम् ।
जनयत्याशु ॥
च. चि. २४-११२, ११३ पान १२६९

लघु उष्ण तीक्ष्ण सूक्ष्म अम्ल व्यवायी शीघ्रगति रुक्ष विकाशी विशद असे मद्याचे दहा गुण आहेत. हे दहा गुण ओजाच्या गुरु शीत मृदु श्लक्ष्ण बहल मधुर स्थिर प्रसन्न पिच्छिल या दहा गुणाशी पूर्णपणें विपरीत असल्यामुळें अधिक प्रमाणांत प्राशन केलेलें मद्य हे रसवह स्त्रोतसांच्या द्वारा हृदयांत शिरुन आपल्या दहा गुणानी ओजाच्या दहा गुणामध्यें विकृति उत्पन्न करुन चित्ताला विकारयुक्त बनवितें. मद्याच्या ज्या गुणामुळें ओजाचा जो गुण विकृत होतो त्याचे वर्णन चरकानें पुढीलप्रमाणें केले आहे. लघुगुणामुळें गुरुचा, उष्ण गुणामुळें शैत्याचा, अम्लामुळें माधुर्याचा, तीक्ष्णतेमुळें मार्दवाचा, शीघ्रगतीमुळें प्रसन्नतेचा रुक्षतेमुळें स्नेहाचा व्यवायित्वानें स्थिरत्वाचा, विकाशित्वानें श्लष्णतेचा, विशदतेनें पिच्छिलतेचा, सौक्ष्म्यामुळें सांद्रतेचा उपघात होतो. ओजाच्या आश्रयानें असणारे मन (चित्त) ओजोविकृतीमुळें प्रक्षुब्ध होते. मन बुद्धि इंद्रिये रसादिधातू सर्वांनाच अतिमद्यपानामुळें विकृति येतें. तीक्ष्ण उष्ण अम्ल व विदाही अशा गुणाच्या मद्यामुळें रसधातूही विदग्ध होतो. व त्यामुळें आंतरदाह, ज्वर, तृष्णा, मोह, भ्रम, मद अशी लक्षणें उत्पन्न होतात.

रुपें

शरीरदु:खं बलवत् संमोहो हृदयव्यथा ।
अरुचि: प्रतता तृष्णा ज्वर: शीतोष्णलक्षण: ॥
शिर:पार्श्वास्थिसन्धीनां विद्युत्तुल्या च वेदना ।
जायतेऽतिबला जृंभा स्फुरणं वेपनं श्रम: ॥
उरोविबन्ध: कासश्च हिक्का श्वास: प्रजागर: ।
शरीरकम्प: कर्णाक्षिमुखरोगस्त्रिकग्रह: ॥
छर्द्यतीसारहृल्लासा वातपित्तकफात्मका: ।
भ्रम: प्रलापो रुपाणामसतां चैव दर्शनम् ॥
तृणभस्मलतापर्णपांशुभिश्चावपूरणम् ।
प्रधर्षणं विहड्गैश्च भ्रान्तचेत: स मन्यते ॥
व्याकुलानामशस्तानां स्वप्नानां दर्शनानि च ।
मदात्ययस्य रुपाणि सर्वाण्येतानि लक्षयेत् ॥
च. चि. २४-१०१ ते १०६ पान १३६६-६७

शरीरामध्यें अनेक प्रकारचे दु:ख होते. हृदयव्यथा, संमोह अरुचि तृष्णा ज्वर, शिर पार्श्व अस्थि संधी या ठिकाणीं विजेचे झटके बसल्याप्रमाणें वेदना होणे, जृंभा, कंप, श्रम, अवयवामध्यें स्फुरण जाणवणें, छातींत जखडल्याप्रमाणें वाटणें, श्वास, कास, हिक्का, निद्रानाश, सर्व शरीर कांपणें, कान डोळे तोंड या ठिकाणीं निरनिराळी (दाहादि) लक्षणें उत्पन्न होणें. त्रिकग्रह छर्दि अतिसार हृल्लास भ्रम प्रलाप, नसलेली दृश्यें दिसणें, व्याकूळ करणारी अशी अयोग्य स्वप्नें पडणे, शरीरावर गवत, राखवेली पानें धूळ पडते आहे असे वाटणें, पक्षी अंगावर धावून येतात असे वाटणें हीं लक्षणें मदात्ययांत होतात. चक्रपाणीनें ही सान्निपातिक मदात्ययाची लक्षणे मानावीत असे मत प्रदर्शित केले आहे. कांहीं टीकाकार या लक्षणाना पूर्वरुपें ही मानतात असे जेज्जटाच्या टीकेवरुन दिसतें. मदात्ययाची हीं लक्षणें मानावीत असें आम्हास वाटतें. कारण वाग्भटानें यांतील बहुसंख्य लक्षणांचा आपल्या ग्रंथात सामान्य नांवानें उल्लेख केला आहे.
(वा. नि. ६-१५/१७)
दोषभेदानें त्यांत कांहीं वैशिष्टय उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

प्रथम मद

पीयमानस्य मद्यस्य विज्ञातव्यास्त्रयो मदा: ।
प्रथमो मध्यमोऽत्यश्च लक्षणैस्तान् प्रचक्ष्महे ॥
प्रहर्षण: प्रीतिकर: पानान्नगुणदर्शक: ।
वाद्यगीतप्रहासानां कथानां च प्रवर्तक: ॥
न च बुद्धिस्मृतिहरो विषयेषु न चाक्षम: ।
सुखनिद्राप्रबोधश्च प्रथम: सुखदो मद: ॥
च. चि. २४-४१ ते ४३ पान १६५३

बुद्धिस्मृतिप्रीतिकर: सुखश्च पानान्निद्रारतिवर्धनश्च ।
संपाठगीतस्वरवर्धनश्च प्रोक्तोऽतिरभ्य: प्रथमो मदो हि ।
मा. नि. मदात्यय ७ पान १७०

मद्यपानास आरंभ केल्यानंतर प्रथामावस्थेंत जो मद्याचा परिणाम दिसून येतो त्यास प्रथम मद असें म्हणतात. या अवस्थेंत बुद्धी स्मृति कार्यक्षम होतात. सुख वाटतें. प्रीति उत्पन्न होते. (करित असेल त्या गोष्टींत रस उत्पन्न होणें) खाणें पिणें झोपणें यांची इच्छा वाटते, मैथुनाची इच्छा व मैथुन शक्ती वाढते. गाणीं गांवीं मौज करावी नृत्य करावे वाद्यें वाजवावी अशी इच्छा होते. कार्यक्षमतेला बाध न येतां उलट उत्साह वाटतो. ही अवस्था सुखकर अशी असते. थकवा दु:ख शोक यांचा परिहार होतो. (च.चि. २४-६७).

द्वितीय मद

अव्यक्तबुद्धिस्मृतिवाग्विचेष्ट: सोन्मत्तलीलाकृतिप्रशान्त: ।
आलस्यनिद्राभिहतो मुहुश्च मध्येन मत्त: पुरुषो मदेन ॥
मा. नि. मदात्यय ८ १७१

मुहु: स्मृतिमुहुर्मोहो(ऽ) व्यक्त । सज्जति वाड्मुहु: ।
युक्तायुक्तप्रलापश्च प्रचलायनमेव च ॥
स्थानपानान्नसांकथ्ययोजना सविपर्यया ।
लिड्गान्येतानि जानीयादाविष्टे मध्यमे पदे ॥
च. चि. २४-४४, ४५ पान १३५३

मदाच्या दुसर्‍या अवस्थेत स्मृति व संज्ञानाश या गोष्टी आलटून पालटून होतात. बोलणें बोबडे होते. हालचालीवरील नियंत्रण जाते. त्यामुळें चेष्टा विकृत होतात. वेडयासारखे चाळें सुरुं होतात. कोठेच नीट लक्ष लागत नाहीं. माणूस चंचल बनतो.

तृतीय मद

गच्छेदगम्यान्न गुरुश्च मन्येत् खादेदभक्ष्याणि च नष्टसंज्ञ: ।
बूयाच्च गुह्यानि हृदि स्थितानि मदे तृतीये पुरुषोऽस्वतन्त्र: ॥
मा. नि. मदात्यय ९ पान १०१

मध्यमं मदमुत्क्रम्य मदमा (म) प्राप्य चोत्तमम् ।
न किंचिन्नाशुभं कुर्युर्नरा राजसतामसा: ॥
को मदं तादृशं विद्वानुन्मादमिव दारूणम् ।
गच्छेदध्वानमस्वन्तं बहुदोषभिवाध्वग: ॥
तृतीयं तु मदं प्राप्य भग्नदार्विव निष्क्रिय: ।
मदमोहावृतमना जीवन्नपि मृतै: सम: ॥
रमणीयान् स विषयान्न वेत्ति न सुहृज्जनम् ।
यदर्थ पीयते मद्यं रतिं तां चा न विन्दति ॥
कार्याकार्य सुखं दु:खं लोके यच्च हिताहितम् ।
यदवस्थो न जानाति कोऽवस्थां तां व्रजेद्‍बुध: ॥
स दूष्य: सर्वभूतानां निन्द्यश्चाग्राह्य एव च ।
व्यसनित्वादुदर्के च स दु:खं व्याधिमश्नुते ॥
च. चि. २४-४६ ते ५१ पान १३५३-५४

मदाच्या तिसर्‍या अवस्थेंत मनुष्याचें स्वत:वरील नियंत्रण पूर्णपणें नाहींसे होते. त्याची विचारशक्ती नाहींशीं होते. तो काय करील व काय नाहीं याचा नियम सांगतां येत नाहीं. तो वाटेल ते खाईल, स्वच्छास्वच्छतेचा विचार करणार नाहीं. बीभत्स चेष्टा करील. मनांतील गुप्तगोष्टी बोलेल, कोणाचाही अपमान करील, स्त्रियांच्यावर बलात्कार करील. आपला परका मित्र शत्रू ही जाणीव नष्ट होईल व अत्यंत नीच अशा अवस्थेस प्राप्त होईल.

चतुर्थ मद

चतुर्थे तु मदे मूढो भग्नदार्विव निष्क्रिय: ।
कार्याकार्यविभागज्ञो मृतादप्यपरो मृत: ॥
को मदं तादृशं गच्छेदुन्मादमिव चापरम् ।
बहोदोषमिवामूढ: कान्तारं स्ववश: कृती ॥
मा. नि. मदात्यय १०, ११ पान १७१

ननु, चरकविदेहवाग्भटाभिश्चतुर्थो मदो न पठितस्त्कथं
सुश्रुतेन पठित: ? उच्यते, चरके या द्वितीयतृतीययोरन्त-
रालावस्था पठिता सैव सुश्रुतेन तृतीयो मद इति कृत्वा
पठित:, यस्तु चरके तृतीय: स सुश्रुते चतुर्थ: पठित इत्य-
विरोध: वस्तुगत्या तु त्रय एव मदा इत्युपपादितम् ।
ननु, किंकारणमेतत्त्रैविध्यमिति चेत् ? उच्यते, मद्यं हि
वह्नितुल्यं, यथा ह्यग्नि: सुवर्णानामुत्तममध्यमाधमानामभि
व्यञ्जकस्तथा मद्यमपि प्राणितां सत्वरजस्तमोभूयिष्ठानां
क्रमेणाभिव्यञ्जकमिति । तथाहि चरक:, ``प्रधानाधम
मध्यानां रुक्माणां व्यक्तिदर्शक: । यथाऽग्निरेवं सत्वाद्यैर्मद्यं
प्रकृतिदर्शकम्-इति । (च. चि. स्था. अ. २४) तस्मात्
प्रथमद्वितीयतृतीयमदा: सत्वराजसस्तमोभूयिष्ठानां क्रमेण भवन्तीत्यर्थ: ।
मा. नि. म. टीका पान १७२

माधवनिदानकारानें मदाची चौथी अवस्था मानली आहे. या अवस्थेमध्यें रोगी बेशुद्ध होऊन मृतवत् पडून रहातो. माधवाच्या टीकाकारानें चौथी अवस्था जी मानली तिचा समन्वय द्वीतीय व तृतीय अवस्थामध्यें एक अवस्था कल्पून केला आहे. चरकाच्या तिसर्‍या अवस्थेंतच माधवनिदानाच्या चौथ्या अवस्थेचा समावेश होतो असें टीकाकारानें सांगितलें आहे. विविकशून्य असें दुष्टाचार व निश्चेष्टता या दोन अवस्था वेगळ्या मानणें अधिक बरें त्यामुळें माधवानें सांगितलेली चौथी अवस्था मानावी असें आम्हास वाटते.

वातज मदात्यय

स्त्रीशोकभयभाराध्वकर्मभिर्योऽतिकशित: ।
रुक्षाल्पप्रमिताशी च य: पिबत्यतिमात्रया ॥
रुक्षं परिणतं मद्यं निशि निद्रां विहत्य च ।
करोति तस्य तच्छीघ्रं वातप्रायं मदात्ययम् ॥
हिक्काश्वासशिर:कम्पपार्श्वशूलप्रजागरै: ।
विद्याद्वहुप्रलापस्य वातप्रायं मदात्ययम् ॥
च. चि. २४-८९ ते ९१ पान १३६३ ६५

मैथुन शोक भय भारवहन मार्गक्रमण, पंचकर्म इत्यादीनी कृश झालेला, मोजके अल्प अन्न खाणारा, रुक्ष पदार्थ खाणारा, जागरण करणारा, मनुष्य फार रुक्ष असे मद्यप्राशन करील तर त्याला वातज मदात्यय होईल. हिक्का, श्वास, शिर:कंप, पार्श्वशूल, निद्रानाश, प्रलाप हीं लक्षणें वातज मदात्ययांत असतांत.

पित्तज मदात्यय

तीक्ष्णोष्णं मद्यमम्लं च योऽतिमात्रं निषेवते ।
अम्लोष्णतीक्ष्णभोजी च क्रोधनोऽग्न्यातपप्रिय: ॥
तस्योपजायते पित्ताद्विशेषेण मदात्यय: ॥
स तु वातोल्बणस्याशु प्रशमं याति हन्ति वा ॥
तृष्णादाहज्वरस्वेदमूर्च्छातीसारभ्रमै: ।
विद्याद्धरितवर्णस्य पित्तप्रायं मदात्ययम् ॥
च. चि. २४-९२ ते ९४ पान १३६५

अम्ल उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाणारा रागीट, उष्णप्रिय असलेला मनुष्य तीक्ष्ण उष्ण अम्ल गुणाचे मद्य अधिक प्रमाणांत प्राशन करील तर त्यास पित्तज महात्यय होतो. तृष्णा, दाह, ज्वर, स्वेद, मूर्च्छा, अतिसार, भ्रम, हरितवर्णता हीं लक्षणें पित्तज मदात्ययांत असतांत.

कफज मदात्यय

तरुणं मधुरप्रायं गौडं पैष्टिकमेव वा ।
मधुरस्निग्धगुर्वाशी य: पिबत्यतिमात्रया ।
अव्यायामदिवास्वप्नशय्यासनसुखे रत: ।
मदात्ययं कफप्रायं स शीघ्रमधिगच्छति ।
छर्द्यरोचकहृल्लासतन्द्रास्तैमित्यगौरवै: ।
विद्याच्छीतपरीतस्य कफप्रायं मदात्ययम् ॥
च. चि. २४-९५ ते ९७ पान १३६५

मधुर, स्निग्ध, गुरु, असे पदार्थ खाणारा व्यायाम न करणारा दिवसा झोपणारा नेहमीच स्वस्थ बसून रहाणारा माणूस गुळापासून वा पिठापासून बनवलेले, नुकतेच तयार झालेले व मधुर रसात्मक असे मद्य अतिप्रमाणांत सेवन करील तर त्यास कफज मदात्यय होतो. छर्दी अरोचक, हृल्लास तंद्रा, स्तैमित्य, गुरुता, शीतबाधा हीं लक्षणें मदात्ययांत असतात.

त्रिदोषज मदात्यय

विषस्य ये गुणा दृष्टा: सन्निपातप्रकोपणा: ।
त एव मद्ये दृश्यते विषे तु बलवत्तरा: ॥
हन्त्याशु हि विषं किंचित् किंचिद्रोगाय कल्पते ।
यथा विषं तथैवान्न्यो ज्ञेयो मद्यकृतो मद: ॥
तस्मात् त्रिदोषजं लिड्गं सर्वत्रापि मदात्यये ।
दृश्यते रुपवैशेष्यात्पृथक्त्वं चास्य लक्ष्यते ॥
च. चि. २४-९८ ते १०० पान १३६६

सर्व मदात्ययं विद्यात् त्रिदोषमधिकं तु यम् ।
दोषं मदात्यये पश्येत् ।
च.चि. २४-१०७ पान १३६७

मद्याचे व विषाचे गुण सारखेच आहेत. विषामध्यें मद्याचे गुण अधिक उत्कटतेनें असल्यामुळें ते जास्त मारक होते. विष ज्याप्रमाणें सन्निपातप्रकोपक आहे. त्याप्रमाणें मद्यहि सन्निपातप्रकोपक असून तीन्हीप्रकारच्या मदात्ययांत सांगितलेलीं लक्षणें या सन्निपाताच्या प्रकारांत मिळून होतांत. सर्वच मदात्यय वस्तुत: सान्निपातिक आहेत. आधिक्य पाहून दोष विनिश्चय करावा लागतो.

पानात्ययं परमदं पानाजीर्णमथापि वा ।
पानविभ्रममुग्रं च तेषां वक्ष्यामि लक्षणम् ॥
सु. उ. ४७-१७

स्तम्भांगमर्दहृदयग्रहतोदकम्पा:
पानात्ययेऽनिलकृते शिरसो रुजश्च ॥
स्वेदप्रलापमुखशोषविदाहमूर्च्छा:
पित्तात्मके वदनलोचनपीतता च ॥
श्लेष्मात्मके वमथुशीतकसप्रसेका:
सर्वात्मके भवति सर्वविकारसंपत् ॥
सु. उ. ४७-१८

उष्माणमड्गुरुतां विरसाननत्वं
श्लेष्माधिकत्वमरुचिं मलमूत्रसड्गम् ॥
लिड्गं परस्य तु मदस्य वदन्ति तज्ज्ञा
स्तृष्णां रुजां शिरसि सन्धिषु चापि भेदम् ॥
मु. उ. ४७-१९

अध्मान्मुद्गिरणमम्लरसो विदाहो
ऽजीर्णस्य पानजनितस्य वदन्ति लिड्गम् ॥
ज्ञेयानि तत्र भिषजा सुविनिश्चितानि
पित्तप्रकोपजनितानि च कारणानि ॥
सु. उ. ४७-२०

हृद्गात्रतोदवमथुज्वरकण्ठधूम-
मूर्च्छाकफस्त्रवणमूर्धरुजो विदाह: ।
द्वेष: सुरान्नविकृतेषु च तेषु तेषु
तं पानविभ्रममुशन्त्यखिलेन धीरा: ॥
सु. उ. ४७-२१ पान ७४३

सुश्रुतानें पानात्यय परमद पानाजीर्ण पानविभ्रम या नांवानें कांहीं मद्यविकार उल्लेखिले आहेत. सुश्रुतानें सांगितलेला पानात्यय व चरकानें उल्लेखलेला मदात्यय हे एकच आहेत.

परमद:

अंग उष्ण होणे, जड वाटणें, तोंडाची चव जाणे, कफ वाढणें (लाळ सुटणे, थुंकीतून कफ पडणे) मूत्रपुरीषाचा अवरोध होणें तहान लागणें, डोके दुखणे, सांधे दुखणें, हीं लक्षणें परमदांत होतात.

पानाजीर्ण

अध्मान अम्लछर्दि, विदाह, पित्तप्रकोपाची इतर लक्षणे पानाजीर्ण व्याधीत होतात.

पानविभ्रम

गात्रशूल , हृद्‍शूल, छर्दि, ज्वर, कंठधूमायन, मूर्च्छा, कफस्त्राव, शिर:शूल विहाह, अन्न व मद्य यांचा द्वेष ही लक्षणे पानविभ्रम या विकारांत होतात.

N/A

References : N/A
Last Updated : July 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP