रसवहस्त्रोतस् - ज्वर भूताभिषंगज
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
ग्रहेनास्मिन् अकस्मात् हासरोदने । वा. नि. २-४७ भूतबाधेमुळें उत्पन्न होणार्या ज्वरामध्यें बीभत्स चेष्टा करणे, मधेंच हासणें, रडणें, प्रलाप इत्यादि लक्षणें भूतविशेषाप्रमाणें असतात. वर जी अभिषंगज कारणांनी उत्पन्न होणार्या ज्वरामधील प्रकारभेदाप्रमाणें आढळणारी लक्षणें सांगितली आहेत, ती कधी ज्वर या लक्षणाच्या आधी उत्पन्न होतात, कधीं ज्वर लक्षणासह उत्पन्न होतात, तर कधीं ज्वर हें लक्षण आधी उत्पन्न होऊन इतर लक्षणें त्यानंतर क्रमानें दिसतात. ज्वराव्यतिरिक्त इतर व्याधी या अभिषंगज कारणांनीं उत्पन्न झाले तर त्यामध्येंहि विशेष लक्षणें वर सांगितल्याप्रमाणेंच असतात.
N/A
References : N/A
Last Updated : July 24, 2020
TOP