अभिचाराभिशापाभ्यां सिद्धानां य: प्रवर्तते ।
सन्निपातज्वरो घोर: स विज्ञेय: सुदु:सह: ॥
सन्निपातज्वरस्योक्तं लिड्गं यत्तस्य तत् स्मृतम् ।
चित्तेन्द्रियशरीणामर्तयोऽन्याश्च नैकश: ॥
प्रयोगं त्वभिचारस्य दृष्टा शापस्य चैव हि ।
स्वयं श्रुत्वाऽनुमानेन लक्ष्यन्ते प्रशमेन वा ॥
वैविध्यादभिचारस्य शापस्य च तदात्मके ।
यथाकर्म प्रयोगेण लक्षणं स्यात् पृथग्विधम् ॥
च. चि. ३-११८ ते १२१ पान ९११
यौ तु शापाभिचारजौ ।
सन्निपातज्वरौ घोरौ तावसह्यतमौ मतौ ॥
वा. नि. २-४३ पान ४५४
तत्राभिचारिकैर्मन्त्रैर्हूयमानस्य तप्यते ।
पूर्व चेतस्ततो देहस्ततो विस्फोटतृड्भ्रमै: ॥
सदाहमूर्च्छैर्ग्रस्तस्य प्रत्यहं वर्द्धते ज्वर: ।
अभिचारिकैर्मन्त्रैरथर्ववेदाद्युपदिष्टै:, हूयमानस्य पुंस:,
यन्नामोद्देशेन हवि:प्रक्षेप: स द्वयमान उच्चते, अभिचार-
मधिकृत्य प्रणीत इति ``प्राग्वहतेष्ठक्'' ठक् । हूयमानस्य
पुंस: प्रथमं चेतस्तप्यते सदु:खं जायते । तत: अनन्तरं,
देह:-शरीरं तप्यते सज्वरं सम्पद्यते । तत अनन्तरं,
विस्फोटतृड् भ्रमैर्दाहमूर्च्छायुतैर्ग्रस्तस्य आक्रान्तस्य, प्रत्यहं
ज्वरो वर्द्धते ज्वरस्याधिक्यं भवति । तनव: स्फोटा एव
विस्फोटा भण्यन्ते ।
वा, नि. २-४४ ते ४५ स. टीकेसह पात ४५५
अभिचार म्हणजे जारण, मारण, उच्चाटनाचे वा भानामतीचे प्रयोग, यालाच लोकभाषेंत करणी करणें असेंहि म्हणतात. अथर्ववेदादि ग्रंथांत सांगितलेल्या विशिष्ट पद्धतीच्या मंत्रानें होम, हवन या सारखी वामाचारीं कृत्यें करुन विशिष्ट व्यक्तीस उद्देशून या मंत्रशक्तींचा प्रयोग केला जातो. या प्रयोगामुळें प्रथम मनावर परिणाम होतो. तें संतप्त होतें. नंतर शरीरास बाधा होतें, व विस्फोट, तृष्णा, भ्रम, दाह, मूर्च्छा अशीं लक्षणें होतात, ज्वर सारखा वाढत जातो. या ज्वराचें निदान अभिचार प्रयोग पाहून वा अनुमानानें केलें जातें. या ज्वराच्या शमनासाठीहि बलि, मंगल, होमादि दैवव्यपाश्रय चिकित्सा करावी लागते.
अभिशापज
देव, गुरु, सिद्ध पुरुष यांची अवज्ञा केली व त्यांनीं संतापून शाप दिला तर ज्वर उत्पन्न होतो. सन्निपातासारखीं लक्षणें दिसतात. आगंतुज्वरांतील अभिशापज व अभिचारज हे दोन ज्वरप्रकार श्रद्धाविषय आहेत. व्यवहारामध्यें कांहीं वेळां यावर विश्वास ठेवणें भाग पडावें. अशीं परिस्थिती उत्पन्न होते. अभिचारासाठीं व अभिशापासाठींहि त्या त्या प्रयोगांनीं पीडा उत्पन्न करुं शकणार्या व्यक्तीच्या ठिकाणीं अलौकिक स्वरुपाचें, विशिष्ट प्रकारचें, दैवी सामर्थ्य असावें लागतें तरच या गोष्टी मानल्या जातात. अभिचार्कर्माचे उल्लेख प्राचीन वाड्मयांत पुष्कळ आहेत. या वाममार्गी प्रयोगांचें मार्गदर्शन करणारे कांहीं तंत्रग्रंथहि उपलब्ध आहेत. या पद्धतीनें प्रयोग करुन पीडा उत्पन्न करणें हें अतिप्राचीन काळापासून निंद्य मानलें गेलें आहे. देवऋषी या नांवानें वावरणारा एक वर्ग अद्यापहि समाजामध्यें आहे. आणि अशिक्षित वर्गावर त्याचा प्रभाव अजूनहि बराच आहे असें दिसून येते.