नृसिंह जयंती - प्रल्हादजन्म व चरित

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तया दैत्यालागी होय तैसा सुत । महाभाग्यवंत विष्णुप्रिय ॥१॥
गुरुगृही ठेवी, शास्त्रे पढवीत, । उपकारक होत, संसारा जी ॥२॥
प्रल्हाद हे नाम नामासम सुत । राहत डोलत विष्णुनामे ॥३॥
एके दिनी पिता, घेवोनी अंकासी, । विचारी तनयासी, रुचे काय ॥४॥
तये भगवद्भक्ति सांगतां कोपला । दूषण , उपाध्यायाला, देत असे ॥५॥
तुम्ही शिकविले तैसा हा बोलतो । याहुनी जाणतो बाल काय ॥६॥
विष्णुद्वेष यासी शिकवा म्हणत । कुलधर्मरत करा यासी ॥७॥
भौतिक शास्त्रांचा करवा अभ्यास । वृद्धी संसारास जण होय ॥८॥
गुरु विचारीती अरे बा प्रल्हादा । काय अनुवादा करितोसी ॥९॥
कोणी शिकविले सांगरे तुजला । दूषण आम्हांला येवो नये ॥१०॥
प्रल्हाद म्हणत, मज शिकविता , । तया भगवंताविण, नाही ॥११॥
घेवोनियां वेत तयासि ताडिती । बळे शिकविती जडशास्त्रे ॥१२॥
पुन्हां पिता घेई जवळि बालक । भीत अध्यापक परमची ॥१३॥
काय तुज रुचे पृच्छा करी दैत्य । विष्णुभक्ती नित्य गोड वाटे ॥१४॥
हेच सार आहे सकळ जीवांसी । तया माधवासी नित्य गाणे ॥१५॥
चेतला तो बहु दूर लोटी बाळ । म्हणे माझा काळ मूर्तिमंत ॥१६॥
जेणे वधीयेला पितृव्य असे याचा । पक्ष घेत त्याचा मजपुढे ॥१७॥
आमुचा जो वैरी तयासी भजतो । लांछन लावीतो आम्हांलागी ॥१८॥
अहो दैत्यवर, अग्निशस्त्रविष । घेवोनि, सरोष, मारा यासी ॥१९॥
अग्निमध्ये जाळा, शस्त्राने हा तोडा । शरीर याचे फ़ाडा निर्दयत्वे ॥२०॥
हालाहल विष यासी तुम्ही पाजा । अग्निमध्ये भाजा जिवंतची ॥२१॥
शिळादगडांनी यासी तुम्ही ठेचा । कृतान्त हा साचा मज वाटे ॥२२॥
मृत्यु असे माझा केवळ उदेला । मज खावयाला प्राप्त झाला ॥२३॥
विनायक म्हणे दैत्य ते झटती । तया अमराप्रती मारावया ॥२४॥


N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP