नृसिंह जयंती - हिरण्यकश्यपुच्या चरित्रापासून बोध

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


रविवार ता. ११-५-१९३०

दुर्लभ हा जन्म, लाभुनि मानवाचा । संग्रह संसाराचा करीताती ॥१॥
संसारांत जाय गढून पामर । पडत विसर इतराचा ॥२॥
होवोनियां गृही धर्म अर्थ काम । जोडी अनुपम किती तरी ॥३॥
परी मोक्षासाठी कोणीही झटेना । स्वहित साधिना मानव हा ॥४॥
स्वार्थ-बुद्धि दृढ, त्यांत लिंपड्तो । तेच तेच करितो पुन्हां पुन्हां ॥५॥
भोग-संग्रहाचा तयास हव्यास । पावत दु:खास जन्मोजन्मी ॥६॥
निजपर ऐसा भेद धरी मनी । भेदबुद्धी जनी वावरत ॥७॥
तेणे शांती ढळे मन:क्षोभ होय । घडत अपाय जीवालागी ॥८॥
उत्कर्ष भोगाचा परम दावोनी । शांती नाही मनी दावियेले ॥९॥
हिरण्यकश्यपूच्या दृष्टान्ताने खूण । दावी नारायण सर्व जगा ॥१०॥
नर-हरि-रुपे स्वये प्रगटला । मृत्यु द्यावयाला असुरासी ॥११॥
जन्म मृत्यु कधी न चुकत स्वार्थाने । दृढ तपस्येने न चुकत ॥१२॥
हरीभजनावीण फ़ेरा न चुकत । जीवन्मुक्त होत दृढ बद्ध ॥१३॥
पुन्हां पुन्हां जन्म पुनरपि मरण । ऐसे आवर्तन घडतसे ॥१४॥
हाच अभिप्राय नरहरी देवे । आम्हां कृपाभावे दावियेला ॥१५॥
विनायक म्हणे नृहरीजयन्ती । करणे आज स्मृति जन्मदिनी ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP