नृसिंह जयंती - देवांची भगवंतास विनंति

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


स्थानभ्रष्ट देव होवोनियां दीन । करिती स्तवन माधवाचे ॥१॥
कोणी सोडविता आतां आम्हांलागी । आधार न जगी उरलासे ॥२॥
विधि-वर-बळे मत्त निशाचर । केलासे कहर त्रिभुवनी ॥३॥
महा-विष्णु-द्वेष्टा प्रतापी अनंत । आम्ही झालो त्रस्त देवा धांवा ॥४॥
सांगितले तेव्हां त्याचे पोटी सुत । महाभागवत उपजेल ॥५॥
तयापाशी द्वेष करील दुरात्मा । तेव्हां मी परमात्मा अवतरेन ॥६॥
नरहरिरुपे प्रगटेन जाणा । दैत्याच्या हनना साधीन मी ॥७॥
विनायक म्हणे देव आश्वासिले । भगवंते भले कृपाळुत्वे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP