मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १२ वा| अध्याय १ ला स्कंध १२ वा द्वादश स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा स्कंध १२ वा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध १२ वा - अध्याय १ ला Translation - भाषांतर ॥१॥परीक्षिती म्हणे परमात्मा कृष्ण । जातां निजधाम लक्षूनियां ॥१॥कोण्यावंशी कोण जाहले नृपाळ । पुढती होईल कोण सांगा ॥२॥निवेदिती शुक मागध देशांत । पुरंजय अंत्य कथिला पूर्वी ॥३॥मंत्रीचि तयाचा, तयातें वधील । स्वपुत्रा अर्पील राज्य त्याचें ॥४॥’ प्रद्योत ’ त्या नाम पुढती ’ पालक ’ । प्रद्योताचा पुत्र करिल राज्य ॥५॥’विशाखयुप ’ तैं ’ राजक ’ पुढती । ’ नंदिवर्धना ’ सी पुढती राज्य ॥६॥अष्ट त्रिंशोत्तर शर संवत्सर । वंशाचा विस्तार ऐशापरी ॥७॥वासुदेव म्हणे ज्ञाते निवेदिती । भूत-भविष्यही सहेतुक ॥८॥॥२॥शिशुनाग नृप येईल पुढती । जाणाव पुढती ’ काकवर्ण ’ ॥१॥’ क्षेमधर्मा ’ ’ क्षेत्रज्ञ ’ तैं ’ विधिसार ’ । पुढती ’ अजातशत्रु ’ राजा ॥२॥’ दर्भक ’ ’ अजय ’ तो ’ नंदिवर्धन ’ । ’ महानंदी ’ जाण अंत्य राव ॥३॥राव ऐसे दश षष्टयुत्तर शत । त्रय संवत्सर, नृपाळ हे ॥४॥वासुदेव म्हणे शिशुनागवंश । ऐसा, आतां वृत्त पुढती ऐका ॥५॥॥३॥शुद्रस्त्रीपासूनि महानंदीप्रति । होईल पुढती पुत्र ’ नंद ’ ॥१॥क्षत्रीयविनाश करील समूळ । सैन्य संरक्षील असंख्य हा ॥२॥’ महापद्म ’ तेणें पावेल तो नाम । पुढती धर्महीन शूद्र राजे ॥३॥’ सुपाल्यादि ’ अष्ट पुत्र ते नंदाचे । रज्य शरवर्षे रक्षितील ॥४॥वासुदेव म्हणे ऐसा नंदराज । जाण विनाशक क्षात्रकुळा ॥५॥॥४॥चाणक्य, नंदांचा करुनियां नाश । चंन्द्रगुप्ता राज्य अर्पील तें ॥१॥मौर्यवंश ऐसा प्रसिध्दी पावेल । चंद्रगुप्तपुत्र ’ वारिसार ’ ॥२॥पुढती ’ अशोकवर्धन ’ तत्पुत्र । ’ सुयशा ’ तत्सुत पुढती नृप ॥३॥’ संगत ’ तैं ’ शालिशूक ’ ’ सोमशर्मा ’ । पुढती ’ शतधन्वा ’ ’ बृहद्रथ ’ ॥४॥वासुदेव म्हणे सप्त त्रिंशोत्तर । शत संवत्सर राज्य त्यांचें ॥५॥॥५॥’ पुष्पमित्र ’ शुंगवंशीय पुढती । मंत्री तो मौर्यासी वधूनि राजा ॥१॥’अग्निमित्र ’ पुत्र ’ सुज्येष्ठ ’ पुढती । ’वसुमित्र ’ तेंवी ’ भद्रक ’ तो ॥२॥’ पुलिंद ’ ’ घोष ’ तैं ’ वज्रमित्र ’ नामा । ’ भागवत ’ जाणा ’ देवभूति ’ ॥३॥वासुदेव म्हणे वर्षशताधिक । नृपाळ हे शुंग पुढती जाणा ॥४॥॥६॥कण्ववंशीय तो वसुदेव अंती । वधूनि नृपासी राव होई ॥१॥’भूमित्र " पुढती पुत्र त्याचा राव । ’ नारायण ’ होय पुढती राजा ॥२॥’ सुशर्मा ’ तो अंती होईल नृपाळ । राज्य दीर्घकाळ कण्वांचें या ॥३॥वासुदेव म्हणे पुढती शूद्रचि । दूत तयाप्रति वधिल सौख्यें ॥४॥॥७॥’ बलि ’ तया नाम बंधू त्याचा ’ कृष्ण ’ । पुत्र ’शांतकर्ण ’ पुत्र त्याचा ॥१॥’पौर्णमास ’ ’ लंबोदर ’ ’ चिबिलक ’ । ’ मेथस्वाति ’ देख ’ अटमान ’ ॥२॥’ अनिष्टकर्मा ’ तैं ’ हालेय ’ पुढती । ’ तलक ’ तयासी ’ पुरीषभीरु ॥३॥’सुनंदन ’ त्याचा ’ चकोर ’ पुढती । अष्टपुत्र त्यासी ’ बहु ’ नामक ॥४॥’शिवस्वाति ’ ’ बहु ’ अष्टांमाजी अंत्य । ’ गोमती ’ तत्पुत्र ’ पुरीमान् ॥५॥’ मेदशिरा ’ ’शिवस्कंध ’ ’यज्ञश्री ’ ही । ’ विजय ’ तो पाहीं ’ चंद्रविज्ञ ’ ॥६॥’ सलोमधि ’ राज्य करील पुढती । वासुदेव कथी आंध्र वंश ॥७॥॥८॥अवभृति पुरीं ’ आभीर ’ ते सप्त । ’ गर्दभी ’ ही दश पुढती राव ॥१॥षोडश ते ’ कंक ’ येतील पुढती । ’ यवन ’ पुढती अष्टसंख्य ॥२॥’ तुरुष्क ’ ते चतुर्दश त्या पुढती । ’ गुरुंड ’ पुढती दश राजे ॥३॥एकादश शतामाजी एक न्य़ून । जाणें सार्वभौम नृपाळ ते ॥४॥त्रिशतसंवत्सरें पुढती ते ’ मौन ’ एकादश जाण संख्या त्यांची ॥५॥वासुदेव म्हणे पुढती ऐकावें । वृत्त ध्यानीं घ्यावें सविस्तर ॥६॥॥९॥किलकिलापुरीनिवासी नृपाळ । राज्य हांकितील पुढती श्रेष्ठ ॥१॥’भूतनंद ’ तेंवी ’ वंगिरी ’ पुढती । ’ शिशुनंदी ’ पुढती राव ॥२॥’ यशोनंदी ’ तेंवी राव ’ प्रवीरक ’ । पुढती ’ बाल्हिक ’ त्रयोदश ॥३॥’ पुष्यमित्र ’ तेंवी ’ दुर्मित्र ’ तत्सुत । मध्येचि क्षत्रिय राव होती ॥४॥पुढती बाल्हिक व्यापितील देश । आंध्रादिक त्यांस तेणें नामें ॥५॥पुढती मागधीं ’ विश्वस्फूर्जि ’ नामें । विख्यात जो नामें पुरंजय ॥६॥म्लेच्छातुल्यवर्ण स्थापील तो जनीं । संकरचि जनीं प्रवर्तेल ॥७॥गंगाद्वाराहुनि प्रयागापर्यंत । करील हा राज्य क्षत्रद्वेष्टा ॥८॥वासुदेव म्हणे पुढती अधर्म । जाईल माजून देशोदेशीं ॥९॥॥१०॥सौराष्ट्र, अवंती, आभीर, अर्बुद । शूद्र तैं मालवदेशामाजी ॥१॥उपनयनादि त्यजितील विप्र । शूद्रांचा आचार सहज तेणें ॥२॥सिंधु चंद्रभातीरस्थ प्रदेश । तेंवी कौंतीदेश काश्मीरही ॥३॥व्यापितील शूद्रप्राय राव द्विज । एकचि हा काळ सर्व ठाई ॥४॥अधार्मिक भ्रष्ट तेंवी शीघ्रकोपी । अवध्य तयांसी न उरे कोणी ॥५॥परद्रव्य, परदाराअपहार । यथेच्छ होईल, अल्पायु त्यां ॥६॥क्षत्रिय नांवाचे परी म्लेच्छासम । करितील जाण राज्य क्रूर ॥७॥राजासम प्रजा ऐसी धर्मभ्रष्ट । होईल विनाश पुढती ऐसा ॥८॥वासुदेव म्हणे स्वार्यांध नृपाळ । क्रौर्ये नाशितील सकल विश्व ॥९॥ N/A References : N/A Last Updated : December 17, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP