॥आरती मल्लारीची॥
खंडोबा देवा संबंधात असा एक समज आहे की, खंडोबा मूळत: ऐतिहासिक वीर पुरूष होते. नंतर कालांतराने त्यांना देवता मानले गेले.
पंचाननयहयवाहनसुभूषितनीळा ॥ खंडामंडितदंडितदानविंअवलीळा ॥ मणिमल्लमर्दुनियांजोशिरीपिंवळा ॥ हीरेकंकणबासिंगेंसुमनांच्यामाळा ॥१॥
जयदेवजयदेवजयशिवमल्लारी ॥ वारीदुर्जनवारीनिंदकअपहारी ॥धृ०॥
सुरवरसंवरवरदेमजलागींदेवा ॥ नानानामेंगाइनहीतुमचीसेवा ॥ अघटितगुणगावयावाटतसेहेवा ॥ फणिवरशिणलाकीतीनरपामरकेवा ॥ जय० ॥२॥
रघुविरस्मरणींशंकरहृदयींनिवाला ॥ तोहामदनांतकअवतारझाला ॥ यालागींआवडींभावेंवर्णिला ॥ रामींरामदासाजिवलगभेटला ॥ जयदेवजयदेव० ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : August 22, 2019
TOP