मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|शाक्तांस शिक्षा| ६२११ ते ६२२० शाक्तांस शिक्षा ६१७४ ते ६१८० ६१८१ ते ६१९० ६१९१ ते ६२०० ६२०१ ते ६२१० ६२११ ते ६२२० शाक्तांस शिक्षा - ६२११ ते ६२२० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत शाक्तांस शिक्षा - ६२११ ते ६२२० Translation - भाषांतर ॥६२११॥शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥२॥उदक भिन्न असे काई । वाहाळ बावी सरिता नई ॥३॥सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥४॥वर्णा भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥५॥करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥६॥वर्त्ते एकविध अग्नि । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥७॥तुका ह्मणे पात्र चाड । किंवा विषें अमृत गोड ॥८॥॥६२१२॥नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळही हेम ॥२॥पर्जन्य वर्षतां जीवना वहावट । तें समसकट गंगे मिळे ॥३॥सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥४॥महांपुरीं जैसे जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥५॥तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवी ते बुडती अनामिक ॥६॥नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होऊनी एकरुप ॥७॥तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥८॥पूर्वानुओळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥९॥नामामृतें झाले मुळीचें स्मरण । सहज साधन तुका ह्मणे ॥१०॥॥६२१३॥शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुति दास ॥१॥त्याची तुक कांहीं चुकतां चि नीत । होसील पतीत नरकवासी ॥२॥बहुत झालासी चतुर शाहाणा । शुद्ध आचरण चुकों नको ॥३॥शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहीं ॥४॥तुका ह्मणे तरि वर्तुनि निराळा । उमटती कुळा ब्रम्हींचिया ॥५॥॥६२१४॥ब्राह्मणा न कळे आपलें तें वर्म । गंवसे परब्रम्ह नामें एका ॥१॥लाहानथोरासि करितो प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा ॥२॥सर्वाप्रति माझी हेचि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥३॥केशव नारायण करितां आचमन । तेचि संध्या स्नान कर्मक्रिया ॥४॥नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥५॥तुका ह्मणे हेंचि निर्वाणींचे शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥६॥॥६२१५॥एकीं असे हेवा । एक आनावड जीवां ॥१॥देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ट मध्यस्ती ॥२॥प्रीतिसाठीं भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥३॥तुका ह्मणे लळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥४॥॥६२१६॥ब्राम्हण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥१॥रामकृष्णनामें उच्चारी सरळें । आठवी सांवळें रुप मनीं ॥२॥शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥३॥तुका म्हणे गेल्या षडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रम्हचि तो ॥४॥॥६२१७॥तुम्ही नका करुं गर्व । उंच याति मिळून सर्व ॥१॥शुक्र शोणिताच्या खाणी । तुम्हा आम्हा एकच योनी ॥२॥रक्त मांस चर्म हाडें । सर्वा ठायीं सम पाडें ॥३॥तुका म्हणे हेंचि खरें । नाहीं देवासी दुसरें ॥४॥॥६२१८॥ब्राम्हण तरी एक नरहरि सोनार । ज्यासाठीं शंकर माथां राहे ॥१॥ब्राम्हण तरी एक सजना कसाई । चक्रधारीं गृहीं मांस विकी ॥२॥तुका ह्मणे ब्रम्ह जाणे तो ब्राम्हण । येरातें नमन करा परतें ॥३॥॥६२१९॥ब्राह्मण ते कोण ह्मणावें कोणासी । सांगावें आह्मासी कृपानिधी ॥१॥वेदाचें वचन आठउनी मनीं । बोलावी ते वाणी सत्यंजय ॥२॥असत्य बोलतां पूर्वजां दूषण । पहा विचारुन श्रुतीमध्यें ॥३॥अंघोळी धोत्रें लेतां आभरण । काय इतर जन न करिती ॥४॥टिळे माळा मुद्रा नित्य करी श्वान । नव्हती ब्राम्हण निश्चयेसी ॥५॥बाबाजी सद्गुरुदास तुका ह्मणे । पुढील कारण सांगों आतां ॥६॥॥६२२०॥सोनियाचें श्वान भाळींचा मुगुट । एकचि कनक मोलें घेतां ॥१॥दुध तापविलें सोनियाचे भांडीं । मातिचिये हांडीं स्वाद एक ॥२॥ऊंसाचा परिपाक शूद्रें गुळ केला । ब्राह्मणीं रांधिला स्वाद एक ॥३॥गाईचिया जाती असती नानावर्ण । दुधा शुभ्रपण सारिखेंचि ॥४॥तुका ह्मणे ऐसा भावार्थ कारण । जाती थोर हीन नाहीं देवा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP