आदिप्रकरण - अध्याय पांचवा

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


श्रीम्हालसा त्रिभुवनेश्वरी आदिमाया
जे वैष्णवी त्रिपुरभैरवि भव्यकाया ।
नारायणी निरखितां अतितोषचित्तें
तत्सन्निधी वसति आवडति जनांते ॥१॥
केली तिच्यानिकट राहुनि ज्ञानदेवी
गीतार्थ तेचि घडलि सति देवदेवी ।
आचार्य - शंकर - विनिर्मितभाष्य जैसें
केलं असें परम भाषणयुक्ता तैसें ॥२॥
केलाऽमृतानुभव तो कथितां निवृत्ती
तो या क्षिती अमृत साम्यचि येत व्यक्ती ।
तेथूनियां निघति वंदुनि ते भवानी
लोकेश्वरी परमपावन विश्वयोनी  ॥३॥
यावें अलंदिस असीच धरोनि इच्छा
ते चालले सहज वर्तति ते यदृच्छा ।
मार्गी महानुभव भेटति संत कोणी
तेथेंचि वास करिताति निराभिमानी ॥४॥
दावोनि त्यांसि रमताति कला विशाला
सत्कीर्तनाविण घडी न वचे जयांला ।
आळ्याचिये उपवनीं वसतीस आले
टाकी कळेवर हळेश्वर वेद बोले ॥५॥
देवोनि त्याप्रति समाधि करोनि पूजा
तो धाडिला हरिपदा पशुलागि पैजा ।
जैसा गजेंद्र हरिनें स्वपदासि नेला
ज्ञानेश्वरें महिषपुत्र विमुक्त केला ॥६॥
ऐसा अगाध महिमा सुजनांसि दावी
एकामुखें कविजनी कितिसी वदावी ? ।
जो ज्ञानदेव हरि तोचि धरेसि आला
त्याची अगाध विलसे अतिचित्र लीला ॥७॥
आले स्वजन्मनिलयासि अलंदिकेला
होता यथास्थित सुहृज्जन तो भुकेला ।
त्यातें निरीक्षुनि सुखी नमिती जनांते
भेटोनि ते असल ज्याप्रति जेंवि नातें ॥८॥
देवत्रयासम विराजति देहधारी
हे ब्रम्हसार पुतळे जगसौख्यकारी ।
जे वर्तती निजविलासगुणें सदांही
सत्कीर्तिघोष अति गाजत देश दाहीं ॥९॥
हे धन्य धन्य ह्मणती जन यांसि सारे
ज्यांचे निरीक्षुनि अनेकगुणी पसारे ।
कर्पूर वास लपवी तरि काय राहे
सत्कीर्ति सौरभ तसा विकसोनि राहे ॥१०॥
उत्पन्न विज्ञान महानुभाव । ज्यांचा जगी व्यक्त दिसे प्रभाव ।
अनाश्रमी ऐकुनिं चांगदेवें । हें मानिलें यांसि दिठीं पहावें ॥१॥
पशूमुखीं बोलविले श्रुतीतें । हें दाविलें कौतुक ब्राह्मणातें ।
श्रीज्ञानदेवी रचिली ह्मराटी । आणोनि वेदागम अर्थ गांठी ॥२॥
ऐसा विचित्र महिमा महिमाजि ऐके
तो चांगया निघत शिष्यकुळें अनकें ।
व्याघ्रावरी वळघला बहु योगसिद्धि
दावी जना सुकृतवैभा तत्समृद्धी ॥३॥
जैसी निधीस मिळतां सरिताचि आटे
तैसीच चांगमुनि मानसवृत्ति आटे ।
सूर्योदयीं उडुगणांसह चंद्र लोपे ॥१४॥
हा ज्ञान भास्कर दिसे सुमहत्प्रतापें
त्याच्यापुढें मिरविजे किति तेज दीपें ? ।
जे योगसिद्ध मति पाउनि लुब्ध झाली
ते ज्ञानसिद्धि निरखील कसी विशाली ? ॥१५॥
भेटोनि ज्ञानफळ पाउनि स्वच्छ झाला
याचा अहंकृति विलास बरा विझाला ।
वोझें जुनाट अति टाकुनि शुद्ध झाला
मुक्ता - कृपें परम - मुक्तिपदासी गेला ॥१६॥
अलंकावती पंढरीहोनि सोपी । नुरे ये स्थळीं पावतां दीर्घ पापी ।
कळीकाळ येथें शिरेनात केव्हां । म्हणोनी भजा सादरें ज्ञानदेवा ॥१७॥
संतां निरंजन कवी विनवी नमोनी
म्या आदि हे तरि यथामति मूढवाणी ।
वेंचोनियां विरचिली म्हणवोनि देवा
दीनावरी सकृप होउनि नित्य सेवा ॥१८॥
ज्यातें शिवादि न वदूं सकतील वाचे
मी काय वानिन अगाध गुणांसि त्याचे ।
या कारणें सुजन संत महंत लोकीं
घ्या आवडी करुनि सद्‍गुरुकीर्ति हे कीं ॥१९॥
काढी पाणबुड्या बुडोनि सलिलिं मुक्ताफळें चांगलीं
त्यासाटीं धरिताति काय नृपती या सर्व भूमंडळी ?
रत्नाचे गुण पाहुनी करिति कीं सद्‍भूषणा-कारणें
मीही किंकर त्यापरीच समजा घ्या श्लोकरत्नें मनें ॥२०॥
निवृत्तीश्वरा ज्ञान - सोपान देवा । क्रमे आदि मुक्ताख्य चौघांस देवां ।
सदांसर्वदां वंदितों पादपद्मीं । बरी पूजितों स्थापितों चित्तसद्मीं ॥२१॥
इति निरंजनमाधव सत्कवी । रचित आदिकथा विलसे भुवि
भगवति अतिपावन गौतमी । त्रिजगवंद्य प्रसिद्ध महागमीं ॥२२॥
॥ इतिश्री ज्ञानेश्वरविजयग्रंथे कवी निरंजनमाधवयोगीविरचिते
निवासपुर-निवासगीतादि-ग्रंथप्रकरण निरुपणंनाम पचमोध्याय: ॥
श्लोक सर्व २१८ शके १६८८ व्ययसंवत्सर आषाढ शुद्ध चतुर्दशी
भानुवासरे लेखनं समाप्तम‍ ॥ श्रीरस्तु शुभमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP